Jump to content

"कासव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १: ओळ १:
'''कासव''' हा एक [[उभयचर प्राणी]] आहे. कासवांचे आयुष्य सुमारे १५० वर्षांपेक्षा जास्त असते. कासव हा जैवसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे. कासवाच्या शरीराचे शीर्ष, मान, धड आणि शेपूट असे चार प्रमुख भाग असतात.
'''कासव''' हा एक [[उभयचर प्राणी]] आहे. कासवांचे आयुष्य सुमारे १५० वर्षांपेक्षा जास्त असते. कासव हा जैवसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे. कासवाच्या शरीराचे शीर्ष, मान, धड आणि शेपूट असे चार प्रमुख भाग असतात.
== कासवांचे प्रकार ==
== कासवांचे प्रकार ==
=== जमीनीवरील कासव ===
=== जमिनीवरील कासव ===
याला इंग्रजीत Tortoise म्हणतात. हे पोट आणि पाठ या दोन्ही बाजूंनी टणक असते. याच्या बोटांमध्ये पडदे नसतात.

=== समुद्री कासव ===
=== समुद्री कासव ===
समुद्रात राहणार्‍या कासवांना समुद्री अथवा सागरी कासव असे म्हणतात. ही कासवे समुद्रतळ स्वच्छ राखून समुद्री पर्यावरणाचा समतोल राखतात. या कासवांच्या सात प्रमुख प्रजाती आजवर आढळल्या आहेत. यातील पाच प्रकारची कासवे भारतीय उपखंडात आढळून येतात. पैकी चार जाती [[भारत|भारताच्या]] [[समुद्र किनारा|समुद्री किनार्‍यावर]] आढळून येतात.
समुद्रात राहणार्‍या कासवांना समुद्री अथवा सागरी कासव असे म्हणतात. ही कासवे समुद्रतळ स्वच्छ राखून समुद्री पर्यावरणाचा समतोल राखतात. या कासवांच्या सात प्रमुख प्रजाती आजवर आढळल्या आहेत. यातील पाच प्रकारची कासवे भारतीय उपखंडात आढळून येतात. पैकी चार जाती [[भारत|भारताच्या]] [[समुद्र किनारा|समुद्री किनार्‍यावर]] आढळून येतात.

१८:२४, ५ एप्रिल २०११ ची आवृत्ती

कासव हा एक उभयचर प्राणी आहे. कासवांचे आयुष्य सुमारे १५० वर्षांपेक्षा जास्त असते. कासव हा जैवसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे. कासवाच्या शरीराचे शीर्ष, मान, धड आणि शेपूट असे चार प्रमुख भाग असतात.

कासवांचे प्रकार

जमिनीवरील कासव

याला इंग्रजीत Tortoise म्हणतात. हे पोट आणि पाठ या दोन्ही बाजूंनी टणक असते. याच्या बोटांमध्ये पडदे नसतात.

समुद्री कासव

समुद्रात राहणार्‍या कासवांना समुद्री अथवा सागरी कासव असे म्हणतात. ही कासवे समुद्रतळ स्वच्छ राखून समुद्री पर्यावरणाचा समतोल राखतात. या कासवांच्या सात प्रमुख प्रजाती आजवर आढळल्या आहेत. यातील पाच प्रकारची कासवे भारतीय उपखंडात आढळून येतात. पैकी चार जाती भारताच्या समुद्री किनार्‍यावर आढळून येतात.

  • ऑलिव्ह रिडले कासव - हे प्रसिद्ध आहे. या कासवाचे नाव त्यांना असलेला तपकिरी रंग आणि एकत्रित एकाच काळात अंडी घालण्याच्या पद्धतीमुळे यांना हे नाव मिळाले आहे. अंडी घालण्याच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने मादी कासवे एकत्रित येतात. भारतात ओरिसाच्या गोहिरमाथा समुद्र किनार्‍यावर ही कासवे मोठ्या प्रमाणात आढळतात. ही कासवे पूर्व - पश्चिम किनार्‍यावरही आढळतात. पूर्वी या कासवांची अंडी शोधून खाऊन टाकली जात असत. परंतु त्यांची संख्या अत्यंत घटल्याने यावर बंदी आणण्यात आली. तसेच मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात आली. कोकण किनार्‍यावरही ही कासवे आढळून येतात.
  • हिरवे कासव (ग्रीन टर्टल) - या कासवाची पाठ गुळगुळीत असते. तसेच पाठ अतिशय टण्क असते. या कासवांच्या पोटाचा रंग पिवळट पांढरा असतो. या कासवांच्या शरीराच्या मानाने डोक्याचा आकार छोटा असतो. भारताच्या पश्चिम आणि पूर्व किनाऱ्यावर यांचा आढळ आहे.
  • चोच कासव - (हॉक्स बिल टर्टल) या कासवांच्या तोंडाचा आकार चोचीसारखा असतो. त्यामुळे त्यांना चोच कासव म्हणतात. ही छोट्या आकाराची कासवांची जात आहे. आपली घरटी ही कासवे एकांत असलेल्या ठिकाणी बांधणे पसंत करतात. स्पंज, माखले, झिंगे हे त्यांचे खाद्य असते. भारतात यांचा आढळ अंदमान, निकोबार आणि लक्षद्वीप बेटांवर आहे.
  • चामडी पाठीचे कासव - (लेदर बॅक टर्टल) - समुद्री कासवांमधील यांचा आकार सर्वात मोठा असतो. यांची जास्तीतजास्त लांबी १७० सें.मी. आढळली आहेत तसेच ५०० कि.ग्रॅ. वजन आढळून आले आहे. या कासवाची पाठ एका पातळ मउ आवरणाने आच्छादलेली असते. यांचा जबडा नाजूक कात्रीसारखा असतो. जेली फिशहे यांचे आवडते खाद्य आहे. भारतात यांचा आढळ अंदमान आणि निकोबार बेटांवर आहे.

तेल गळतीसारखे अपघात, यांत्रिक मासेमारीच्या जाळ्यात कासव अडकून मृत्यू, मानवाकडून किनारी भागांचा विध्वंस, कासवांच्या पाठींचा दागिन्यांसाठी वापर, अशा अनेक कारणामुळे समुद्री कासवांची संख्या कमी होते आहे. कासवांच्या सातही प्रमुख प्रजाती जाती सध्या धोकादायक जाती कायद्याच्या परिघात येतात. समुद्री कासवांना पकडणे बेकायदेशीर आहे.

संवर्धन

  • फेब्रुवारी व मार्च महिन्यात रत्नागिरी येथे ‘समुद्री कासव महोत्सव’ साजरा केला जातो. यावेळी कासवांची माहिती आणि ऑलिव्ह रिडले कासव पिलांच्या जन्माचा समुद्राकडे जाण्याचा सोहळा पाहण्याची संधी असते.
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वायंगणी येथे ऑलिव्ह रिडले सागरी कासवांचे प्रजनन व संवर्धन केंद्र
  • आंतरराष्ट्रीय समुद्री कासव सोसायटी

चित्रदालन

बाह्य दुवे

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.