शिरपूर तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?शिरपूर तालुका

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र राज्य
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
मुख्यालय <

धुळे

लोकसंख्या ३,३७,५५३
भाषा मराठी
तहसील शिरपूर तालुका
पंचायत समिती शिरपूर तालुका
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४२५४०५
• +०२५६३
• MH-18

शिरपूर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील धुळे जिल्ह्यातील एक तालुका आहे.

स्थान[संपादन]

शिरपूर तालुक्याचा नकाशा

शिरपूर तालुका धुळे जिल्हयाच्या उत्तरेस असून धुळे शहरापासून ५० किमी अंतरावर आहे. हा महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून ४०० कि.मी. अंतरावर असून, समुद्रसपाटीपासून सुमारे १८० ते २१५ मीटर उंचीवर आहे. या तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ २३६५ चौ.कि.मी. आहे..

भौगोलिक माहिती[संपादन]

येथे सरासरी वार्षिक पाऊस ५८७ मि.मी. एवढा होतो. तसेच जमीन मध्यम प्रतीची आहे.
शिरपूर हा अर्धा अदिवासी तालुका आहे.

तापमान[संपादन]

येथील हवामान कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४३ अंश सेल्शियस पर्यंत व हिवाळयात १० अंश सेल्शियस पर्यंत असते.

शिरपूर नगरपरिषदेचे चिन्ह

प्रमुख पिके[संपादन]

येथील हवामान ऊस, केळी, बाजरी, ज्वारी, कापूस यांना उपयुक्त असे आहे.

जलसिंचन सुविधा[संपादन]

शिरपुर तालुक्यात अरुणावती नदीवर हाडाखेड धरण असून त्यातील पाणी शेतीसाठी कालव्याद्वारे दिले जाते. यामुळे तालुक्यातील बरीच शेती सिंचनाखाली येते.

प्राथमिक आरोग्यसुविधा[संपादन]

शिरपुर तालुक्यात पहिल्या श्रेणीचे एकूण गुरांचे १० दवाखाने असून दुसऱ्या श्रेणीची ४ पशुप्रथमोपचार केंद्रे आहेत. तसेच तालुक्यात ८ प्राथमिक आरोग्य केंद्रे व १६ उपकेंद्रे आहेत. तसेच शिरपूर वरवाडे नगर परिषद संचालित इंदीरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल आहे येथे सुसज्ज २०० बेडची सुविधा उपलब्ध आहेत

शिक्षणसुविधा[संपादन]

शिरपुर तालुक्यात २६४ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आहेत.शिरपूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागातून सर्व शैक्षणिक सुविधा पुरविल्या जातात
शिक्षण क्षेत्रात शिरपूर शहर बऱ्यापैकी आघाडीवर असून गावात चांगल्या प्रकारचे शिक्षण उपलब्ध आहे.
गावात औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी, उच्च शिक्षणाच्या सोयीदेखील आहेत.

येथे कर्मवीर आण्णासाहेब व्यंकटराव तानाजी रणधीर यांची किसान विद्या प्रसारक संस्था आहे व आमरीश भाई पटेल यांची शिरपूर एज्युकेशन सोसायटी ही मह्त्वपूर्ण शैक्षणिक संस्था आहेत.

औद्योगिक क्रांती[संपादन]

शिरपूर तालुक्यात एक साखर कारखाना व एक सूतगिरणी आहे.
शिरपूर गोल्ड रिफायनरी, सूतगिरणी, साखर कारखाना, कापड मिल, मधूर फुड पार्क व छोटे मोठे उद्योगधंदे आहेत.

ऐतिहासिक महत्त्व[संपादन]

खानदेशातील धुळे जिल्हा हा तापी नदीपासून १० कि.मी.च्या अंतरावर सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी व मध्य प्रदेशाच्या सीमेलगत आहे आणि जिल्ह्यातला शिरपूर तालुका गुजरात राज्याला लागून आहे.

आध्यात्मिक महत्त्व[संपादन]

महाराष्ट्रातल्या खानदेशमधील धुळे जिल्हा हा श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे असे मानले जाते. जिल्हा आकाराने लहान असला तरी अनेक वैशिष्ट्यांनी समृद्ध आहे. प्राचीन काळी हा प्रदेश कृषिक म्हणून ओळखला जाई. रामायण, महाभारत, व सुदेशकुमार चरित्रामध्ये तसे उल्लेख आढळतात. त्यानंतर यादव काळात राजा सेऊणचंद्रच्या नंतर सेऊन देश या नावानेही तो ओळखला जाई. महाभारताच्या भीष्म पर्वात गोमता, मदंका, खर्डा, विदर्भ व रूपवाहिका असा विविध प्रदेशांचा उल्लेख आहे त्यांतील खर्डा म्हणजेच खानदेश, म्हणजे पूर्वीचा कन्हदेश म्हणजेच कृष्णाचा देश. काहीच्या मते गुजरातचा सुलतान पहिला अहमद याने या तालुक्यातील थाळनेरचा दुसरा फारूखी राजा मलिक यांना खान ही पदवी बहाल केली होती, त्यावरून खानदेश हे नाव पडले. याच खानदेशमध्ये धुळे जिल्ह्यातील शिरपूर येते.

शिरपूर तालुक्याला शिरपूर हे नांव कसे पडले याची एक कथा सांगण्यात येते. फार पूर्वी काळूबाबा नावाचे सदगृहस्थ होते. श्री. खंडेराव महाराजांवर त्यांची श्रद्धा होती व ते नेहमी भगवंताची पूजाअर्चना, नामस्मरण, भक्ती यात मग्न असत. काळूबाबा सांसारिक गृहस्थ होते. त्यांची व्यथा म्हणजे त्यांना मूलबाळ नव्हते, त्यामुळे त्यांनी स्वतःचे शिरकमल देण्याचा खंडेराव देवाला नवस केला व साकडे घातले. यानंतर नवसाप्रमाणे त्यांना मुलगा झाला. नवसानुसार श्री खंडेराव महाराजांच्या चरणी स्वतःचे शिरकमल अर्पण केले असता शिरकमळातून रक्त न निघता भंडारा (हळद) निघाला. त्यावरून या शहराचे नाव शिरपूर असे पडले असे जुने वयोवृद्ध लोक सांगतात.

वैशिष्ट्य[संपादन]

तालुक्यात एकूण १४७ गावे असून लोकसंख्या ३,३७,५५३ एवढी आहे. तालुक्यात एकूण ११८ ग्रामपंचायती आहेत.
शिरपूर गावात दोन प्रसिद्ध बालाजी (प्रतितिरुपती) मंदिर असून खालच्या गावातील व वरच्या गावातील अशा नावाने ती ओळखली जातात, श्री तिरुपती बालाजी नावाने व दरवर्षी खंडेराव देवाच्या नावाने यात्रा भरते.
शहरांत प्रभु व्यंकटेश बालाजी मंदिर, पाताळेश्वर मंदिर, खंडेराव मंदिर, माताभवानी मंदिर, अशी मंदिरे असून तीन मशिदी आहेत.शिरपूर येथे भव्य मोठे बुद्ध विहीर आहे अतिशय सुंदर परिसरात बौद्ध बांधव धम्म देसना करतात .

तालुक्यातील प्रमुख गावे[संपादन]

उंटावद,वाघाड़ी ,बोराडी ,थाळनेर ,वाडी ,अर्थे ,विखरण ,हिसांळे ,होळनाथे .

उल्लेखनीय[संपादन]

शिरपूर हे गाव प्रसिद्ध हिंदी व मराठी अभिनेत्री स्मिता पाटील हिचे जन्म गाव आहे.

शिरपूरपासून जवळच असलेले श्री क्षेत्र खर्दे बुद्रुक हे महानुभाव पंथीयांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. येथील दत्त मंदिर एक जागृत देवस्थान आहे. येथे मार्गशीर्ष महिन्यात येणारी यात्रा व आषाढी पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या देवपूजा व प्रसादवंदनाचा कार्यक्रम विशेष प्रसिद्ध आहे.

शेतीवर आधारित उद्योग जसे की रोप वाटिका व इतर अनेक उद्योग येथे आहेत. उंटावद येथील श्री कृष्णा ग्रीनहाऊस ही एक उत्तर महाराष्ट्रातील नावाजलेली नर्सरी (रोपवाटिका) येथे आहे.

तसेच शिरपूर तालुक्यातील गुगल नामांकन आठ प्राप्त उत्तर महाराष्ट्रातील एकमेव गुगल गाईड मनाेहर पांडुरंग वाघ यांचे जन्मस्थान आहे. मनोहर वाघ हे तंत्रस्नेही विषय साधनव्यक्ती आहेत यांनी अनेक स्थळे गुगल नकाशात जोडली आहेत त्या स्थळांना आजपर्यंत पंचवीस लाख लोकांनी भेटी दिल्या आहेत व त्यांचे यू ट्यूब चॅनल आहे.अधुनिक अध्यापन पद्धती वर ते शिक्षकांना मोफत मार्गदर्शन करतात व त्यांच्या सेमिनार ला आजपर्यंत बावीस हजार शिक्षकांनी सहभाग नोंदवला आहे.

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

धुळे जिल्ह्यातील तालुके
धुळे | शिरपूर तालुका | साक्री तालुका | शिंदखेडा तालुका