Jump to content

"कोथिंबीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Koeh-193.jpg|250px|right|thumb|कोथिंबीरीचे झाडाचे अवयव व फळे]]
[[चित्र:Koeh-193.jpg|250px|right|thumb|कोथिंबीरीचे झाडाचे अवयव व फळे]]
एक प्रकारची [[वनस्पती]], जी [[अन्न|अन्न]]स्वाद वर्धनासाठी कच्ची अथवा शिजवून खाल्ली जाते. उदाहरणार्थ [[मिसळ पाव]] अथवा [[पोहे]] यावरती कच्ची कोथिंबीर चिरून घातली जाते.
'''कोथिंबीर''' (इंग्रजी नाव Coriander, हिंदी नाव: धनिया), शास्त्रीय नाव: कोरिअँड्रम सॅटिव्हम. जी [[अन्न|अन्नाचा]]स्वाद वाढवण्यासाठी कच्ची अथवा शिजवून खाल्ली जाते, अशा एका प्रकारची ही [[वनस्पती]] आहे. उदाहरणार्थ, [[मिसळ पाव]] अथवा [[पोहे]] यावरती कच्ची कोथिंबीर चिरून घातली जाते.
== वनस्पती ==
== वनस्पती ==
*ही [[वनस्पती]] [[वर्षायू]] (जीवनकाल - एक वर्ष) असते.
*ही [[वनस्पती]] [[वर्षायू]] (जीवनकाल - एक वर्ष) असते.

१३:४२, १८ जून २०११ ची आवृत्ती

कोथिंबीरीचे झाडाचे अवयव व फळे

कोथिंबीर (इंग्रजी नाव Coriander, हिंदी नाव: धनिया), शास्त्रीय नाव: कोरिअँड्रम सॅटिव्हम. जी अन्नाचास्वाद वाढवण्यासाठी कच्ची अथवा शिजवून खाल्ली जाते, अशा एका प्रकारची ही वनस्पती आहे. उदाहरणार्थ, मिसळ पाव अथवा पोहे यावरती कच्ची कोथिंबीर चिरून घातली जाते.

वनस्पती

  • ही वनस्पती वर्षायू (जीवनकाल - एक वर्ष) असते.
  • पाने दोन प्रकारची असतात. खालची पाने लांब देठाची, विषमदली व अपूर्ण पिच्छाकृती (पिसासारखी) असून त्यांचे तळ खोडाला वेढणारे असते, तर वरची पाने आखूड देठाची, अपूर्ण पिच्छाकृती व खंडित असतात. खोड पोकळ असते.
  • फुले लहान, पांढरी किंवा गुलाबी-जांभळी असून संयुक्त चामरकल्प (छत्रीसारख्या) फुलोर्‍यात येतात.
  • फळे पिवळट, गोलाकार व शिरा असलेली असून ती दोन सारख्या भागांत विभागतात. प्रत्येक भागात एकेक बी असते. फळाला धणा म्हणतात.

उपयोग

  • कोथिंबिरीची पाने चवीला किंचित तिखट व स्तंभक असून उचकी, दाह, कावीळ इत्यादींवर गुणकारी असतात, असा आयुर्वेदात उल्लेख आढळतो.
  • फळे मूत्रल, वायुनाशी, उत्तेजक, पौष्टिक व दीपक (भूक वाढवणारे) आहेत. शूल(पोटातील वेदना) व रक्ती मूळव्याध यांवर धण्यांचा काढा देतात.
  • अधिहर्षतेमुळे (अ‍ॅलर्जीमुळे) होणार्‍या दाहावर पानांचा रस आणि लेप गुणकारी असतो.
  • या वनस्पतीमध्ये असलेल्या सुगंधी उडनशील तेलांमुळे, या वनस्पतीला सुगंध असतो. हिची वाळलेली फळे म्हणजे धणे मसाल्यांत वापरतात. घटक - यात लोहाचे प्रमाण जास्त असते.