Jump to content

"सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३८: ओळ ३८:
|}
|}


==हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे संग्रहालय==
सिद्धार्थ उद्यानामध्ये [[हैदराबाद मुक्तिसंग्राम]] या लढ्याच्या स्मृतींना उजाळा देणारा संग्रहालय आहे. त्यामध्ये मुक्तिसंग्रामाच्या इतिहास रेखाटलेला आहे. मुर्ती, तैलचित्रे, माहिती लेख, मराठी संस्कृतीशी निगडीत बाबी संग्रहालयातील आहेत. संग्रहालयासमोर हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यातील क्रांतिकारकांच्या सन्मानार्थ एक भव्य स्तंभ उभारलेला असून दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी त्याला मानवंदना दिली जाते.
==चित्रदालन==
==चित्रदालन==
<gallery>
<gallery>

०८:५४, १९ सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती

सिद्धार्थ उद्यानातील बुद्ध मुर्ती
सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालयाचे प्रवेशद्वार

सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय हे औरंगाबाद मधील उद्यान व प्राणी संग्रहालय आहे. हे उद्यान १९८५ मध्ये छोट्या स्वरूपात सुरु करण्यात आले होते. हे उद्यान शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाजूला आहे. सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय मराठवाड्यातील एकमेव प्राणी संग्रहालय आहे. या प्राणी संग्रहालयात विविध प्रकारचे २०० पेक्षा जास्त प्राणीपक्षी आहेत. हे एक राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील एक प्रमुख प्रेक्षणिय स्थळ असून विद्यार्थ्यांच्या सहलीसह लाखो पर्यटक दरवर्षी प्राणिसंग्रहालयाला भेटी देतात. याचे "सिद्धार्थ" नाव हे गौतम बुद्धांच्या नावावरून ठेवण्यात आले आलेले असून उद्यानात बुद्धांचा एक भव्य पुतळा बसवण्यात आला आहे.[]

प्राण्यांसाठी असलेली अपुरी जागा, सोयी-सुविधांचा अभाव, चुकीच्या पद्धतीने ठेवलेले पिंजरे या कारणांमुळे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने २६ नोव्हेंबर २०१८ रोजी या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द केली होती.[] मात्र पुढे १२ डिसेंबर २०१८ रोजी केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने या निर्णयास स्थगिती दिली.[]

प्राणी संपदा

डिसेंबर २०१८ नुसार, सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील प्राण्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे.[]

अ.क्र. प्राणी संख्या
वाघ
बिबटे
हरीण, काळवीट ४८
सांबर ४७
नीलगाय
चितळ
कोल्हे
सायाळ
तडस
१० माकड १०
११ साप १००
१२ पक्षी १९
१३ मगर

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे संग्रहालय

सिद्धार्थ उद्यानामध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम या लढ्याच्या स्मृतींना उजाळा देणारा संग्रहालय आहे. त्यामध्ये मुक्तिसंग्रामाच्या इतिहास रेखाटलेला आहे. मुर्ती, तैलचित्रे, माहिती लेख, मराठी संस्कृतीशी निगडीत बाबी संग्रहालयातील आहेत. संग्रहालयासमोर हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यातील क्रांतिकारकांच्या सन्मानार्थ एक भव्य स्तंभ उभारलेला असून दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी त्याला मानवंदना दिली जाते.

चित्रदालन

संदर्भ

  1. ^ Maharashtra Times https://maharashtratimes.indiatimes.com/aurangabad-marathwada-news/aurangabad/promise-trees-wild-animals/articleshow/67066484.cms. 2019-01-10 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ divyamarathi https://divyamarathi.bhaskar.com/news/aurangabad-animal-museum-permission-has-been-canceled-5988799.html. 2019-01-10 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ www.esakal.com https://www.esakal.com/marathwada/suspension-order-cancel-approval-zoo-160357. 2019-01-10 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ औरंगाबाद, कृष्णा केंडे, एबीपी माझा. ABP Majha https://abpmajha.abplive.in/aurangabad/animal-museum-in-siddhartha-garden-of-aurangabad-will-be-closed-609661. 2019-01-10 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे