अखंड भारत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अखंड भारत

अखंड भारत ही संकल्पना आहे. या संकल्पनेत भारताचे भौगोलिकदृष्ट्या एकीकरण होणे अपेक्षित आहे. प्राचीन कालापासून भारत देश हा अनेक प्रांत, राज्ये, संस्थाने, साम्राज्ये यात विभागला गेला आहे, याचे एकत्रीकरण कमी वेळा झाले.

अखंड भारत या संकल्पनेत, सद्य भारत तसेच पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, ब्रम्हदेश, अफगाणिस्तान, भूतान, तिबेट, श्रीलंका आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखंड भारताचे एकत्रीकरण करणे हे एक उद्दिष्ट आहे. १४ ऑगस्ट हा दिवस अखंड भारत दिन म्हणून संघात साजरा केला जातो. हा दिवस इस्रायल स्थापन होण्यापूर्वी ज्यू लोक पाळत असलेल्या वार्षिक समारोहाप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे वर्षातून एक दिवस ज्यू लोक पुढील वर्षी इस्रायल म्हणून प्रतिज्ञा घेत. तसेच काहीसे स्वरूप या दिनानिमित्त संघातील शाखेत पाळतात.