Jump to content

शिक्षक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शिक्षिका या पानावरून पुनर्निर्देशित)

व्युत्पत्ती आणि इतिहास

[संपादन]

शिक्षकांची कार्य, कर्तव्ये आणि कौशल्ये

[संपादन]

जागतिक पातळीवर ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षकांची कर्तव्ये 1. नियमित व वक्तशीरपणे शाळेत उपस्थित राहणे . 2. निर्धारित अभ्यासक्रम निर्धारित कालावधीत पूर्ण करून 'सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन '(CCE ) द्वारे बालकांची प्रगती सुनिश्चित करणे . 3. गरजेनुसार अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून वर्षाखेर सर्व बालकांची प्रगती साध्य करणे . 4. व्यापक 'सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन ' करून मुलांचे प्रगती पत्रक तयार करणे . 5. पालक सभा आयोजित करून त्यात बालकांची उपस्थिती , क्षमता व प्रगती यावर चर्चा करणे . 6. विविध प्रशिक्षणात सहभागी होणे . 7. परिसरातील शाळेत न येणाऱ्या मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करणे . 8. शाळा व्यवस्थापन समितीत शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून काम करणे . 9. शासनाने निर्धारित केलेली किमान अर्हता प्राप्त करणे . 10. सकाळ-दुपार विद्यार्थ्यांची हजेरी घेणे . 11. गैरहजर मुलांच्या पालकांच्या भेटी घेऊन चौकशी करणे . 12. शालेय दैनंदिन उपक्रम , सहशालेय उपक्रम यात सक्रीय सहभाग नोंदवणे . 13. कृतीशील अध्ययन , ज्ञान रचनावाद , बालस्नेही , बालाकेंद्रित वातावरण , स्वयं अध्ययन इत्यादीद्वारे ज्ञानदानाचे कार्य करणे . 14. शाळा हा गावच्या विकासाचा घटक असल्याने साक्षर भारत , निर्मल ग्राम योजना , संपूर्ण स्वच्छता अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान ई . योजनांची माहिती ठेवून गरजेनुसार सक्रीय सहभाग नोंदविणे . 15. सर्व विद्यार्थ्यांना समान संधी व समान वागणूक देणे. 16. बाल हक्कांच्या संरक्षणासाठी प्रयत्नशील राहणे . 17. शाळेतील उपलब्ध साधनसामुग्रीचा अध्ययन अध्यापनात नियमित वापर करणे . ऊदा . संगणक, टी.व्ही , गणित पेटी , विज्ञान पेटी , नकाशे , स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य , स्वयं-अध्ययन कार्ड , विविध चार्टस , मोडेल्स इत्यादी . 18. वर्गाशी /शाळेशी निगडीत सर्व अभिलेखे अद्ययावत ठेवणे . 19. मुख्याधापक / अधिकारी यांच्या लेखी / तोंडी सूचनानुसार प्राथमिक शिक्षणासंबंधीची सर्व कामे पार पाडणे . 20. RTE ACT 2009 व RTE RULES 2011यातील सर्व तरतुदींचे पालन करणे .

शिक्षक प्रशिक्षण आणि निवड

[संपादन]

आदर्श शिक्षक

[संपादन]

भारतातील बहुतेक शिक्षक हे आदर्श शिक्षक असतात. थोरामोठ्यांची चरित्रे वाचली की समजते की त्यांच्या आयुष्यात आणि चारित्र्य घडणीत शिक्षकांचा किती महत्त्वाचा हिस्सा होता. शिक्षकाला आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा गुरू मानल्या जाते.

मनोरंजन क्षेत्रातील शिक्षकांच्या भूमिका

[संपादन]

सर्वच भाषेतील मनोरंजन क्षेत्रातील साहित्य, नाटक, दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट इत्यादी माध्यमांतून विविध साहित्यिक, कलावंत आणि दिग्दर्शकांनी शिक्षकांच्या भूमिका वेळोवेळी साकारल्या आहेत. शिक्षकांच्या भूमिकांत प्राधान्याने तीन प्रकार दाखवले जातात एक 'गुरू' ही भूमिका यात मुख्यत्वे संगीत, क्रीडा इत्यादी प्रकार येत असावेत, दुसरे शिक्षकाच्या व्यक्तिगत जीवनाशी संबंधित भाग, तिसरे शाळा अथवा महाविद्यालयात प्रत्यक्ष शिकवतानाच्या भूमिका साकारलेल्या दिसतात.

१९४३ साली पु.ल. देशपांडे यांनी ’अभिरुची’च्या एका अंकात ‘अण्णा वडगावकर’ हे शिक्षकाचे व्यक्तिचित्र लिहिले. ते पुढे व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकात समाविष्ट केले गेले. व्यक्ती आणि वल्ली याच पुस्तकात पु.ल. देशपांडे यांनी चितळे मास्तर ही भूमिकाही रेखाटली आहे. ‘बिगरी ते मेट्रिक’ या लेखात दामले मास्तर ही भूमिका रेखाटली आहे.[][] मिलिंद बोकील यांनी त्यांच्या १९७५ मधील काळ लक्षात घेत पौगंडावस्थेतील मुलांबद्दल शालेय जीवनावर आधारित शाळा (कादंबरी) लिली. त्यात मांजरेकर सरांची भूमिका उभी केली आहे. याच शाळा (कादंबरी)वर आधारित शाळा या मराठी चित्रपटाची रचना निर्माते सुजय डहाके यांनी २०११ मध्ये केली.

जयवंत दळवी यांनी "सारे प्रवासी घडीचे" मधून पावटे मास्तरांची उग्र भूमिका साकारली आहे तर बाबुल- महानंदाचे [ दुजोरा हवा] लेखनही केले आहे.[][] बालचित्रवाणीवर "संस्कार" नावाची मराठी मालिका येत असे त्यात मोहन जोशी यांनी आदर्श शिक्षक-मुख्याध्यापकाची भूमिका केली होती [ दुजोरा हवा].

रमेश इंगळे उत्रादकर यांच्या कादंबरीवर आधारित निशाणी डावा अंगठा (इ.स. २००९) या पुरुषोत्तम बेर्डे यांनी दिग्दर्शीत केलेल्या चित्रपटात कलाकार अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, निर्मिती सावंत, दिलीप प्रभावळकर, मोहन आगाशे, विनय आपटे, भारत गणेशपुरे, पौर्णिमा अहिरे, भरत जाधव, आदी कलाकारांनी शिक्षकांच्या भूमिका करत प्रौढ साक्षरता मोहिमेचा उडणारा बोजवारा विनोदी पद्धतीने अधोरेखित केला आहे.

मराठी चित्रपटात श्रीराम लागू यांनी पिंजरा आणि सामना या चित्रपटातून शिक्षकांची भूमिका साकारली आहे. पिंजरा चित्रपतात आदर्श आणि व्यक्तिगत जीवनाच्या उत्तरार्धात भरकटलेले, पण समाज मनात आदर्शाचे महत्त्व अधोरेखित करणारे शिक्षक अशी भूमिका श्रीराम लागू यांनी सादर केली आहे. सामना या चित्रपटात त्यांचा मास्तर असा उल्लेख होतो परंतु त्यांना शिकवताना दाखवलेले नाही. स्मिता पाटील यांनी उंबरठा चित्रपटातून वसतीगृहाच्या वॉर्डनची भूमिका साकारली आहे. दिलीप प्रभावळकर यांनी एक डाव भुताचा या चित्रपटात शिक्षकाची भूमिका साकारली आहे. अतुल कुलकर्णी यांनी दहावी फ या चित्रपटात अशीच एक भूमिका साकारली आहे. 'खो खो' या मराठी चित्रपटात भरत जाधव यांनी श्रीरंग देशमुख नावाच्या शिक्षकाची भूमिका उभी केली आहे.

राजा परांजपे, रंजना (सुशीला), चंद्रकांत कुलकर्णी (बनगरवाडी), प्रिया अरुण (शेम टू शेम), या मराठी चित्रपटातूनही शिक्षकांच्या भूमिका साकारल्या गेल्या आहेत.[]

हिंदी साहित्यात प्रेमचंद यांनी शिक्षकांचे चित्रण केले आहे. बुनियाद या हिंदी दूरदर्शन मालिकेतून अलोकनाथ यांनी मास्टर हवेलीराम या शिक्षकाची भूमिका केली आहे. पडोसन या हिंदी चित्रपटातून मेहमूद आणि किशोर कुमार यांनी संगीत शिक्षकांच्या भूमिका साकारल्या आहेत. सारांश या हिंदी चित्रपटातून कलाकार अनुपम खेर यांनी शिक्षकाची भूमिका केली होती. या चित्रपटात त्यांचा शिष्य मोठा होऊन राज्याचा मुख्यमंत्री झालेला असतो. [ दुजोरा हवा] तारे जमीन पर या चित्रपटातून अमीरखान यांनी आदर्श शिक्षकाची भूमिका साकारली आहे. अमीरखान यांनी थ्री इडियट या चित्रपटातूनही शिक्षकाची भूमिका रंगवली आहे. शाहीद कपूर (पाठशाला), शहारूख खान (चक दे), सुष्मिता सेन (मैं हूँ ना), चित्रांगदा सेन (देसी बॉईज), त्या शिवाय अभिनेत्री रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी अनुक्रमे गुरू आणि शिक्षक अशा भूमिका हिंदी चित्रपटांतून साकारल्या आहेत.

भारतातील शिक्षकांना करावी लागणारी अशैक्षणिक शालाबाह्य कामे

[संपादन]

भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील शिक्षकांना शिकवण्याव्यतिरिक्त अनेक जास्तीची कामे करावी लागतात. त्यांपैकी काही कामे अशी - • ऑनलाईन माहिती भरणे • उपस्थिती भत्त्याचे काम • १९ शिष्यवृत्ती योजनांचे तपशील लिहून काढणे • गावातले संडास मोजणे • गावात व गावाबाहेर फिरून किती लोक आणि कोणकोण उघड्यावर शौचास बसले आहे याची नोंद करणे (बिहारमधील शिक्षकांसाठीचा फतवा) • घरोघरी जाऊन किती लोकांकडे फ्रिज, टी.व्ही आदी चैनीच्या वस्तू आहेत याची माहिती घेणे • घरोघरी जाऊन निवडणुकांसाठी मतदारांची माहिती घेणे. • घरोघरी जाऊन लसीकरणाची मोहीम राबवणे • चाळीसहून अधिक नोंदवह्या ठेवणे • जंतनाशक गोळी देण्याचे अहवाल • डिजिटल शाळा • दशवार्षिक खानेसुमारीचे काम करणे • प्रभात फेऱ्या • पुढाऱ्यांचे जन्म-मृत्युदिवस साजरे करणे • बायोमेट्रिक हजेरी • माध्यान्ह भोजन शिजवणे • माध्यान्ह भोजनासाठी किती तांदूळ-डाळ-सरपण शिल्लक आहे याची नोंद करणे. गरज पडल्यास स्वतःच्या पैशातून या वस्तू आणणे. • मीना राजू मंच चालवणे • मुलांना आधारकार्डे मिळवून देणे • याशिवाय नित्य नियमाने विचारले जाणारे नवनवे अहवाल सादर करणे (एकूण सुमारे २५) • लोकसहभाग मिळवणे व त्याचा अहवाल तयार करणे • लोहयुक्त गोळी देणे • वर्गात किती विद्यार्थी हजर आहेत हे दाखवण्यासाठी त्यांच्यासकट सवतःचा रोजच्या रोज सेल्फी काढणे आणि तो व्हॉट्सॲपवरून शिक्षणखात्याकडे पाठवणे • वर्गातील पायाभूत सुविधांच्या सद्यस्थितीचे अहवाल • विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचे अहवाल • विमा योजना • विविध अभियाने राबवणे • विशेष दिवसांसाठी राबवायची अभियाने • वेगळ्यावेगळया परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेणे • वेगळ्यावेगळया योजनांसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेणे • गावात हिंडून शालाबाह्य मुले शोधणे व त्यांच्या पालकांचे मोबाईल नंबर मिळवणे • शिक्षण खात्याच्या सूचनेनुसार घेण्यात येणारे उपक्रमांचे आणि स्पर्धांचे अहवाल • शैक्षणिक सहली आयोजित करणे • मुलींना शैक्षणिक साहित्य मिळवून देण्यासाठी गावातील दानशूर व्यक्ती शोधणे • सरल प्रणालीवर माहितीचे संकलन • सहशालेय उपक्रम आणि स्पर्धांचे अहवाल

• वगैरे वगैरे

हे सुद्धा वाचा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]