उचकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. नेहमी होणाऱ्या चुकांबद्दल या पानावर माहिती आहे. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.


शरीरातील क्रिया[संपादन]

उचकीआवाज

उचकी लागणे म्हणजे छातीपोट यामधील पडदा (मध्यपट-Diaphragm) आणि बरगड्यांमधील स्नायू यांचे आकुंचन होणे व त्याचवेळेस स्वर यंत्रातील स्वरतंतु व्होकल कॉर्ड एकमेकांजवळ येणे. हे कार्य मज्जा संस्थेचे असते.मेंदूतून येणाऱ्या व्हेगस व फ्रेनिक या मज्जा तंतुच्या नसा उचकी लागण्यास महत्त्वाचे कार्य करतात. व्हेगस या नसेतून अन्ननलिकाजठराच्या आतील भागातुन संवेदना मेंदूकडे जातात.त्याने एका प्रक्षेपित क्रियेची सुरवात होते. छातीपोट यामधील पडदा (डायफ्राम) व बरगड्यांमधील काही स्नायू आकस्मित कार्यान्वित होतात व स्वरतंतु जवळ येतात. डायफ्रामच्या आकुंचनामुळे फुफ्फुसातील हवा श्वासनलिकेतून बाहेर टाकल्या जाते व स्वरतंतु जवळ-जवळ आल्यामुळे आवाज होतो. हीच उचकी होय.

कारणे[संपादन]

 • जठर, अन्ननलिका वा घश्याच्या आतील भागातील सुज.
 • जलद गतीने अन्न गिळणे.
 • जास्त मद्य प्राशन
 • खूप तिखट व मसालेदार पदार्थाचे सेवन
 • अती थंड वा अती गरम पदार्थ खाणे
 • मानसिक ताण,चिंता
 • यकृतास सुज

उपाय[संपादन]

 1. सुंठ पाण्यात उगाळून हुंगल्याने उचकी थांबते.
 2. आल्याचे लहान लहान तुकडे करून चघळावे.
 3. पेटलेल्या कोळशावर कापूर टाकून हुंगल्याने उचकी थांबते.
 4. सुंठ पाण्यात उगाळून हुंगल्याने उचकी थांबते.[१]

वारंवारता[संपादन]

माणसास एका मिनीटात चार-पाच वेळा ते पन्नास साठ वेळा अशी उचकी लागु शकते.

समज[संपादन]

कुण्या प्रिय व्यक्तिने आठवण केली असता उचकी लागते असा समज आहे.

मनोरंजन क्षेत्रातील वापर[संपादन]

नाटक, तमाशा व चित्रपटात उचकी वर आधारित गाणे असतात.'मला लागली कुणाची उचकी' हे गाणे प्रसिद्ध आहे.


संदर्भ[संपादन]


 1. ^ Webdunia. "उचकी थांबवायची आहे तर करा हे उपाय…". marathi.webdunia.com (इंग्रजी भाषेत). 2019-01-08 रोजी पाहिले.