Jump to content

"रा.ना. चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ७८: ओळ ७८:
[[वर्ग:इ.स. १९९३ मधील मृत्यू]]
[[वर्ग:इ.स. १९९३ मधील मृत्यू]]
[[वर्ग:दलित लेखक]]
[[वर्ग:दलित लेखक]]
[[वर्ग:आंबेडकरवादी]]
[[वर्ग:भारतीय बौद्ध]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]

२३:१२, १७ जानेवारी २०२१ ची आवृत्ती

रामचंद्र नारायण चव्हाण
जन्म २९ ऑक्टोबर, इ.स. १९१३
वाई
मृत्यू १० एप्रिल, इ.स. १९९३ (पुणे)
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण एफ. वाय परीक्षा पास
धर्म हिंदू
अपत्ये रवींद्रनाथ, शरच्चंद्र आणि रमेश
वडील नारायण कृष्णाजी चव्हाण
पुरस्कार
  • महाराष्ट्र शासनातर्फे 'दलितमित्र' पुरस्कार - १८८३
  • महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्यावतीने गौरववृत्ती (मानपत्र) - १९८९
  • मराठी साहित्य संमेलन सातारा येथे जाहीर सत्कार - १९९३

रामचंद्र नारायण चव्हाण (जन्म: वाई इ.स. १९१३ - मृत्यू: १० एप्रिल, इ.स. १९९३, पुणे) हे मराठी लेखक आणि दलित चळवळीतील व सत्यशोधक चळवळीतील विचारवंत होते. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले आणि त्यांचे ८००च्या वर वैचारिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचे चिरंजीव रमेश चव्हाण यांनी रानांवर 'रा.ना.चव्हाण यांचे विचारधन’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. मो.नि. ठोके यांनी रा.ना. चव्हाण यांचे निवडक वाङ्मय संपादित करून प्रकाशित केले आहे.

त्यांनी सर परशुराम महाविद्यालय, पुणे सन १९३६ - ३७ साली एफ.वाय. परीक्षा पास केली.

रा.ना. चव्हाण यांना रवींद्र, शरच्चंद्र आणि रमेश या नावाचे तीन पुत्र आहेत.

रा.ना. चव्हाण यांच्या १० एप्रिल या स्मृतिदिनी त्यांचा किंवा त्यांच्याविषयी दरवर्षी एक ग्रंथ प्रकाशित झाला आहे. असे प्रसिद्ध झालेले ग्रंथ
  • स्मृतिग्रंथ (रानांच्या आठवणी). (१९९४)
  • जनजागरण (रानांचे निवडक लेख). (१९९५)
  • सेवितो हा रस वांटितो अनेकां, भाग १ला (रानांचे धर्मचिंतनपर लेख) (१९९६)
  • सेवितो हा रस वांटितो अनेकां, भाग २रा (रानांचे धर्मचिंतनपर लेख)(१९९७)
  • सेवितो हा रस वांटितो अनेकां, भाग ३रा (रानांचे धर्मचिंतनपर लेख)(१९९८)
  • प्रबोधन (रानांचे ऐतिहासिक चिंतनपर लेख)(१९९९)
  • परिवर्तनाची क्षितिजे (रानांचे निवडक लेख) (२०००)
  • महर्षी शिंदे : शोध व बोध (२००१)
  • राजर्षी शाहू कार्य व काळ (२००२)
  • रा.ना. चव्हाण विचारबोध (संकलन-२००३)

रा.ना. चव्हाण यांचे साहित्य

  • चव्हाणांचा ब्राह्मधर्म व बहुजन समाज या नावाचा पहिला लेख वयाच्या २३व्या वर्षी प्रार्थना समाजाचे मुखपत्र असलेल्या सुबोधपत्रिकेत इ.स. १९३६ मध्ये प्रकाशित झाला.
  • अक्षरवेध (साहित्यसमीक्षा)
  • गौतम बुद्ध व त्याचे बौद्धदर्शन
  • ग्रामीण महाराष्ट्राची शिक्षण परंपरा - कर्मवीर भाऊराव पाटील आणि शिक्षणानंद बापूजी साळुंखे
  • जनजागरण
  • तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
  • परिवर्तनाची क्षितिजे
  • प्रबोधन
  • भारतीय संस्कृती व तिची वाटचाल (वैचारिक)
  • महर्षी शिंदे यांच्या आठवणी
  • महर्षी शिंदे : शोध व बोध
  • महात्मा फुले यांचा शोध व बोध
  • महात्मा फुले , सत्यशोधक समाज व सामाजिक प्रबोधन
  • महाराष्ट्र आणि मराठे
  • महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी राजारामशास्त्री भागवत
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर व दलित चळवळ, एक मागोवा
  • यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण
  • राजर्षी शाहू महाराज यांची सामाजिक विचारधारा व कार्य
  • लोकनेते राजर्षी शाहू महाराज, काळ आणि कार्य
  • शककर्ते श्रीराजा शिवछत्रपती, एक समाज प्रबोधक व परिवर्तनकार
  • सत्यशोधक जोतिबा फुले
  • सार्वजनिक सत्यधर्मसार
  • सेवितो हा रस वांटितो अनेकां (भाग १, २, ३)

पुरस्कार

  • महाराष्ट्र शासनातर्फे 'दलितमित्र' पुरस्कार - १८८३
  • महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्यावतीने गौरववृत्ती (मानपत्र) - १९८९
  • मराठी साहित्य संमेलन सातारा येथे जाहीर सत्कार- १९९३

बाह्य दुवे

  • जोंधळे, सुरेश. "रा. ना. चव्हाण: सत्यशोधक लेखक".