Jump to content

"नानासाहेब शेंडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २९: ओळ २९:


== संशोधन ==
== संशोधन ==
शेंडकरांनी थर्माकोलच्या विविध वस्तु तयार करण्यासाठी कारखाना सुरु केला. [[थर्माकोल]]चा सजावटीसाठी वापर त्याला रंगकाम, नक्षीकाम आणि कोरीवकाम करणे त्याचे साचे बनवून, मोल्डिंगचे प्रयोग करून खांब कळस, घुमट अश्या प्रकारच्या वस्तूंची निर्मिती हे शेंडकरांचे संशोधन आहे. [[इ.स. २००१]] मध्ये हा थर्माकोलचा कारखाना बंद करून त्यानंतर त्यांनी इको फ्रेंडली पुठ्ठ्यावर आधारित मखाराचा देखील शोध लावला. या इको फ्रेंडली कार्यासाठी त्यांना [[डी.डी. सह्याद्री]] व ई टीव्ही मराठी कलर्स मराठी या दोन मराठी वाहिन्यांकडून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी उत्सवी संस्था स्थापन केली, या संस्थेच्या पहिल्या प्रदर्शनाचे उद्घाटन इ.स. १९९५ साली [[बाळ ठाकरे]] यांच्या हस्ते झाले.
शेंडकरांनी थर्माकोलच्या विविध वस्तु तयार करण्यासाठी इ.स. १९७५ मधे कारखाना सुरु केला, यात सुमारे ७० कारागिरांचा सहभाग होता. [[थर्माकोल]]चा सजावटीसाठी वापर त्याला रंगकाम, नक्षीकाम आणि कोरीवकाम करणे त्याचे साचे बनवून, मोल्डिंगचे प्रयोग करून खांब कळस, घुमट अश्या प्रकारच्या वस्तूंची निर्मिती हे शेंडकरांचे संशोधन आहे. थर्माकोल अविघटनशील पदार्थ आहे. याची किंमत सगळ्यात कमी असल्यामुळे त्याला जमा करून पुनर्वापरासाठी कोणतीही यंत्रणा नाही, यामुळे उत्सवात गल्लोगल्ली हजारो ट्रक रिकामा होणारा थर्माकोल पुढे कचऱ्याच्या ढिगाच्या स्वरुपात नदीनाल्यात जमा होतो. या समस्येचा विचार करून याला थांबविण्यासाठी शेंडकरांनी [[इ.स. २००१]] मध्ये हा थर्माकोलचा कारखाना बंद केला. त्यानंतर त्यांनी इको फ्रेंडली पुठ्ठ्यावर आधारित मखाराचा देखील शोध लावला. या इको फ्रेंडली कार्यासाठी त्यांना [[डी.डी. सह्याद्री]] व ई टीव्ही मराठी कलर्स मराठी या दोन मराठी वाहिन्यांकडून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी उत्सवी संस्था स्थापन केली, या संस्थेच्या पहिल्या प्रदर्शनाचे उद्घाटन इ.स. १९९५ साली [[बाळ ठाकरे]] यांच्या हस्ते झाले.


== सार्वजनिक उत्सवात सहभाग ==
== सार्वजनिक उत्सवात सहभाग ==

१५:२५, २८ जुलै २०१९ ची आवृत्ती

नानासाहेब शेंडकर
जन्म लोणी मावळा
१ जून, इ.स. १९५५
लोणी मावळा, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
वांशिकत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा कलाकार
प्रसिद्ध कामे सिद्धीविनायक मंदिराच्या डिझाईन मॉडेल काम
धर्म हिंदू

थकाराम महादू शेंडकर (जन्म: १ जुन १९५५), नानासाहेब शेंडकर नावाने प्रसिद्ध, हे एक भारतीय कला दिग्दर्शक आहेत.[][][]

प्रारंभिक जीवन

शेंडकरांचा जन्म १ जुन १९५५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील लोणीमावळा या गावी एका शेतकरी कुटूंबात झाला. त्यांचे कुटूंब १५० जणांचे होते. त्यांचे सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण त्याच गावात झाले. सातवीत असताना कला विषयात त्यांना अधिक रूची जाणवू लागली. चिकणमातीच्या वस्तू बनवणे, वर्गात चित्रे रेखाटणे हा त्यांचा शाळकरी वयातील छंद होता. या कलांना त्यांच्या शिक्षकांकडून प्रोत्साहन मिळाले. घरचा परंपरागत व्यवसाय शेती आणि कुस्ती सारख्या खेळाची वाट न चोखाळता त्यांनी कलाक्षेत्रात काम करण्याचे ठरवले, मात्र त्याला कुटूंबीयांकडून विरोध झाला. घरून कोणत्याही प्रकारचे सहकार्य नसल्यामुळे तरूण वयात नाना शेंडकरांनी मेहनतीने आपले पुढील शिक्षण पूर्ण केले. एसएससीनंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश मिळून सुद्धा त्यांनी ड्रॉईंग इंटरमिजिएट परीक्षेस प्राथमिकता दिली. परिक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स, मुंबई येथून पूर्ण केले. जे.जे. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर तेथील शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी रात्री कारखान्यात काम केले होते.

व्यावसायिक जीवन

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना शेंडकर अनेक कला क्षेत्राशी निगडीत कामे करत. छत्र्यांवर विविध प्रकारच्या आकर्षक डिजाईन्स बनवणे, वळणदार नावे लिहीणे, दुनिकांचे नामफलक बनवणे, तसेच बॅनर तयार करण्याच्या नवीन पद्धती विकसित केल्या. पुढे त्यांनी तयार केलेल्या पद्धतींचे बाजारात बरीच वर्षे कलाकारांनी अनुसरण केले. जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स मधून प्रथम श्रेणीत सर्वप्रथम येउन उत्तीर्ण झाले. याचदरम्यान महाविद्यालयामध्ये प्राध्यापक काशिनाथ साळवे आणि नेपथ्यकार रघुवीर तळाशीकर यांच्याशी त्यांची भेट झाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नाट्यसृष्टी आणि पुढे सिनेसृष्टीत टी.के. देसाई, रमेश सिप्पी, देवानंद, केतन आनंद, मनमोहन देसाई, मुखर्जी बंधू आणि सुषमा शिरोमणी अशा नामवंत कलाकारांसोबत व निर्मात्यांसोबत सुहाग पासून ते लूटमार पर्यंत जवळपास २० ते २५ चित्रपटांचे सेट शेंडकरांनी उभे केले.

संशोधन

शेंडकरांनी थर्माकोलच्या विविध वस्तु तयार करण्यासाठी इ.स. १९७५ मधे कारखाना सुरु केला, यात सुमारे ७० कारागिरांचा सहभाग होता. थर्माकोलचा सजावटीसाठी वापर त्याला रंगकाम, नक्षीकाम आणि कोरीवकाम करणे त्याचे साचे बनवून, मोल्डिंगचे प्रयोग करून खांब कळस, घुमट अश्या प्रकारच्या वस्तूंची निर्मिती हे शेंडकरांचे संशोधन आहे. थर्माकोल अविघटनशील पदार्थ आहे. याची किंमत सगळ्यात कमी असल्यामुळे त्याला जमा करून पुनर्वापरासाठी कोणतीही यंत्रणा नाही, यामुळे उत्सवात गल्लोगल्ली हजारो ट्रक रिकामा होणारा थर्माकोल पुढे कचऱ्याच्या ढिगाच्या स्वरुपात नदीनाल्यात जमा होतो. या समस्येचा विचार करून याला थांबविण्यासाठी शेंडकरांनी इ.स. २००१ मध्ये हा थर्माकोलचा कारखाना बंद केला. त्यानंतर त्यांनी इको फ्रेंडली पुठ्ठ्यावर आधारित मखाराचा देखील शोध लावला. या इको फ्रेंडली कार्यासाठी त्यांना डी.डी. सह्याद्री व ई टीव्ही मराठी कलर्स मराठी या दोन मराठी वाहिन्यांकडून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी उत्सवी संस्था स्थापन केली, या संस्थेच्या पहिल्या प्रदर्शनाचे उद्घाटन इ.स. १९९५ साली बाळ ठाकरे यांच्या हस्ते झाले.

सार्वजनिक उत्सवात सहभाग

गणपती उत्सवाला १०० वर्षे पूर्ण झाली तेव्हा नानासाहेबांनी १००० अफदागिरी तयार केल्या, ज्या सर्व सार्वजनिक मंडळांना वाटून शताब्दी वर्ष साजरे करण्यात आले. सिद्धीविनायक मंदिराच्या गणेशोत्सवात त्यांच्या हस्ते सजावट केली गेली, तसेच याच मंदिराच्या डिझाइन मॉडेलचे कामही त्यांनीच केले.

संदर्भ

  1. ^ "प्रदूषणाच्या विसर्जनासाठी पर्यावरणपूरक सजावट". 20 ऑग, 2017. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "थर्माकाेल कारखान्याला ठाेकले टाळे; केली पर्यावरणस्नेही मखर निर्मिती". divyamarathi. 24 ऑग, 2017. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ Reporter, M. N. "इको फ्रेंडली 'उत्सवी' नानासाहेब शेंडकरांच्या लढ्याला यश!".