Jump to content

"अनुताई वाघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २३: ओळ २३:
{{DEFAULTSORT:वाघ, अनु}}
{{DEFAULTSORT:वाघ, अनु}}
[[वर्ग:मराठी समाजसेविका]]
[[वर्ग:मराठी समाजसेविका]]
[[वर्ग:इ.स. १९१० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९९२ मधील मृत्यू]]
[[वर्ग:भारतीय शिक्षणतज्ञ]]
[[वर्ग:आदिवासी]]
[[वर्ग:पुणे निवासी]]

१९:५६, २६ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती

अनुताई बालकृष्ण वाघ (जन्म : मोरगाव, पुणे, १७ मार्च १९१०; कोसबाड, २७ सप्टेंबर १९९२) या आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या समाजसेविकाशिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांनी शिक्षणाद्वारे आदिवासींच्या जीवनात जागृती निर्माण करण्याचे काम केले. पालघर जिल्ह्यातील कोसबाड येथे ताराबाई मोडक यांचेसोबत त्यांनी बालशिक्षणाचे कार्य केले.[]

शिक्षण व जीवन

अनुताईंचे वडील बालकृष्ण वाघ हे सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीस होते. वयाच्या तेराव्या वर्षी इ.स. १९२३ साली शंकर वामन जातेगावकर यांच्याशी अनुताईंचा विवाह झाला. परंतु सहा महिन्यांतच त्यांना वयाच्या तेराव्या वर्षी वैधव्य आले. असे असूनसुद्धा तत्कालीन सामाजिक रूढींचे बंधन झुगारून त्यांनी शिक्षण घेतले व शिक्षिका म्हणून काम करीत असताना त्यांना ताराबाई मोडक भेटल्या आणि त्यांनी ताराबाईंच्या बोर्डी (ठाणे) येथे आदिवासींसाठी असलेल्या ग्राम बाल शिक्षण केंद्रात प्रवेश केला व तेथे इ.स. १९४७ ते १९९२ अशी ४७ वर्षे त्यांनी निरपेक्ष वृत्तीने ग्रामशिक्षणाचे कार्य चालवले. पुढे कोसबाडच्या नूतन बाल शिक्षण केंद्राच्या चालक, राष्ट्रीय शिक्षण अनुसंधान व प्रशिक्षण मंडळाच्या कार्यकरिणी सदस्य, अखिल भारतीय पूर्व प्राथमिक शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांचे शिक्षणविषयक ग्रंथ इंग्रजी, हिंदी, गुजराथीतून अनुवादित झाले. प्रबोधनासाठी वाहिलेल्या शिक्षणपत्रिका व स्त्रीजागृतीसाठी असलेल्या ‘सावित्री’ मासिकाच्या त्या संपादिका होत्या.

पुरस्कार आणि सन्मान

भारताच्या केंद्र सरकारतर्फे साक्षरता प्रसारार्थ अनुताईंनी लिहिलेल्या सहजशिक्षण या पुस्तकास इ.स. १९८१ साली राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते.[] आदिवासींच्या शिक्षणासाठी अनेक संस्था स्थापन करून आयुष्य वेचणाऱ्या या अनुताईंना आदर्श शिक्षिका, दलितमित्र, आदर्श माता, फाय फाऊंडेशन, सावित्रीबाई फुले, बाल कल्याण राष्ट्रीय पुरस्कार, जमनालाल बजाज पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांबरोबरच पद्मश्री

ने सन्मानित केले गेले.[]

  • अनुताईंवरील माहितीपट

वाघ यांनी लिहिलेली पुस्तके

  • कोसबाडच्या टेकडीवरून (आत्मचरित्र)
  • दाभोणच्या जंगलातून
  • शिक्षणविषयक ग्रंथ (अनेक)
  • सईची सोबत (कथासंग्रह)
  • सहजशिक्षण

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ . प्रहार. ९ जानेवारी २०१५ http://prahaar.in/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%B5/. ५ डिसेंबर २०१७ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ Loksatta https://www.loksatta.com/vasturang-news/school-development-395329/. 2020-02-26 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ Sarvanje, Vinayak. (इंग्रजी भाषेत) http://prahaar.in/%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%88-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%98/. 2020-02-26 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)