"सुजात आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ९: ओळ ९:
| मृत्युदिनांक =
| मृत्युदिनांक =
| मृत्युस्थान =
| मृत्युस्थान =
| शिक्षण = [[फर्ग्युसन महाविद्यालय]], पुणे <br /> एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझम, चेन्नई
| शिक्षण =
| पदव्या = बीए (राज्यशास्त्र), पत्रकारितेची पदविका (डिप्लोमा)
| पदव्या =
| चळवळ =
| चळवळ =
| संघटना =
| संघटना =

१३:४५, १२ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती

सुजात आंबेडकर
जन्म: १९९५
शिक्षण: फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे
एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझम, चेन्नई
अवगत भाषा: मराठी, हिंदी, इंग्रजी व अन्य
कार्यक्षेत्र: राजकारण, समाजकारण, पत्रकारिता
धर्म: बौद्ध धर्म
वडील: प्रकाश आंबेडकर
आई: डॉ. अंजली आंबेडकर

सुजात प्रकाश आंबेडकर (जन्म: १९९५) हे एक भारतीय कार्यकर्ता, पत्रकार व राजकारणी आहेत. ते प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र व डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांचे पणतू आहेत. सुजात हे वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाचे युवानेते[१] आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते[२] आहेत. सध्या ते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. राज्यातील तरुण कार्यकर्त्यांचे नेटवर्कही ते हाताळत आहेत.[३][४]

वैयक्तिक जीवन

सुजात आंबेडकरांचा जन्म १९९५ साली झाला. सुजात हे डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांचे पणतू आहेत. त्यांचे वडील प्रकाश आंबेडकर व आई अंजली आंबेडकर आहे. सुजात आपल्या आईवडीलांचे एकुलते अपत्य आहे. ते बौद्ध धर्मीय आहेत. सुजात हे आंबेडकर कुटुंबाच्या चौथ्या पिढीतील सदस्य आहेत, त्यांचे वडील, आजोबा यशवंत आंबेडकर व पंजोबा हे तिघेही राजकारणी होते, व त्यांनी राजकीय पदेही भूषवलेली आहेत. त्यांचे काका आनंदराज आंबेडकर हेही राजकीय व्यक्ती आहेत.

शिक्षण

सुजात आंबेडकर हे २४ वर्षांचे आहेत. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी राज्यशास्त्रात पदवी घेतली आले. त्यानंतर २०१६-१८ दरम्यान त्यांनी चेन्नईच्या एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझमधून पत्रकारितेची पदविका (डिप्लोमा) प्राप्त केली.[३][४] जेएनयूचा विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील कार्यक्रमात सुजात आणि त्यांच्या समर्थकांनी देशविरोधी घाेषणा दिल्याचा आरोप महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केला होता. त्यावर सर्व स्तरांतून मोठी टीका झाली होती. त्यानंतर महाविद्यालयाच्या ते पत्र मागे घेतले. तेव्हा सुजात आंबेडकर चर्चेत आले होते.[५]

पत्रकारिता

सुजात आंबेडकर यांनी दोन वर्षे अनेक राष्ट्रीय दैनिक आणि वेबसाईट्समध्ये मुक्त पत्रकार म्हणून काम केले. ते उत्तम ड्रमरसुद्धा आहेत. भविष्यात संगीताच्या माध्यमातून ते पॉलिटिकल स्टेटमेंट करणारा बँडही तयार करणार आहेत.[३][४]

राजकीय कारकीर्द

सुजात आंबेडकर हे एक राजकीय कार्यकर्ता असले तरी ते स्वतः सक्रिय राजकारणात आलेले नाहीत. "लोकांची मागणी असेल तर राजकारणात येईल. पण तोवर लोकांना मदत करण्यासाठी, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्यासाठी मी कायम लोकांसोबत आणि चळवळीसोबत असेन," असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीमध्ये कोणतेही पद नाही. निवडणुकीच्या कार्यकाळात पदाधिकाऱ्यांच्या बैठका, सोशल मीडिया सांभाळणे, आंबेडकरी, मुस्लीम आणि अन्य बहुजन तरुणांना एकत्र बांधून ठेवणे, या जबाबदाऱ्या सुजात यांच्याकडे असतात. सुजात यांच्या आई डॉ. अंजली आंबेडकर यादेखील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराची कार्ये करीत असतात.[४]

२७ मे २०१८ रोजी आझाद मैदानावर सुजात आंबेडकर यांनी पहिल्यांदाच जाहीर सभेशी खुला संवाद साधला. त्यांच्या भाषणाला उपस्थितांनी प्रतिसाद दिला. या एल्गार मार्चच्या निमित्ताने आंबेडकर घराण्याची चौथी पिढी सामाजिक क्षेत्रात उतरली. एल्गार मार्चमध्ये सुजात यांचे दोन मिनिटांचे भाषण होते. पण, ते चमकदार अन् प्रभावी ठरले. त्यांनी शुद्ध भाषेत आणि नम्रतेने भाषण केले. सुजात म्हणाले, "वर्षातल्या दोन गोष्टी घ्या. एक कोरेगाव भीमाची आणि दुसरी टाटा इन्स्टिट्यूटमधील शिष्यवृत्ती बंदची. या दोन्ही घटना तळातल्या समुदायाने व्यवस्थेला प्रश्न करू नयेत, यासाठी घडवल्या गेल्या आहेत. आपण सक्षम होऊ नये, असे षडयंत्र देशात रचले जात आहे’, असा गंभीर आरोप त्याने केला. मिलिंद एकबोटे यांना अटक झाली, तोच गुन्हा संभाजी भिडे यांनीसुद्धा केलाय. आम्ही सर्व पुरावे दिलेत. पण, दोन महिने २६ दिवस उलटूही भिडे यांची अटक जाणीवपूर्वक टाळली जात आहे, असा आरोप त्याने केला. 'या राज्यात न्याय समान नाही. त्यामुळे आता हे सरकार बदललेच पाहिजे'," असे आवाहन त्याने उपस्थितांना केले. त्यांच्या आवाहनाला उपस्थितांनी दादही दिली.[५] 

महाराष्ट्रातील २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत प्रकाश आंबेडकर अकोल्यासह सोलापूर मतदारसंघातून उभे होते, तेव्हा वडीलांचा प्रचार करण्यासाठी सुजात यांनी महिनाभर सोलापूर मतदारसंघात प्रचारकार्य केले होते.[६]

सुजात आंबेडकर हे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे सुद्धा नेते आहेत. सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघातील विविध वसाहतीत मतदारांच्या भेटी घेण्यावर भर देण्यात आला. सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून २३ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत विजयी संकल्प संवाद घेण्यात आला.[७][२]

विचार व टिका-टिपणी

संदर्भ

  1. ^ "सुजात आंबेडकर म्हणाले, लोकशाही वाचविण्यासाठी वंचितला सहकार्य करा | eSakal". www.esakal.com.
  2. ^ a b "शिक्षण, नोकरी मुद्दे मागे टाकण्यासाठी राजकारण : सुजात आंबेडकर". Lokmat. 20 सप्टें, 2019. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ a b c "Sujat Prakash Ambedkar talks on Vanchit Bahujan Aghadi | सुजात प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी" – www.youtube.com द्वारे.
  4. ^ a b c d करंडे, अभिजीत (4 एप्रि, 2019). "सुजात प्रकाश आंबेडकर: वंचित बहुजन आघाडी पडद्यामागून मॅनेज करणारा ड्रमर पत्रकार" – www.bbc.com द्वारे. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ a b "बाबासाहेबांच्या चौथ्या पिढीची आंदोलनात उडी;प्रकाश अांबेडकरांचे पुत्र सुजातचे लाँचिंग". Divya Marathi.
  6. ^ "प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लढणार, मी आता तब्बल तीस दिवस मुक्कामी : सुजात आंबेडकर". Lokmat. 22 मार्च, 2019. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  7. ^ "वंचित बहुजन आघाडीची युवकांना साद". Maharashtra Times. 27 सप्टें, 2019. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे