"द्रौपदी मुर्मू" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) |
||
ओळ ९१: | ओळ ९१: | ||
[[वर्ग:भारतीय महिला राजकारणी]] |
[[वर्ग:भारतीय महिला राजकारणी]] |
||
[[वर्ग:ओडिशा राज्याच्या संवैधानिक व्यक्ती]] |
[[वर्ग:ओडिशा राज्याच्या संवैधानिक व्यक्ती]] |
||
[[वर्ग:ओडिशामधील व्यक्ती]] |
|||
[[वर्ग:आदिवासी महिला]] |
|||
[[वर्ग:ओडिसा विधानसभेचे सदस्य]] |
१८:१६, २२ जून २०२२ ची आवृत्ती
द्रौपदी मुर्मू | |
झारखंडच्या राज्यपाल
| |
कार्यकाळ १८ मे २०१५ – १२ जुलै २०२१ | |
मागील | सय्यद अहमद |
---|---|
पुढील | रमेश बायस |
जन्म | २० जून, १९५८ बैदापोसी, मयूरभंज जिल्हा, ओडिशा |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
पती | शामचरण मुर्मू |
अपत्ये | ३ |
शिक्षण | कला शाखेतील पदवी |
गुरुकुल | रमादेवी वुमन्स युनिव्हर्सिटी, भुवनेश्वर |
द्रौपदी मुर्मू (जन्म: २० जून, १९५८) ह्या एक भारतीय महिला राजकारणी आहेत. त्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्या आहेत. इ.स. २०२२ च्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी त्या भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या अधिकृत उमेदवार आहेत.[१][२] त्यांनी यापूर्वी २०१५ ते २०२१ या कालावधीत झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून काम पाहिले होते. त्या मूळ ओडिशा राज्यातील आहेत. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार्या झारखंडच्या त्या पहिल्या राज्यपाल आहेत आणि भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी नामनिर्देशित होणारी अनुसूचित जमातीची (आदिवासी) पहिली व्यक्ती आहेत.
वैयक्तिक आयुष्य
द्रौपदी मुर्मूचा जन्म २० जून १९५८ रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी गावात बिरांची नारायण तुडू येथे झाला.[३][४] त्यांचे वडील आणि आजोबा दोघेही पंचायती राज प्रणाली अंतर्गत गावप्रमुख होते.[५]
द्रौपदी मुर्मूने श्याम चरण मुर्मूशी लग्न केले. या जोडप्याला दोन मुलं आणि एक मुलगी असून पैकी मुले मरणपावली आहेत.[६]
कारकीर्द
राजकारणात येण्यापूर्वी मुर्मू यांनी शाळेतील शिक्षिका म्हणून सुरुवात केली होती.
स्थानिक राजकारण
मुर्मू १९९७ मध्ये रायरंगपूर नगर पंचायतीचे नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा म्हणूनही काम केले आहे.
ओडिशातील भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल युती सरकारच्या काळात, त्या ६ मार्च २००० ते ६ ऑगस्ट २००२ पर्यंत वाणिज्य आणि परिवहन राज्यमंत्री तर ६ ऑगस्ट २००२ ते १६ मे २००४ पर्यंत मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री होत्या.[७] २०००-२००४ आणि २००४-२००९ मध्ये रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत.[८] त्यांना २००७ मध्ये ओडिशा विधानसभेने 'सर्वोत्कृष्ट आमदार' म्हणून नीलकंठ पुरस्काराने सन्मानित केले.
राज्यपालपद
त्या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या.[९][१०] भारतातील राजकारणात राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या ओडिशातील त्या पहिल्या महिला आणि पहिल्या आदिवासी नेत्या आहेत.
२०२२ ची राष्ट्रपती पदाची निवडणूक
जून २०२२ मध्ये, पुढील महिन्यात २०२२ च्या निवडणुकीसाठी भाजपने मुर्मू यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे भारताच्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे.[११]
संदर्भ
- ^ "Draupadi Murmu, Former Jharkhand Governor, Is BJP's Choice For President". NDTV.com. 2022-06-21 रोजी पाहिले.
- ^ "BJP-led NDA names Draupadi Murmu, former governor of Jharkhand as candidate for presidential polls". Moneycontrol (इंग्रजी भाषेत). 2022-06-21 रोजी पाहिले.
- ^ "Smt. Droupadi Murmu". Odisha Helpline. 8 October 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 July 2015 रोजी पाहिले.
- ^ "Draupadi Murmu may soon be the President of India: Know all about her". indiatoday.
- ^ "Governor reaches out". Hindustan. Ranchi. 4 April 2018.
- ^ "Who is Draupadi Murmu?". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2017-06-13. 2022-06-22 रोजी पाहिले.
- ^ "Draupadi Murmu Jharkhand Guv". New Indian Express. 2015-05-13 रोजी पाहिले.
- ^ "Narendra Modi government appoints four Governors". IBN Live. 2015-05-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-05-12 रोजी पाहिले.
- ^ "Draupadi Murmu sworn in as first woman Governor of Jharkhand-I News – IBNLive Mobile". IBN Live. 18 May 2015. 18 May 2015 रोजी पाहिले.
- ^ "Modi government names new governors for Jharkhand, five NE states". The Times of India. 2015-05-12 रोजी पाहिले.
- ^ "Draupadi Murmu to be NDA's candidate for presidential polls | India News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-06-21 रोजी पाहिले.