"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |

ओळ १: | ओळ १: | ||
'''राष्ट्रीय स्वयंसेवक संघ''' ही |
'''राष्ट्रीय स्वयंसेवक संघ''' ही एक [[हिंदू राष्ट्रवाद|हिंदू राष्ट्रवादी]] संघटना आहे. ही [[इ.स. १९२५]] मध्ये [[डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार]] यांनी चालू केली. [[बी.बी.सी.]]च्या मते ती जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था आहे. [[१९२५]] पासून हळूहळू संघाला महत्त्व प्राप्त होत गेले आणि शेवटी त्यातून [[भारतीय जनसंघ]] या पक्षाचा उदय झाला जो नंतर [[भारतीय जनता पक्ष]] बनला. या पक्षाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय शाखा समजले जाते/जात होते. |

==कार्यतत्त्व == |

==कार्यतत्व == |

हिंदू समाजाचे एकत्रीकरण हे संघाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हिंदू समाज हा पुरातन काळापासूनच अनेक [[वर्ण]], [[जाती]], [[पंथ]] यांत विभागला गेला आहे. प्रत्येक जात स्वतःला इतरांपेक्षा वेगळी समजते. कोणत्याही प्रकारच्या वर्णद्वेष तसेच जातिभेदाला थारा नसलेल्या व तमाम जातिपंथांमध्ये एकोपा असलेला हिंदू समाज असणे हे संघाला अपेक्षित आहे. हे साध्य करताना अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करून उरलेल्या हिंदू परंपरांचे संवर्धन व्हावे असे संघाचे धोरण आहे. |

प्राचीन हिंदू परंपरांचे संवर्धन, अशा परंपरा ज्याचा सर्वच भारतीयांना अभिमान आहे. तसेच अनिष्ट प्रथांचे उच्चाटन. |

फाळणीनंतर तुकडे झालेल्या हिंदुस्थानचे एकत्रीकरण होऊन परत [[अखंड भारत|अखंड भारताची]] निर्मिती व्हावी अशी संघाची मनीषा आहे. |

[[अखंड भारत|अखंड भारताचे]] एकत्रिकरण. |

==संरचना== |
==संरचना== |

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक शाखांमध्ये स्वयंसेवक दैनंदिन हजरी लावतात. [[सरसंघचालक]] हे या सर्व शाखांचे अप्रत्यक्षपणे नियंत्रण करतात.. सरसंघचालकाचे पद हे नियुक्तीने भरले जाते. जुने सरसंघचालकच आपला उत्तराधिकारी निवडतात. संघाच्या शाखा दररोज सकाळी व सायंकाळी १-२ तास सार्वजनिक ठिकाणी भरतात. सध्या संपूर्ण भारतात साधारणत: ५,००,००० शाखा चालतात, असे सांगितले जाते. या शाखा संघाच्या बांधणीचा मूळ पाया आहेत. |

=== शाखा === |
=== शाखा === |

वर नमूद केल्याप्रमाणे शाखा ही संघाच्या रचनेतील |
वर नमूद केल्याप्रमाणे शाखा ही संघाच्या रचनेतील महत्त्वात्वाचे अंग आहे. शाखा मोकळ्या पटांगणांवर, शाळेच्या मैदानांवर, मंदिरांबाहेरील मोकळ्या जागेत वा वस्तीतील मोकळ्या जागेत भरतात. सकाळी भरणार्या शाखेस प्रभातशाखा तर सायंकाळी भरणार्या शाखेस सायंशाखा असे म्हणतात. प्रभात शाखेत मुख्यत्वे प्रौढ लोकांचा भरणा जास्त असतो, तर सायंशाखेत लहान मुले, बाल व तरुण असतात. शाखेची नियमित वेळ १ तासाची असते. सायंशाखेची वेळ बहुतकरून ५ ते ६, ६ ते ७ किंवा ६.३० ते ७.३० अशी असते. प्रत्येक भागातील शाळांच्या वेळा विचारात घेऊन सोईची वेळ ठेवतात. शाखेची सुरुवात भगवा ध्वज उभारून त्याला प्रणाम करून होते. या नंतर विविध प्रकारचे मैदानी खेळ खेळले जातात. शाखेत योगासने योग, कसरतीचे खेळ वगैरे असतातच पण याशिवाय, ज्यात विविध सामाजिक विषयाछी माहिती देऊन चर्चा करता येईल अशी बौद्धिके असतात. शैक्षणिक बौद्धिकांमध्ये बहुधा शैक्षणिक भारताचा इतिहास, भारतीय तत्त्वज्ञान, भारतीय संस्कृती इत्यादि विषय हाताळले जातात. यानंतर पद्य म्हणले जाते व शेवटी भारतमातेची प्रार्थना म्हणून ध्वज उतरवला जातो व त्या दिवसाच्या शाखेच्या बैठकीची सांगता होते. |

शाखेमध्ये |
शाखेमध्ये स्वतःचा वाद्यवृंद असतो. त्याला 'घोष' म्हणतात. त्यामध्ये अनेक दले असतात. स्वयंसेवकांचे जेव्हा मोठ्या संख्येने संचरण होते तेव्हा ‘आनक दल' सर्वात पुढे असते. त्यानंतर क्रमाने 'पणव दल’, 'त्रिभुज दल', 'जल्लरी दल, 'वंशी दल’, 'शृंग दल, ही दले असतात आणि सर्वात शेवटी 'शंख दल'. प्रत्येक दलात एक दलप्रमुख असतो. संचलनात अग्रभागी एक स्वयंसेवक असतो. त्याच्या हातात घोषदंड असतो. त्याला 'घोषप्रमुख' म्हणतात. |

==संघाच्या उपलब्धी== |

संघाने समाजातील विविध |
संघाने समाजातील विविध कार्यांत आपले अस्तित्व दाखवले आहे.. उदाहरणार्थ [[१९६२ चे भारत-चीन युद्ध|१९६२ च्या भारत-चीन युद्धामध्ये]] पंतप्रधान [[पंडित जवाहरलाल नेहरू]] इतके प्रभावीत झाले की त्यांनी संघातील स्वयंसेवकांना [[जानेवारी २६]], [[इ.स. १९६३|१९६३]] च्या प्रजासत्ताक दिनाच्या मिरवणुकीला निमंत्रित केले. केवळ २ दिवसांच्या पूर्वसूचनेनंतरसुद्धा ३०००पेक्षा जास्त स्वयंसेवक संघाच्या मिरवणुकीला हजर राहिले. अलीकडील काळात संघातील विचारसरणीने तयार झालेल्या लोकांनी उच्च राजकीय पदे मिळवलेली दिसतात. उदाहरणार्थ [[:वर्ग:भारतीय उपराष्ट्रपती|उपराष्ट्रपती]] [[भैरव सिंग शेखावत]], [[:वर्ग:भारतीय पंतप्रधान|पंतप्रधान]] [[अटल बिहारी वाजपेयी]], [[:वर्ग:भारतीय गृहमंत्री|गृहमंत्री]] [[लाल कृष्ण अडवाणी]] इत्यादी लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. |

==टीका== |
==टीका== |

[[इ.स. १९४८]] मध्ये संघावर [[गांधीहत्या प्रकरण|गांधीहत्या प्रकरणामुळे]] बंदी घालण्यात आली. [[महात्मा गांधी|महात्मा गांधींवर]] हल्ला करणारा[[नथुराम गोडसे]] हा संघाचा जुना स्वयंसेवक असल्यामुळे असे करण्यात आले. पण झालेल्या तपासणीत संघ निर्दोष असल्याचे सिद्ध झाले व बंदी उठवण्यात आली. |
[[इ.स. १९४८]] मध्ये संघावर [[गांधीहत्या प्रकरण|गांधीहत्या प्रकरणामुळे]] बंदी घालण्यात आली होती.. [[महात्मा गांधी|महात्मा गांधींवर]] हल्ला करणारा[[नथुराम गोडसे]] हा संघाचा जुना स्वयंसेवक असल्यामुळे असे करण्यात आले. पण झालेल्या तपासणीत संघ निर्दोष असल्याचे सिद्ध झाले व बंदी उठवण्यात आली. |

काही टीकाकार संघाच्या विचारसरणीवर हिंदू हुकूमशाही म्हणून टीका करतात. तर संघाच्या समर्थकांची मुख्य मागणी सरकारने अल्पसंख्यकांचे लाड थांबवावेत अशी आहे उदाहरणार्थ: हिंदू मंदिरे सरकारच्या ताब्यात पण मशिदींवर आणि चर्चवर कोणतीही बंधने नाहीत, [[शाह बानो खटला|शाह बानो खटल्याची]] |
काही टीकाकार संघाच्या विचारसरणीवर हिंदू हुकूमशाही म्हणून टीका करतात. तर संघाच्या समर्थकांची मुख्य मागणी सरकारने अल्पसंख्यकांचे लाड थांबवावेत अशी आहे उदाहरणार्थ: हिंदू मंदिरे सरकारच्या ताब्यात पण मशिदींवर आणि चर्चवर कोणतीही बंधने नाहीत, [[शाह बानो खटला|शाह बानो खटल्याची]] गैरहाताळणी, ज्याअन्वये कोणत्याही भारतीय नागरिकाला [[काश्मिर|काश्मीरमध्ये]] वसण्यालार बंदी करणारे घटनेतील [[३७०वेकलम]], सर्वधर्मियांसाठी आज अस्तित्वात नसलेला समान नागरी कायदा, [[हाज यात्रा|हज यात्रेला]] दिलेली अवाजवी सूट आणि लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रम मुस्लिम मतदार दुखावतील म्हणून न चालवणे इत्यादी मागण्या ्राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आहेत.. टीकाकार असे म्हणतात की हे मुद्दे मुस्लिम द्वेष पसरवतात आणि हिंदूंना अनुकूल अशा हिंदू कुटुंबांना मिळणारी करामधील सूट, हिंदू यात्रांना मिळणारी अर्थिक मदत इत्यादी गोष्टी विसरतात. |

संघाची ऐतिहासिक भूमिका अशी आहे की |
संघाची ऐतिहासिक भूमिका अशी आहे की हिंदूंवर त्यांच्याच भूमीवर अन्याय होत आला आहे आणि संघ केवळ हिंदूंच्या नैसर्गिक हक्कांची मागणी करत आहे. टीकाकार म्हणतात की संघ भारताचा निधर्मवादी पाया बदलू पाहतो आहे. या गोष्टीशी बाबरी मशिदीचा मुद्दा संबंधित होता. काही हिंदू लोक असे म्हणत होते की बाबराने मशीद बांधण्याआधी त्या ठिकाणचे मंदिर तोडले होते. ती जागा [[रामजन्मभूमी]] होती. तर टीकाकार असे म्हणतात की संघ केवळ वाद तयार करू पाहतो आहे, कारण [[अयोध्या|अयोध्येत]] अशी बरीच मंदिरे आहेत जी रामजन्मभूमी म्हणून ओळखली जातात. [[इ.स. २००३]] मध्ये [[भारतीय पुरातत्व विभाग|भारतीय पुरातत्त्व विभागाने]] केलेल्या विवादास्पद अभ्यासात असे निष्पन्न झाले की मशिदीच्या ठिकाणी पूर्वी मंदिरासारखी इमारत होती. |

==संघ प्रेरणेतून तयार झालेल्या संस्था== |
==संघ प्रेरणेतून तयार झालेल्या संस्था== |

ओळ ५२: | ओळ ५०: | ||
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे

त्वया हिन्दुभूमे सुखं |
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम् ।

महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे

महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे

पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।।

पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।।

ओळ ५८: | ओळ ५६: | ||
प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता

प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता

इमे सादरं त्वां नमामो वयम्

इमे सादरं त्वां नमामो वयम्

त्वदीयाय कार्याय |
त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम्

शुभामाशिषं देहि तत्पूर्तये ।

शुभामाशिषं देहि तत्पूर्तये ।

अजय्यां च विश्वस्य देहीश |
अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिम्

सुशीलं जगद्येन नम्रं भवेत्

सुशीलं जगद्येन नम्रं भवेत्

श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण |
श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गम्

स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत् ।।२।।

स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत् ।।२।।

समुत्कर्षनिःश्रेयस्यैकमुग्रम्

समुत्कर्षनिःश्रेयस्यैकमुग्रं

परं साधनं नाम वीरव्रतम्

परं साधनं नाम वीरव्रतम्

तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा

तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा

ओळ ७१: | ओळ ६९: | ||
विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्

विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्

विधायास्य धर्मस्य संरक्षणम् ।

विधायास्य धर्मस्य संरक्षणम् ।

परं वैभवं नेतुमेतत् |
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम्

समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ।।३।।

समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ।।३।।

।। भारत माता की जय ।। |
।। भारत माता की जय ।। |

अर्थ :हे वत्सल मातृभूमे, मी तुला सदैव नमस्कार करतो. हे हिन्दुभूमे, तू माझे सुखाने पालनपोषण केलेले आहेस. हे महामंगलमयी पुण्यभूमे, तुझ्यासाठी माझा हा देह समर्पण होवो. मी तुला पुनःपुन्हा वंदन करतो.

अर्थ : हे वत्सल मातृभूमे, मी तुला सदैव नमस्कार करतो. हे हिन्दुभूमे, तू माझे सुखाने पालनपोषण केलेले आहेस. हे महामंगलमयी पुण्यभूमे, तुझ्यासाठी माझा हा देह समर्पण होवो. मी तुला पुनःपुन्हा वंदन करतो.

हे सर्व शक्तिमान परमेश्वरा, हिंदुराष्ट्राचे आम्ही पुत्र तुला सादर प्रणाम करतो. तुझ्याच कार्यासाठी आम्ही |
हे सर्व शक्तिमान परमेश्वरा, हिंदुराष्ट्राचे आम्ही पुत्र तुला सादर प्रणाम करतो. तुझ्याच कार्यासाठी आम्ही कटिबद्ध झालो आहोत. त्या कार्याच्या पूर्ततेसाठी आम्हाला तू शुभाशीर्वाद दे. हे प्रभू, आम्हाला अशी शक्ती दे की, जिला आव्हान देण्याचे धैर्य जगातील अन्य कुणा शक्तीला व्हावयाचे नाही, असे शुद्ध चारित्र्य दे की, ज्या चारित्र्यामुळे संपूर्ण विश्व नतमस्तक होईल आणि असे ज्ञान दे की, ज्यामुळे आम्ही स्वतः होऊन पत्करलेला हा काट्याकुट्यांनी भरलेला मार्ग सुगम होईल. |

उच्च असे आध्यात्मिक सुख आणि महानतम अशी ऐहिक |
उच्च असे आध्यात्मिक सुख आणि महानतम अशी ऐहिक समृद्धी प्राप्त करण्याचे एकमेव श्रेष्ठतम असे साधन असलेली उग्र अशी वीरव्रताची भावना आमच्यात सदैव उत्स्फूर्त होत राहो. तीव्र आणि अखंड अशी ध्येयनिष्ठा आमच्या अंतःकरणात सदैव जागती राहो. तुझ्या कृपेने आमची ही विजयशालिनी संघटित कार्यशक्ती आमच्या धर्माचे संरक्षण करून या राष्ट्राला वैभवाच्या उच्चतम शिखरावर पोहोचविण्यास समर्थ होवो. |

।। भारत माता की जय ।। |
।। भारत माता की जय ।। |

ओळ ९९: | ओळ ९७: | ||
*[http://www.rss.org/New_RSS/Mission_Vision/Why_RSS.jsp संघाची ध्येयदृष्टी] |
*[http://www.rss.org/New_RSS/Mission_Vision/Why_RSS.jsp संघाची ध्येयदृष्टी] |

*[http://www.rss.org/New_RSS/History/Achievements.jsp संघाचे पराक्रम] |
*[http://www.rss.org/New_RSS/History/Achievements.jsp संघाचे पराक्रम] |

*[http://www.rss.org/New_RSS/Mission_Vision/RSS_on_Minorities.jsp संघ आणि |
*[http://www.rss.org/New_RSS/Mission_Vision/RSS_on_Minorities.jsp संघ आणि अल्पसंख्याक] |

*[http://www.freeessays.cc/db/40/rcj186.shtml राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक निबंध] |
*[http://www.freeessays.cc/db/40/rcj186.shtml राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक निबंध] |

*[http://department.monm.edu/classics/Speel_Festschrift/spitz.htm संघ आणि हिंदू आतंकवाद] |
*[http://department.monm.edu/classics/Speel_Festschrift/spitz.htm संघ आणि हिंदू आतंकवाद] |

*[http://koenraadelst.bharatvani.org/books/ayodhya/ch14.htm डॉ. कोएंराड एल्स्ट यांच्या हिंदू राष्ट्रवादावरील |
*[http://koenraadelst.bharatvani.org/books/ayodhya/ch14.htm डॉ. कोएंराड एल्स्ट यांच्या हिंदू राष्ट्रवादावरील पुस्तकातील एक प्रकरण ] |

===संघ |
===संघ प्रेरणेतून तयार झालेल्या संस्था=== |

*[http://www.sevabharathi.org/ सेवा भारती] |
*[http://www.sevabharathi.org/ सेवा भारती] |

*[http://www.vidyabharati.org/aboutus.asp विद्या भारती] |
*[http://www.vidyabharati.org/aboutus.asp विद्या भारती] |
१९:१३, ५ जुलै २०११ ची आवृत्ती
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक हिंदू राष्ट्रवादी संघटना आहे. ही इ.स. १९२५ मध्ये डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी चालू केली. बी.बी.सी.च्या मते ती जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था आहे. १९२५ पासून हळूहळू संघाला महत्त्व प्राप्त होत गेले आणि शेवटी त्यातून भारतीय जनसंघ या पक्षाचा उदय झाला जो नंतर भारतीय जनता पक्ष बनला. या पक्षाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय शाखा समजले जाते/जात होते.
कार्यतत्त्व
हिंदू समाजाचे एकत्रीकरण हे संघाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हिंदू समाज हा पुरातन काळापासूनच अनेक वर्ण, जाती, पंथ यांत विभागला गेला आहे. प्रत्येक जात स्वतःला इतरांपेक्षा वेगळी समजते. कोणत्याही प्रकारच्या वर्णद्वेष तसेच जातिभेदाला थारा नसलेल्या व तमाम जातिपंथांमध्ये एकोपा असलेला हिंदू समाज असणे हे संघाला अपेक्षित आहे. हे साध्य करताना अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करून उरलेल्या हिंदू परंपरांचे संवर्धन व्हावे असे संघाचे धोरण आहे.
भारतीयत्व, राष्ट्रीयत्व, हिंदुत्व, या गोष्टींचा सर्वसामान्यांमध्ये अभिमान जागृत करणे व भारत देशाला परमवैभवाकडे नेणे हे आपले कर्तव्य आहे असे संघकार्यकर्ते समजतात..
फाळणीनंतर तुकडे झालेल्या हिंदुस्थानचे एकत्रीकरण होऊन परत अखंड भारताची निर्मिती व्हावी अशी संघाची मनीषा आहे.
संरचना
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक शाखांमध्ये स्वयंसेवक दैनंदिन हजरी लावतात. सरसंघचालक हे या सर्व शाखांचे अप्रत्यक्षपणे नियंत्रण करतात.. सरसंघचालकाचे पद हे नियुक्तीने भरले जाते. जुने सरसंघचालकच आपला उत्तराधिकारी निवडतात. संघाच्या शाखा दररोज सकाळी व सायंकाळी १-२ तास सार्वजनिक ठिकाणी भरतात. सध्या संपूर्ण भारतात साधारणत: ५,००,००० शाखा चालतात, असे सांगितले जाते. या शाखा संघाच्या बांधणीचा मूळ पाया आहेत.
शाखा
वर नमूद केल्याप्रमाणे शाखा ही संघाच्या रचनेतील महत्त्वात्वाचे अंग आहे. शाखा मोकळ्या पटांगणांवर, शाळेच्या मैदानांवर, मंदिरांबाहेरील मोकळ्या जागेत वा वस्तीतील मोकळ्या जागेत भरतात. सकाळी भरणार्या शाखेस प्रभातशाखा तर सायंकाळी भरणार्या शाखेस सायंशाखा असे म्हणतात. प्रभात शाखेत मुख्यत्वे प्रौढ लोकांचा भरणा जास्त असतो, तर सायंशाखेत लहान मुले, बाल व तरुण असतात. शाखेची नियमित वेळ १ तासाची असते. सायंशाखेची वेळ बहुतकरून ५ ते ६, ६ ते ७ किंवा ६.३० ते ७.३० अशी असते. प्रत्येक भागातील शाळांच्या वेळा विचारात घेऊन सोईची वेळ ठेवतात. शाखेची सुरुवात भगवा ध्वज उभारून त्याला प्रणाम करून होते. या नंतर विविध प्रकारचे मैदानी खेळ खेळले जातात. शाखेत योगासने योग, कसरतीचे खेळ वगैरे असतातच पण याशिवाय, ज्यात विविध सामाजिक विषयाछी माहिती देऊन चर्चा करता येईल अशी बौद्धिके असतात. शैक्षणिक बौद्धिकांमध्ये बहुधा शैक्षणिक भारताचा इतिहास, भारतीय तत्त्वज्ञान, भारतीय संस्कृती इत्यादि विषय हाताळले जातात. यानंतर पद्य म्हणले जाते व शेवटी भारतमातेची प्रार्थना म्हणून ध्वज उतरवला जातो व त्या दिवसाच्या शाखेच्या बैठकीची सांगता होते.
शाखेमध्ये स्वतःचा वाद्यवृंद असतो. त्याला 'घोष' म्हणतात. त्यामध्ये अनेक दले असतात. स्वयंसेवकांचे जेव्हा मोठ्या संख्येने संचरण होते तेव्हा ‘आनक दल' सर्वात पुढे असते. त्यानंतर क्रमाने 'पणव दल’, 'त्रिभुज दल', 'जल्लरी दल, 'वंशी दल’, 'शृंग दल, ही दले असतात आणि सर्वात शेवटी 'शंख दल'. प्रत्येक दलात एक दलप्रमुख असतो. संचलनात अग्रभागी एक स्वयंसेवक असतो. त्याच्या हातात घोषदंड असतो. त्याला 'घोषप्रमुख' म्हणतात.
संघाच्या उपलब्धी
संघाने समाजातील विविध कार्यांत आपले अस्तित्व दाखवले आहे.. उदाहरणार्थ १९६२ च्या भारत-चीन युद्धामध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू इतके प्रभावीत झाले की त्यांनी संघातील स्वयंसेवकांना जानेवारी २६, १९६३ च्या प्रजासत्ताक दिनाच्या मिरवणुकीला निमंत्रित केले. केवळ २ दिवसांच्या पूर्वसूचनेनंतरसुद्धा ३०००पेक्षा जास्त स्वयंसेवक संघाच्या मिरवणुकीला हजर राहिले. अलीकडील काळात संघातील विचारसरणीने तयार झालेल्या लोकांनी उच्च राजकीय पदे मिळवलेली दिसतात. उदाहरणार्थ उपराष्ट्रपती भैरव सिंग शेखावत, पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, गृहमंत्री लाल कृष्ण अडवाणी इत्यादी लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते.
टीका
इ.स. १९४८ मध्ये संघावर गांधीहत्या प्रकरणामुळे बंदी घालण्यात आली होती.. महात्मा गांधींवर हल्ला करणारानथुराम गोडसे हा संघाचा जुना स्वयंसेवक असल्यामुळे असे करण्यात आले. पण झालेल्या तपासणीत संघ निर्दोष असल्याचे सिद्ध झाले व बंदी उठवण्यात आली.
काही टीकाकार संघाच्या विचारसरणीवर हिंदू हुकूमशाही म्हणून टीका करतात. तर संघाच्या समर्थकांची मुख्य मागणी सरकारने अल्पसंख्यकांचे लाड थांबवावेत अशी आहे उदाहरणार्थ: हिंदू मंदिरे सरकारच्या ताब्यात पण मशिदींवर आणि चर्चवर कोणतीही बंधने नाहीत, शाह बानो खटल्याची गैरहाताळणी, ज्याअन्वये कोणत्याही भारतीय नागरिकाला काश्मीरमध्ये वसण्यालार बंदी करणारे घटनेतील ३७०वेकलम, सर्वधर्मियांसाठी आज अस्तित्वात नसलेला समान नागरी कायदा, हज यात्रेला दिलेली अवाजवी सूट आणि लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रम मुस्लिम मतदार दुखावतील म्हणून न चालवणे इत्यादी मागण्या ्राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आहेत.. टीकाकार असे म्हणतात की हे मुद्दे मुस्लिम द्वेष पसरवतात आणि हिंदूंना अनुकूल अशा हिंदू कुटुंबांना मिळणारी करामधील सूट, हिंदू यात्रांना मिळणारी अर्थिक मदत इत्यादी गोष्टी विसरतात.
संघाची ऐतिहासिक भूमिका अशी आहे की हिंदूंवर त्यांच्याच भूमीवर अन्याय होत आला आहे आणि संघ केवळ हिंदूंच्या नैसर्गिक हक्कांची मागणी करत आहे. टीकाकार म्हणतात की संघ भारताचा निधर्मवादी पाया बदलू पाहतो आहे. या गोष्टीशी बाबरी मशिदीचा मुद्दा संबंधित होता. काही हिंदू लोक असे म्हणत होते की बाबराने मशीद बांधण्याआधी त्या ठिकाणचे मंदिर तोडले होते. ती जागा रामजन्मभूमी होती. तर टीकाकार असे म्हणतात की संघ केवळ वाद तयार करू पाहतो आहे, कारण अयोध्येत अशी बरीच मंदिरे आहेत जी रामजन्मभूमी म्हणून ओळखली जातात. इ.स. २००३ मध्ये भारतीय पुरातत्त्व विभागाने केलेल्या विवादास्पद अभ्यासात असे निष्पन्न झाले की मशिदीच्या ठिकाणी पूर्वी मंदिरासारखी इमारत होती.
संघ प्रेरणेतून तयार झालेल्या संस्था
- भारतीय जनसंघ
- भारतीय जनता पक्ष (पूर्वीचा भारतीय जनसंघ)
- भारतीय मजदूर संघ
- सेवा भारती
- विद्या भारती
- स्वदेशी जागरण मंच
- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद
- हिंदू स्वयंसेवक संघ
- विश्व हिंदू परिषद
- वनवासी कल्याण आश्रम
आजवरचे सरसंघचालक
- डॉ. केशव बळीराम हेडगेवार
- माधव सदाशिव गोळवलकर गुरूजी
- मधुकर दत्तात्रेय देवरस (बाळासाहेब देवरस)
- प्रा. राजेंद्रसिंहजी (रज्जुभैय्या)
- के.सी.सुदर्शन
- डॉ मोहन मधुकर भागवत- २१ मार्च २००९ पासून
प्रार्थना
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम् ।
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे
पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।।
प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता
इमे सादरं त्वां नमामो वयम्
त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम्
शुभामाशिषं देहि तत्पूर्तये ।
अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिम्
सुशीलं जगद्येन नम्रं भवेत्
श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गम्
स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत् ।।२।।
समुत्कर्षनिःश्रेयस्यैकमुग्रम्
परं साधनं नाम वीरव्रतम्
तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा
हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् ।
विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्
विधायास्य धर्मस्य संरक्षणम् ।
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम्
समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ।।३।।
।। भारत माता की जय ।।
अर्थ : हे वत्सल मातृभूमे, मी तुला सदैव नमस्कार करतो. हे हिन्दुभूमे, तू माझे सुखाने पालनपोषण केलेले आहेस. हे महामंगलमयी पुण्यभूमे, तुझ्यासाठी माझा हा देह समर्पण होवो. मी तुला पुनःपुन्हा वंदन करतो.
हे सर्व शक्तिमान परमेश्वरा, हिंदुराष्ट्राचे आम्ही पुत्र तुला सादर प्रणाम करतो. तुझ्याच कार्यासाठी आम्ही कटिबद्ध झालो आहोत. त्या कार्याच्या पूर्ततेसाठी आम्हाला तू शुभाशीर्वाद दे. हे प्रभू, आम्हाला अशी शक्ती दे की, जिला आव्हान देण्याचे धैर्य जगातील अन्य कुणा शक्तीला व्हावयाचे नाही, असे शुद्ध चारित्र्य दे की, ज्या चारित्र्यामुळे संपूर्ण विश्व नतमस्तक होईल आणि असे ज्ञान दे की, ज्यामुळे आम्ही स्वतः होऊन पत्करलेला हा काट्याकुट्यांनी भरलेला मार्ग सुगम होईल.
उच्च असे आध्यात्मिक सुख आणि महानतम अशी ऐहिक समृद्धी प्राप्त करण्याचे एकमेव श्रेष्ठतम असे साधन असलेली उग्र अशी वीरव्रताची भावना आमच्यात सदैव उत्स्फूर्त होत राहो. तीव्र आणि अखंड अशी ध्येयनिष्ठा आमच्या अंतःकरणात सदैव जागती राहो. तुझ्या कृपेने आमची ही विजयशालिनी संघटित कार्यशक्ती आमच्या धर्माचे संरक्षण करून या राष्ट्राला वैभवाच्या उच्चतम शिखरावर पोहोचविण्यास समर्थ होवो.
।। भारत माता की जय ।।
हे पहा
- हिंदुत्व
- विश्व हिंदू परिषद
- बजरंग दल
- भारतीय जनता पक्ष
- राष्ट्रवाद
- ऑर्गनायझर (संघाचे आंग्लभाषीय मुखपत्र)
- पांचजन्य (संघाचे राष्ट्रभाषीय (हिंदी) मुखपत्र)
बाह्य दुवे
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकृत संकेतस्थळ
- अटल बिहारी वाजपेयींचे "संघ माझा प्राण"
- संघाची ध्येयदृष्टी
- संघाचे पराक्रम
- संघ आणि अल्पसंख्याक
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक निबंध
- संघ आणि हिंदू आतंकवाद
- डॉ. कोएंराड एल्स्ट यांच्या हिंदू राष्ट्रवादावरील पुस्तकातील एक प्रकरण
संघ प्रेरणेतून तयार झालेल्या संस्था
- सेवा भारती
- विद्या भारती
- स्वदेशी जागरण मंच
- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद
- हिंदू स्वयंसेवक संघ
- विश्व हिंदू परिषद
- भारत विकास परिषद
- एकल विद्या
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |