मूळव्याध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मुळव्याध

व्याख्या :-

गुदद्वाराच्या आतल्या व बाहेरच्या भागातील फुगलेल्या व सुजलेल्या दुखणाऱ्या रक्तवाहिन्यांना मुळव्याध असे म्हणतात.[१]

या रोगास संस्कृतमध्ये 'अर्श' असे नाव आहे. यामध्ये दोन प्रकारचे रोग आहेत – विनारक्तस्राव व रक्तास्रावासहित. या रोगात गुदद्वाराच्या सभोवताल आतमध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात त्या बाहेर येतात. त्याने तेथे सतत ठणकल्यागत वेदना होते. क्वचित रक्तस्राव पण होतो. काटा टोचत आहे अशी भावना होते. अधिक रक्तस्राव झाल्यास रक्त कमतरता (अनिमिया) निर्माण होते. गुदद्वाराची आकुंचन क्षमता क्रमशः नष्ट होत जाते. पुष्कळ काळ लोटल्यावर मग संग्रहणी हा रोग पण होऊ शकतो. या अवघड जागेच्या दुखण्याचा संबंध संपूर्ण पचनसंस्थेशी आहे. भारतात आजघडीस (सन २०१७) साधारणतः ४ कोटी लोकांना हा आजार आहे आणि दरवर्षी या आजाराचे १० लाख रुग्ण नव्याने तयार होत असतात. काही काळापूर्वी मुळव्याध हा साधारण चाळीशीनंतर उद्भवणारा आजार होता. पण, आता १८ ते २५ या वयोगटातील स्त्री- पुरुषांनाही मुळव्याध होऊ लागली आहे. एकूण रुग्णांपैकी १० ते १२ टक्के रुग्ण हे १८ ते २५ वयोगटातील आहेत. दरवर्षी २० नोव्हेंबर हा दिवस जगभर जागतिक मुळव्याध दिन म्हणून साजरा होत असतो. हा रोग कोणालाही सहजपणे होतो म्हणुन व्यायाम करा, त्यामुळे पचन सुधारते.[१]

(संदर्भ लिंक ह्या दिलेल्या संदर्भाविषयी असतात. संदर्भ स्रोत नोंदवण्यासाठी विकिपीडिया नियमांचा वापर करावा. येथे अप्रमाणित केलेली website URL देऊ नयेत.)

पूर्वरूप[संपादन]

सूज येणे, अग्निमांद्य, अन्न न पचणे, बलहानी, पोटात गुडगुड आवाज येणे, पोटाचा रोग झाला आहे असे वाटणे, गुडघेदुखी इत्यादी.[२]

कारणे[संपादन]

बद्धकोष्ठता- शौचविधीच्या वेळेस जोर करणे, कुंथण्यामुळे मुळव्याध होऊ शकते. व्यायामाचा अभाव, आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता, कडक मलप्रवृत्ती, मलावरोध, सतत अति उष्ण(गुणाने) पदार्थ खाणे, वातकारक व रुक्ष पदार्थ खाणे, अतितिखट सेवन, सतत बैठे काम, अनियमित दिनचर्या, रक्तदोष, वेळच्यावेळी शौचास न जाणे, अति जागरण तसेच व्यायामाचा अभाव, मधुमेह, वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे दौर्बल्य, गर्भारपण, आमांश अशा अनेक बाबींमुळे गुदद्वारावर जोर द्यावा लागतो.

उपचार[संपादन]

हिरव्या पालेभाज्या, कोशिंबिरी, फळे असे चोथायुक्त पदार्थ आहारात भरपूर प्रमाणात घेणे आवश्यक असते. दही, ताक याचा वापर करणे, रोज भरपूर पाणी पिणे, नाश्ता व जेवण वेळच्यावेळी घेणे हे आवश्यक असते. हा रोग अनेक दिवस लपविला जातो त्यामुळे तो वाढल्यावर लोकं उपचारासाठी धावतात.अ‍ॅलोपॅथीमध्ये शस्त्रक्रिया हा उपचार आहे.

  • सुरणाचा कंद आणून त्याची वरची साल काढून टाकावी. आतील गुलाबी भागाच्या बटाट्यासारख्या काचऱ्या करून त्या गाईच्या तुपात परताव्यात व खाव्यात. यात मीठ टाकू नये.नंतर अधूनमधून ही भाजी खात जावी.
  • रात्री एका वाटीत १ चमचा तूप गरम करुन, पातळ करून त्यात साखर घालावी.त्यात अर्धा वाटी पाणी घालून ते प्यावे. सकाळी त्रास कमी होतो.
  • ताजे लोणी खावे. ताजे ताक प्यावे.(आंबट नव्हे.)
  • रक्तस्राव असल्यास निरंजनचे फळ आणून ते पाउण पेला पाण्यात रात्री भिजू घालावे.सकाळी ते फळ त्याच पाण्यात कुस्करुन ते पाणी प्यावे.असे दोन्ही वेळेस करावे.(सकाळी व रात्री)
  • इसबगोलचा भुसा आणून त्यात पाणी घालून रात्री भिजत ठेवावे व सकाळी ते गाळून प्यावे.
  • उपचार पद्धतीत शस्त्रक्रिया हा शेवटचा उपाय असतो.

संदर्भ[संपादन]

  1. ^ सौ. अपर्णा गौरव, गौर. मुळव्याध लक्षण, कारणे व उपाय. वरदा प्रकाशन प्रा. लि. पुणे. 
  2. ^ सौ. अपर्णा गौरव, गौर. मूळव्याध लक्षण, कारणे व उपाय. वरदा प्रकाशन प्रा. लि. पुणे.