"इस्लाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३१: ओळ ३१:
* ओसामा : त्याचा इस्लाम, त्याचा कायदा (निळू दामले)
* ओसामा : त्याचा इस्लाम, त्याचा कायदा (निळू दामले)
* गुड मुस्लीम बॅड मुस्लीम (महमूद ममदानी)
* गुड मुस्लीम बॅड मुस्लीम (महमूद ममदानी)
* जिहाद : निरंतर युद्धाचा इस्लामी सिद्धान्त (अनुवादित; मूळ लेखक - [[सुहास मजुमदार]], सहअनुवादक - [[शरद मेहेंदळे]], [[डॉ. श्रीरंग गोडबोले]] )
* भारतीय मुसलमान : शोध आणि बोध ([[सेतुमाधवराव पगडी]])
* भारतीय मुसलमान : शोध आणि बोध ([[सेतुमाधवराव पगडी]])



१६:२६, १९ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती


इस्लाम धर्म हा एक अब्राहमिक धर्म असून देवाच्या एकत्वावर या धर्माची श्रद्धा आहे. या धर्माची स्थापना हजरत मुहम्मद पैगंबर यांनी ६१० साली सौदी अरेबियाच्या मक्का या शहरात केली. इस्लाम धर्माचे पालन करणाऱ्या लोकांना मुसलमान म्हटले जाते, ज्यांची जगभरातील संख्या आजमितीस साधारपणे १६० कोटी (जगाच्या एकूण संख्येच्या २३%) आहे. लोकसंख्येनुसार (ख्रिश्चनबौद्ध धर्मानंतर) जगातील तिसरा सर्वांत मोठा धर्म आहे. यातील १४ कोटी मुसलमान भारतात आहेत व भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मुस्लीम लोकसंख्येचा देश आहे.

इस्लामची तत्त्वे

  • अल्लाह हा एकच ईश्वर असून कोणीही त्यापेक्षा वरचढ नाही. ( ला इल्ह् हिल्लल्लाह् )
  • मुहम्मद हे अल्लाह शेवटचे प्रेषित आहेत. (महम्मदे रसूल-अल्लाह)
  • दिवसातून् पाच वेळा नमाज पढणे
  • आयुष्यातून एकदा मक्केला भेट देणे. (हज)
  • आपल्या मिळकतीतील १/४० मिळकत गोरगरिबांसाठी दान करणे. (जकात)

कलमा, रोजा, नमाज, जकात, हज, या पाच गोष्टी इस्लाममध्ये महत्त्वाच्या मानल्या जातात.

इस्लाम हा शब्द अरबी भाषेतील असून मूळ शब्द अस्लम (अस् + अलम) असा आहे, ज्याचा शब्दश: अर्थ भावार्थ परमेश्वरापुढे श‍रणागती पत्करणे व त्या परमेश्वराला सर्वशक्तिमान म्हणून पूजणे असा आहे. इस्लामच्या साधकाने इस्लामवरची श्रद्धा ही दाखवलीच पाहिजे, त्यासाठी साधकाने परमेश्वराला पूजलेच पाहिजे, त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत व अन्य कोणत्याही देव देवतांना (अनेकेश्वरवाद) पूजता कामा नये.

मुस्लिमांची अशी श्रद्धा आहे की परमेश्वराने ( अल्लाहने) मुहम्मद पैगंबराकरवी कुराण उलगडवले. याकामी जिब्रराइल या देवदूताने मदत केली व अश्या रितीने कुराण व मुहम्म्द पैंगबरांच्या चालीरिती व बोली (सुन्नाह) इस्लामनुसार मूळ प्रमाण मानल्या जातात. तसेच इस्लाम हा नवीन धर्म नसून मुहम्मद पैंगबराकरवी अल्लाहने अनादी कालापासून अस्तित्वात असलेल्या एकेश्वर धर्माचे पुनरुत्थान केले अशी मान्यता आहे. इस्लामच्या गोदरचे एकेश्वरवादी अब्राहमिक धर्म आज यहुदी व ख्रिस्ती धर्मा या नावांनी ओळखले जातात. त्यांनी परमेश्वराने पाठवलेल्या आज्ञांचा, साक्षात्कारांचा चुकीचा व सोईचा अर्थ लावून पूर्वीचे धर्म ग्रंथ बदलले असे मुसलमान मानतात. खऱ्या एकेश्वर धर्माची मुहम्मद द्वारे पुनरुत्थान झाल्याचेही इस्लामचे साधक मानतात.

इस्लाममध्ये अनेक चालीरिती आहेत. इस्लामच्या साधकांना इस्लामचे पाच स्तंभ पाळावे लागतात. अशी प्रमुख पाच कर्तव्ये आहेत की ज्यांनी संपूर्ण मुस्लीम समाजाला बांधले आहे. या पाच स्तंभापलीकडे इस्लाममध्ये इस्लामी समाजासाठी काळानुसार कायदे प्रणाली तयार झाली आहे ज्याला शरीयत कायदेप्रणाली असे ओळखले जाते. शरीयत कायदेप्रणालीमध्ये मानवी जीवनाच्या जवळपास सर्वच चालीरिती व समाजाच्या सर्व अंगांना इस्लामी कायद्याच्या चौकटीत बसवून समाज जीवन शिस्तबद्ध केले आहे, असे इस्लामचे साधक मानतात.

इस्लामचे दोन प्रमुख पंथ आहेत. शियासुन्नी. यातील सुन्नींचे प्रमाण जास्त असून ते एकूण इस्लामी लोकसंख्येच्या ८५ टक्के आहेत. तर उर्वरित १५ टक्के शिया व इतर पंथांत मोडतात. या सर्व पंथांतही अनेक उपप्रकार आहेत. मुहम्मद पैंगबराच्या मृत्यूनंतर इस्लाममध्ये धार्मिक व राजकीय वारसदार कोण याचा प्रश्न उद्भभवला होता. चारही खलीफांना मानणारे सुन्नी पंथाचे झाले तर फक्ता चौथ्या खलीफाला मानणारे शिया पंथीय बनले.

इस्लामवरील पुस्तके