"सारं काही समष्टीसाठी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो Pywikibot 3.0-dev |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ २२: | ओळ २२: | ||
==सहभाग== |
==सहभाग== |
||
सारं काही समष्टीसाठी हा मंच आंबेडकरी चळवळीचे सांस्कृतिक राजकारण बळकट करणारा मंच आहे. आजपर्यंत पार पाडलेल्या चार सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी यात सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. यात हिंदी चित्रपट अभिनेत्री स्वरा भास्कर, राजश्री देशपांडे, वीणा जामकर, [[मल्लिका अमर शेख]], दिग्दर्शक [[नागराज मंजुळे]], झीशान अयुब, नाटककार [[रसिका आगाशे]], डॉ. मंगेश बनसोड, डॉ. श्यामल गरूड, कवी महेंद्र भवरे, सुलेखनकार [[आशुतोष आपटे]], छायाचित्रकार सुधारक ओलवे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते युवा चित्रकार विक्रांत भिसे, प्रभाकर कांबळे, कांदबरीकार किरण नगरकर, लोकशाहीर [[संभाजी भगत]], संपादक रविंद्र आंबेकर, विजय गायकवाड, निरंजन टकले, प्रशांत पवार यांनी सहभाग नोंदवलेला आहे. |
सारं काही समष्टीसाठी हा मंच आंबेडकरी चळवळीचे सांस्कृतिक राजकारण बळकट करणारा मंच आहे. आजपर्यंत पार पाडलेल्या चार सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी यात सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. यात हिंदी चित्रपट अभिनेत्री स्वरा भास्कर, राजश्री देशपांडे, वीणा जामकर, [[मल्लिका अमर शेख]], दिग्दर्शक [[नागराज मंजुळे]], झीशान अयुब, नाटककार [[रसिका आगाशे]], डॉ. मंगेश बनसोड, डॉ. श्यामल गरूड, कवी महेंद्र भवरे, सुलेखनकार [[आशुतोष आपटे]], छायाचित्रकार सुधारक ओलवे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते युवा चित्रकार विक्रांत भिसे, प्रभाकर कांबळे, कांदबरीकार किरण नगरकर, लोकशाहीर [[संभाजी भगत]], संपादक रविंद्र आंबेकर, विजय गायकवाड, निरंजन टकले, प्रशांत पवार यांनी सहभाग नोंदवलेला आहे. |
||
== हे सुद्धा पहा == |
|||
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]] |
|||
== संदर्भ == |
== संदर्भ == |
||
{{संदर्भयादी}} |
{{संदर्भयादी}} |
||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
||
* [https://www.facebook.com/samashtee/ फेसबुक पान] |
* [https://www.facebook.com/samashtee/ फेसबुक पान] |
१४:१०, ४ नोव्हेंबर २०१९ ची आवृत्ती
सारं काही समष्टीसाठी हा एक वार्षिक महोत्सव आहे. याचीची सुरुवात मुंबईत १५ जानेवारी इ.स. २०१५ पासून झाली. "नामदेव ढसाळ स्मृती गौरव समिती"द्वारा पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हा सोहळा दर वर्षी साजरा केला जातो. समष्टीचा उद्देश प्रस्थापित सौंदर्यशास्त्राला मोडून काढणे होय.
आंबेडकरी चळवळीने निर्मिलेल्या साहित्याने भारतीय साहित्यातील रोमँटिसीजमला मोडून काढत नवे सौंदर्यशास्त्र रचले आहे. या नव्या कवितीक सौंदर्यशास्त्राचा नामदेव ढसाळ यांच्या कवितेने यल्गार उभा केला. अशी कविता जी शिकवते 'फुलांच्या सुगंधापेक्षा छान असतो चारित्र्याचा वास'. प्रस्थापितांच्या ब्राह्मणी सौंदर्यशास्त्राला मोडीत काढून लूंपेन सर्वहारा वर्गाचे सौंदर्यशास्त्र प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने दरवर्षी हा सोहळा मुंबई शहरांतील विविध ठिकाणी आयोजित केला जातो.
स्वरूप
सारं काही समष्टीसाठी या सोहळ्यात नामदेव ढसाळ यांच्यासोबतच आंबेडकरी चळवळीतील, संविधानवाद अधिक बळकट करणाऱ्या प्रत्येक साहित्यिक कलाकृतीचे भिन्न प्रकारांत रुपांतर करून नव्याने सादरीकरण करण्यात येते. या सादरीकरणात आजवर कधीही मंच उपलब्ध न झालेल्या सर्व कलाकारांना मंच उपलब्ध करून देण्यात येतो. या मंचावर नाटके, एकांकिका, कविता वाचन, चित्रकला, लेखन, व्याख्यान, मनोगत, शिल्पे, चित्रप्रदर्शन, शाहीरी, चर्चासत्र, चित्रपट, लघुपट स्क्रिनिंग तसेच विविध गीतांचे सादरीकरण अशा स्वरुपात हा महोत्सव दरवर्षी आयोजित केला जातो.[१] [२][३]
भूमिका
या अंतर्गत काव्य पंक्तितून व ओळीतून भूमिका स्पष्ट होते. स्पृश्य-अस्पृश्यतेचा गटारागंगेतून विभवत चाललेल्या समाजाची गरज आहे जे जे सडलेलंय ते गाडून टाकणं. अस्पृश्यतेच्या भेदाला उखडून टाकणं. कलात्मक राजकारणाचे, सांस्कृतिक राजकारणाचे सारे मंच उभे राहतील असं सचेत काम करण्याची. हे मंच उभे रहावेत, यास लागू नये कुणाचाही दंभस्पर्श, नेस्तानाबूत करत चालाव्यात सांस्कृतिक दहशतवादाच्या झूंडी, नकाराच्या जाळ्यांना कातरून उभं करावं नवं दालन ज्यात उपजेल माणूसकीचं बीज तरारून... एक असा मंच, जो खुला असेल सर्वांसाठी, जो टाकेल दान शोषकांच्या पदरातही स्विकाराचं, नी उचलून धरेल लुंपेन पताका आभाळापार...[४]
पुरस्कार
इ.स. २०१६ पासून समष्टी मार्फत पुरस्कार प्रदान केला जातो. या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र आणि रोख रक्कम २५,००० रुपये असे आहे. पहिला पुरस्कार ज्येष्ठ आंबेडकरी कवी लोकनाथ यथवंत यांना २०१६ साली पहिला प्रदान करण्यात आला. २०१७ सालचा समष्टी पुरस्कार पद्मश्री सुधारक ओलवे यांना तर २०१८ सालचा समष्टी पुरस्कार दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना प्रदान करण्यात आला.[५]
२०१८ सालापासून समितीतर्फे कविता, साहित्य, पत्रकारिता आणि आंबेडकरी चळवळीत आपल्या कलाकृतीने भरीव योगदान दिलेल्या तरूण कार्यकर्ता वा कार्यकर्तीस गोलपीठा पुरस्कार देण्यात येतो आहे. या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र व रोख रक्कम ५००० रुपये असे आहे. पहिला गोलपीठा पुरस्कार कवी प्रा. सुदाम राठोड यांना प्रदान करण्यात आला.[६][७]
आयोजक
हा महोत्सव नामदेव ढसाळ स्मृती गौरव समिती मार्फत समष्टी फाऊंडेशन कडून आयोजित केला जातो.[८] २०१५ साली पहिला सोहळा हा प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यमंदीर व पु.ल. देशपांडे अकादमीच्या प्रांगणात भरवण्यात आला होता. २०१६ साली दादर येथे संयुक्त महाराष्ट्र सांस्कृतिक भवनाच्या दालनात तर २०१८ साली जे.जे. महाविद्यालय मुंबई येथे भरवण्यात आला होता. २०१९ साली फेब्रुवारीत मुंबई विद्यापीठ, कलीना येथे हा महोत्सव भरवण्यात येणार आहे.
सहभाग
सारं काही समष्टीसाठी हा मंच आंबेडकरी चळवळीचे सांस्कृतिक राजकारण बळकट करणारा मंच आहे. आजपर्यंत पार पाडलेल्या चार सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी यात सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. यात हिंदी चित्रपट अभिनेत्री स्वरा भास्कर, राजश्री देशपांडे, वीणा जामकर, मल्लिका अमर शेख, दिग्दर्शक नागराज मंजुळे, झीशान अयुब, नाटककार रसिका आगाशे, डॉ. मंगेश बनसोड, डॉ. श्यामल गरूड, कवी महेंद्र भवरे, सुलेखनकार आशुतोष आपटे, छायाचित्रकार सुधारक ओलवे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते युवा चित्रकार विक्रांत भिसे, प्रभाकर कांबळे, कांदबरीकार किरण नगरकर, लोकशाहीर संभाजी भगत, संपादक रविंद्र आंबेकर, विजय गायकवाड, निरंजन टकले, प्रशांत पवार यांनी सहभाग नोंदवलेला आहे.
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ http://prahaar.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5-%E0%A4%A2%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2/amp/. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ The Indian Express (इंग्रजी भाषेत) https://indianexpress.com/article/cities/mumbai/dhasal-literature-festival-day-long-festival-with-poetry-theatre-and-music-5065949/. 2019-02-10 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ https://allevents.in/mumbai/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/1532942110322591. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ divyamarathi https://divyamarathi.bhaskar.com/news/prashant-pawar-rasik-article-6020739.html. 2019-02-10 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ टीम, एबीपी माझा वेब. ABP Majha http://abpmajha.abplive.in/mumbai/namdev-dhasal-program-179702. 2019-02-10 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ 24taas.com (इंग्रजी भाषेत) https://zeenews.india.com/marathi/mumbai/sarakahi-samashthisathi-program-on-15-feb-2018-in-mumbai/412946. 2019-02-10 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Marathi e-Batmya (इंग्रजी भाषेत) https://www.marathiebatmya.com/nagraj-manjule-sudhakar-olve-dhasal-award/. 2019-02-10 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ https://www.dnaindia.com/mumbai/report-carrying-namdeo-dhasal-s-legacy-forward-on-ambedkar-punyatithi-2152150. Missing or empty
|title=
(सहाय्य)