अनुताई वाघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अनुताई वाघ (जन्म: १७ मार्च, इ.स. १९१० मोरगाव, पुणे - मृत्यू: २७ सप्टेंबर, इ.स. १९९२ कोसबाड) या आदिवासी समाजसेविका व शिक्षणतज्ञ होत्या. शिक्षणाद्वारे आदिवासींच्या जीवनात जागृती निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. पालघर जिल्ह्यातील कोसबाड येथे ताराबाई मोडक यांचेसोबत त्यांनी बालशिक्षणाचे कार्य केले.व [१]

शिक्षण व जीवन[संपादन]

अनुताईंचे वडील बालकृष्ण वाघ हे सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीस होते. वयाच्या तेराव्या वर्षी इ.स. १९२३ साली शंकर वामन जातेगावकर यांच्याशी अनुताईंचा विवाह झाला. परंतु सहा महिन्यांतच त्यांना वयाच्या तेराव्या वर्षी वैधव्य येऊन सुद्धा तत्कालिन सामाजिक रूढींचे बंधन झुगारून त्यांनी शिक्षण घेतले व शिक्षिका म्हणून कार्यरत असतानाच त्यांना ताराबाई मोडक भेटल्या आणि त्यांनी बोर्डी (ठाणे) येथे आदिवासींसाठी असलेल्या ग्राम बाल शिक्षण केंद्रात प्रवेश केला व तेथे इ.स. १९४७ ते १९९२ अशी ४७ वर्षे त्यांनी निरपेक्ष वृत्तीने ग्रामशिक्षणाचे कार्य चालवले व पुढे कोसबाडच्या नूतन बाल शिक्षण केंद्राच्या चालक, राष्ट्रीय शिक्षण अनुसंधान व प्रशिक्षण मंडळाच्या कार्यकरिणी सदस्य, अखिल भारतीय पूर्व प्राथमिक शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांचे शिक्षणविषयक ग्रंथ इंग्रजी, हिंदी, गुजराथीतून अनुवादित झाले. प्रबोधनासाठी वाहिलेल्या शिक्षणपत्रिका व स्त्रीजागृतीसाठी असलेल्या ‘सावित्री’ मासिकाच्या त्या संपादिका होत्या

पुरस्कार[संपादन]

भारताच्या केंद्र सरकारतर्फे साक्षरता प्रसारार्थ अनुताईंनी लिहिलेल्या सहजशिक्षण या पुस्तकास इ.स. १९८१ साली राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते.[१] आदिवासींच्या शिक्षणासाठी अनेक संस्था स्थापन करून आयुष्य वेचणा-या या अनुताईंना आदर्श शिक्षिका, दलितमित्र, आदर्श माता, फाय फाऊंडेशन, सावित्रीबाई फुले, बाल कल्याण राष्ट्रीय पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांबरोबरच ‘पद्मश्री’ ने सन्मानित केले गेले.[२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांचे शिक्षणकार्य माहितीपटात" (मराठी मजकूर). प्रहार. ९ जानेवारी २०१५. ५ डिसेंबर २०१७ रोजी पाहिले. 
वेदना न स्मुती

== बाह्यदुवे =prahar