"भाषांतरित-रूपांतरित नाटके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
मराठी नाटके ही दीर्घकाळपर्यंत केवळ भाषांतरितच असत. सुरुवातीला संस्कृत आणि नंतर पाश्चात्त्य नाट्यकृतींची भाषांतरे मराठी रंगभूमीवर येत. यांशिवाय अनेक भारतीय भाषांमधील नाटकांचीही मराठीत भाषांतरे होत गेली. ज्यांनी अशी नाटके मराठी रंगभूमीवर आणली, त्यांनी मराठी प्रेक्षक या नाटकांशी कितपत समरस होऊ शकेल याचा विचार केला होताच असे नाही. उदाहरण म्हणून आयनेस्कोच्या ’चेअर्स’चे वृंदावन दंडवते यांनी केलेले ’खुर्च्या’ हे भाषांतरित नाटक. ’रंगायन’ने जेव्हा ’खुर्च्या’चा प्रयोग केला तेव्हा तो प्रेक्षकांच्या डोक्यावरून गेला. यामुळेच अनेक मराठी नाटककारांनी पाश्चात्त्य नाटकांना मराठी बाज देऊन त्या नाटकांचे मराठीत रूपांतर केले.
मराठी नाटके ही दीर्घकाळपर्यंत केवळ भाषांतरितच असत. सुरुवातीला संस्कृत आणि नंतर पाश्चात्त्य नाट्यकृतींची भाषांतरे मराठी रंगभूमीवर येत. यांशिवाय अनेक भारतीय भाषांमधील नाटकांचीही मराठीत भाषांतरे होत गेली. ज्यांनी अशी नाटके मराठी रंगभूमीवर आणली, त्यांनी मराठी प्रेक्षक या नाटकांशी कितपत समरस होऊ शकेल याचा विचार केला होताच असे नाही. उदाहरण म्हणून आयनेस्कोच्या ’चेअर्स’चे वृंदावन दंडवते यांनी केलेले ’खुर्च्या’ हे भाषांतरित नाटक. ’रंगायन’ने जेव्हा ’खुर्च्या’चा प्रयोग केला तेव्हा तो प्रेक्षकांच्या डोक्यावरून गेला. यामुळेच अनेक मराठी नाटककारांनी पाश्चात्त्य नाटकांना मराठी बाज देऊन त्या नाटकांचे मराठीत रूपांतर केले. विल्यम [[शेक्सपियर | शेक्सपियरच्या]] ३६ नाटकांपैकी २७ नाटकांची मराठीत भाषांतरे वा रूपांतरे झालीआहेत.त्यासर्व नाटकांची यादी याच विकिपीडियावर [[शेक्सपियर]] या लेखात आली आहे. त्याशिवाय अमराठी भाषांतून अनेक नाटके मराठीत आली. त्या बहुतांशी नाटकांची नावे पुढे दिलेल्या तक्त्यात दिली आहेत. ही यादी अर्थात परिपूर्ण असणे शक्य नाही; आणि जशीजशी नवीन रूपांतरित नाटके मराठीत येतील, तशीतशी या यादीत सतत भरच पडत जाईल.


'''मराठीतील भाषांतरित-रूपांतरित नाटकांची जंत्री :'''
'''मराठीतील भाषांतरित-रूपांतरित नाटकांची जंत्री :'''

०१:११, ८ मार्च २०१२ ची आवृत्ती

मराठी नाटके ही दीर्घकाळपर्यंत केवळ भाषांतरितच असत. सुरुवातीला संस्कृत आणि नंतर पाश्चात्त्य नाट्यकृतींची भाषांतरे मराठी रंगभूमीवर येत. यांशिवाय अनेक भारतीय भाषांमधील नाटकांचीही मराठीत भाषांतरे होत गेली. ज्यांनी अशी नाटके मराठी रंगभूमीवर आणली, त्यांनी मराठी प्रेक्षक या नाटकांशी कितपत समरस होऊ शकेल याचा विचार केला होताच असे नाही. उदाहरण म्हणून आयनेस्कोच्या ’चेअर्स’चे वृंदावन दंडवते यांनी केलेले ’खुर्च्या’ हे भाषांतरित नाटक. ’रंगायन’ने जेव्हा ’खुर्च्या’चा प्रयोग केला तेव्हा तो प्रेक्षकांच्या डोक्यावरून गेला. यामुळेच अनेक मराठी नाटककारांनी पाश्चात्त्य नाटकांना मराठी बाज देऊन त्या नाटकांचे मराठीत रूपांतर केले. विल्यम शेक्सपियरच्या ३६ नाटकांपैकी २७ नाटकांची मराठीत भाषांतरे वा रूपांतरे झालीआहेत.त्यासर्व नाटकांची यादी याच विकिपीडियावर शेक्सपियर या लेखात आली आहे. त्याशिवाय अमराठी भाषांतून अनेक नाटके मराठीत आली. त्या बहुतांशी नाटकांची नावे पुढे दिलेल्या तक्त्यात दिली आहेत. ही यादी अर्थात परिपूर्ण असणे शक्य नाही; आणि जशीजशी नवीन रूपांतरित नाटके मराठीत येतील, तशीतशी या यादीत सतत भरच पडत जाईल.

मराठीतील भाषांतरित-रूपांतरित नाटकांची जंत्री :

नाटकाचे नाव मराठी रूपांतरकार मूळ नाटक भाषा त्याचा लेखक
अजब न्याय वर्तुळाचा चिं.त्र्यं. खानोलकर द कॉकेशियन चॉक सर्कल ब्रेख्त
अँटिगॉन श्रीराम लागू अँटिगॉन ग्रीक सोफोक्लीज
अंमलदार पु.ल. देशपांडे द गव्हर्नमेन्ट इन्स्पेक्टर ऊर्फ इन्स्पेक्टर जनरल रशियन निकोलाय गोगोल
एक झुंज वार्‍याशी पु.ल.देशपांडे द लास्ट अपॉइन्टमेन्ट(कथा) रशियन
एक रात्र,अर्धा दिवस(पवित्र ज्योति) लीला चिटणीस द सेक्रेड फ्लेम इंग्रजी सॉमरसेट मॉम
एक होती राणी श्रीराम लागू La regina egle in sorti इटालियन ऊगो बेट्टी
ओझ्यावाचून प्रवासी शांता वैद्य द ट्रॅव्हेलर विदाउट लगेज फ्रेन्च ज्याँ अनुई
कवडीचुंबक प्र.के.अत्रे ला व्हार फ्रेन्च मोलियर
कमळेचे लग्न वि.सी.गुर्जर ल अमूर मेन्डसे फ्रेन्च मोलियर
काचेची खेळणी वसंत कामत द ग्लास मेनाजेरीज इंग्रजी टेनेसी विल्यम्स
कुटाळकंपू वि.बा.आंबेकर द स्कूल फॉर स्कॅन्डल इंग्रजी रिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
कोंडी अशोक शहाणे अ‍ॅन एनेमी ऑफ द पीपल इंग्रजी हेन्‍रिक इब्सेन
खुर्च्या वृंदावन दंडवते चेअर्स इंग्रजी आयेनेस्को
खून पहावा करून सरिता पदकी नॉट इन द बुक
गगनभेदी वसंत कानेटकर ऑथेल्लो+किंग लिअर+मॅकबेथ+हॅम्लेट इंग्रजी विल्यम शेक्सपीअर
गुरुबाजी र.धों.कर्वे ल तात्युर्फ फ्रेन्च मोलियर
गोची सदानंद रेगे गॉन आउट पोलिश तादोझ रूझिविच
गौराई व्यंकटेश माडगूळकर द रोझ टॅटू इंग्रजी टेनेसी विल्यम्स
घरकुल अनंत काणेकर डॉल्स हाउस इंग्रजी हेन्‍रिक इब्सेन
चंद्र नभीचा ढळला पुरुषोत्तम दारव्हेकर कॅलिगुला आल्बर्ट कामू
चांगुणा आरती हवालदार(मानसी कणेकर) यर्मा स्पॅनिश फेडरिको गार्सिया लॉर्की
जनावर शं.ना.नवरे इंग्रजी आल्बी एडवर्ड
जबरीचा विवाह ल मरिआन फोर्से फ्रेन्च मोलियर
जळते शरीर ह.वि.देसाई घोस्ट्‌स इंग्रजी हेन्‍रिक इब्सेन
ज्याचे होते प्राक्तन शापित सदानंद रेगे मॉर्निंग बिकम्स एलेक्ट्रा ओनील यूजिन
ज्वालेत उभी मी अनिल जोगळेकर कॅट ऑन अ हॉट टिन रूफ इंग्रजी टेनेसी विल्यम्स
तीन पाशेर पाला (बंगाली) शंभू मित्र थ्री पेनी ऑपेरा जर्मन ब्रेख्त
तीन पैशाचा तमाशा पुल.देशपांडे थ्री पेनी ऑपेरा जर्मन ब्रेख्त
ती फुलराणी पु.ल.देशपांडे पिग्मॅलियन इंग्रजी जॉर्ज बर्नार्ड शा
तोही मी आणि हाही मीच अथवा नवरदेवाची जोडगोळी न.चिं.केळकर द रायव्हल्स इंग्रजी रिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
देवाजीने करुणा केली व्यंकटेश माडगूळकर द गुड वुमन ऑफ सेत्सुआन जर्मन ब्रेख्त
नाटककाराच्या शोधात सहा पात्रे माधव वाटवे सिक्स कॅरॅक्टर्स इन सर्च ऑफ अ‍ॅन ऑथर इटालियन लुइगी पिरँदेलो
निळावंती वसंत सबनीस ब्लू एन्जल्स इंग्रजी
पत्त्याच्या डावाची अखेर फँ द पार्ती फ्रेन्च सॅम्युअल बेकेट
परी तू जागा चुकलासी ह.रा.महाजनी अ‍ॅन एनेमी ऑफ द पीपल इंग्रजी हे्न्‍रिक इब्सेन
पवित्र ज्योति (एक रात्र, अर्धा दिवस) लीला चिटणीस द सेक्रेड फ्लेम इंग्रजी सॉमरसेट मॉम
पांथस्थ सरिता पदकी आ: ! वाइल्डनेस इंग्रजी ओनील यू्जीन
पिझॅरो ना.के.बेहेरे पिझॅरो इंग्रजी रिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
प्रणयविवाह त्रिं.वि.मोडक ड्युएना इंग्रजी रिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
प्रेषिताचे पाय मातीचे पद्माकर गोवईकर सलोमी इंग्रजी ऑस्कर वाइल्ड
बंद दरवाजे (हिंदी व मराठी) इन कॅमेरा, नो एक्झिट व व्हिशस सर्कल ज्याँ पॉल सात्र
बाकी सारं स्ट्रीटकार नेम्ड डिझायर इंग्रजी टेनेसी विल्यम्स
बादशहा सदानंद रेगे एम्परर जोन्स इंग्रजी ओनील यूजीन
बेइमान वसंत कानेटकर बेकेट फ्रेन्च ज्याँ अनुई
बेकेट(महंत) वि.वा.शिरवाडकर बेकेट फ्रेन्च ज्याँ अनुई
ब्रांद सदानंद रेगे ब्रॅन्ड इंग्रजी हेन्‍रिक इब्सेन
महंत(बेकेट) वि.वा.शिरवाडकर बेकेट फ्रेन्च ज्याँ अनुई
मारून मुटकून वैद्यबुआ ह.आ. तालचेलकर द डॉक्टर इन्स्पाइट ऑफ हिमसेल्फ फ्रेन्च मोलियर
मारून मुटकून वैद्यबुवा ह.ना.आपटे द डॉक्टर इन्स्पाइट ऑफ हिमसेल्फ फ्रेन्च मोलियर
मोरूची मावशी प्र.के.अत्रे चार्लीज ऑन्ट इंग्रजी ब्रॅन्डन थॉमस
राईचा पर्वत ना.ह.हेळेकर द स्कू्ल फॉर स्कँन्डल इंग्रजी रिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
राव जगदेवराव मार्तंड सिरॅनो
रावबहादूर पर्वत्या ह.ना.तालचेरकर ल बुर्झ्वा जान्तिल ऑम फ्रेन्च मोलियर
लग्नसोहळा(संगीत) ल.ग.सुळे ड्युएना इंग्रजी रिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
ल तात्युर्फ शांता वैद्य ल तात्युर्फ फ्रेन्च मोलियर
वनहंसी पा.रं.अंबिके द वाइल्ड डक इंग्रजी हेन्‍रिक इब्सेन
वनहंसी भा.वि.वरेरकर द वाइल्ड डक इंग्रजी हेन्‍रिक इब्सेन
वरवंचना (संगीत) गो.स.टेंबे ड्युएना इंग्रजी रिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
वाजे पाऊल आपुले विश्राम बेडेकर सेन्ड मी नो फ्लॉवर्स इंग्रजी कॅरॉल मूर
वाडा भवानी आईचा मानसी कणेकर द हाउस ऑफ बर्नाडा आल्बा इंग्रजी फेडरिको गार्सिया लार्का
वासनाचक्र विजय तेंडुलकर स्ट्रीटकार नेम्ड डिझायर इंग्रजी टेनेसी विल्यम्स
वेटिंग फॉर गोदो अशोक शहाणे ऑन अटेन्डन्ट गोडो इंग्रजी सॅम्युअल बेकेट
वैजयंती वि.वा.शिरवाडकर मोनाव्हना इंग्रजी मेटरलिंक
व्यक्ती तितक्या प्रकृती पद्माकर गोवईकर ईच इन हिज ओन वे इटालियन लुइगी पिरँदेलो
सखाजीराव ढमाले शिवराम सीताराम वागळे द पुरसोनक फ्रेन्च मोलियर
सटवाई अथवा नटमोगर्‍याची फटफजिती ड्युएना इंग्रजी रिचर्ड ब्रिन्सले शेरिडन
सारेच सज्जन व्यंकटेश वकील अ‍ॅन इन्स्पेक्टर कॉल्स इंग्रजी जे.बी.प्रीस्टले
सुख पाहता स.गं.मालशे स्ट्रेन्ज इन्टरव्ह्यूड इंग्रजी ओनील यूजीन
सुंदर मी होणार पु.ल.देशपांडे बॅरट्स ऑफ विंपोल स्ट्रीट इंग्रजी रुडॉल्फ बेसीर