"रानभाज्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०७: ओळ १०७:
* हळंदा
* हळंदा
* हादगा
* हादगा

[[वर्ग:औषधी वनस्पती]]


Collected from Adivasi people from Kalsubai harichandragad Sanctuary by ramdaslandge07@gmail.com
Collected from Adivasi people from Kalsubai harichandragad Sanctuary by ramdaslandge07@gmail.com

==रानभाज्यांची माहिती देणारी पुस्तके==
* आरोग्यदायी रानभाज्या (मधुकर बाचुळकर) - सकाळ प्रकाशन
* ओळख रानभाज्यांची (मधुकर बाचुळकर, डॉ. अशोक वाली, डॉ. हरीश नांगरे) - निसर्गमित्र प्रकाशन, कोल्हापूर
* बखर रानभाज्यांची : प्रवास रानभाज्यांच्या शोधाचा (नीलिमा जोरवर) - लोकवाङ्मय प्रकाशन (२०१८)
* रानभाज्या (भा.पं. जोशी) - काॅन्टिनेन्टल प्रकाशन

[[वर्ग:औषधी वनस्पती]]

१६:४७, ५ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

शेती किंवा निगा न करता निसर्गत:च उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या म्हणतात.या मुख्यत्वेकरुन जंगलात (रानात), शेतांच्या बांधावर, माळरानात येतात. यांत अनेक औषधी गुणधर्मही असतात त्या आवर्जून खाल्या जातात.[१]

Kuda vegetable from kokan region


जंगलालगतचे आदिवासी आजही त्यांचे पारंपरिक अन्न म्हणून जंगलातील वनस्पतींचाच वापर करतात. ऋतुनुसार त्यांना या भाज्या सहज उपलब्ध होत असून त्यांच्या जुन्या पिढीतील भाज्यांचे हे ज्ञान नव्या पिढीतही कायम असून या वनस्पती त्यांच्या दैनंदिन खाद्यान्नातील अविभाज्य घटक आहेत.

भारतातील जंगल आणि पहाडी भागात सुमारे ४२७ आदिवासी जमाती आहेत. पैकी महाराष्ट्रात कोरकू, गोंड, भिल्ल, महादेव कोळी, वारली, अशा ४७ जमाती आहेत. जगभरात वनस्पतींच्या ३२ लाख ८३ हजार प्रजाती असून भारतीय आदिवासी १५३०पेक्षा अधिक वनस्पती त्यांच्या दैनंदिन जीवनात खाण्यासाठी वापरतात. यात १४५ कंद, ५२१ हिरव्या भाज्या, १०१ फुलभाज्या, ६४७ फळभाज्या, ११८ बियाण्यांच्या व सुकामेव्यांच्या प्रजाती आहेत. कोळी, गोंड, गोवारी, ढिवर या चंद्रपूर जिल्ह्यातील मुख्य आदिवासी जमाती दैनंदिन खाद्यान्नात सुमारे २५ रानभाज्यांचा उपयोग करीत असल्याचे समोर आले आहे.त्यांना ऋतुमानानुसार रानभाज्या सहज उपलब्ध होत असल्याने या वनस्पतींची त्यांना पूर्ण माहिती असते. तेच त्यांचे पारंपरिक अन्न आहे आणि त्याविषयीचे ज्ञान नव्या पिढीपर्यंत सहजरीत्या पोहोचते. या वनस्पतींपैकी काहींचा वापर ते विशिष्ट सणादरम्यान, तर काही विशिष्ट दिवशीच खातात. यावरून निसर्गाशी जुळलेली त्यांची नाळ अधोरेखित होते. या गावातील तरुणांनाही या वनस्पतींचे महत्त्व आणि पूर्ण ज्ञान आहे. या वनस्पतींपासून आदिवासी विविध पदार्थ बनवितात. भाज्यांचा रस्सा तयार करण्यापासून तर उकळून, भाजून, वरण, भजी आदी खाद्यान्न यांपासून तयार केले जाते. एवढेच नव्हे, तर पोळ्यांसाठीही याच वनस्पती वापरतात. सुमारे १४ वनस्पती या मधुमेह, पोटदुखी, खोकला आदींवरही औषधी म्हणून, तर काही वनस्पती गर्भवती आणि बालकांसाठी अतिशय उपयुक्त ठरल्या आहेत. शहरी भागाशी त्यांचा फारसा संबंध नाही आणि तिकडे जाण्याचीही आदिवासीमा गरज भासत नाही.

ताडोबा अभयारण्यालगतच्या परिसरातील वनस्पती

उतरण, काटवल, माल कामोनी, पांढरा कुडा, कुळमुळी, केना, कोबडा, तरोटा, धानभाजी, टेकोडे, ढेमाणी, पकानवेल, भशेल पानवेल, काळा पेठारा, पांढरा पेठारा, बांबूवाष्टे, भराटी, मटारू, राजगिरा, रानआल, रानकोचई, रानमटाळू, वाघोटी, वगैरे.

महाराष्ट्रात उगवणाऱ्या काही रानभाज्या

  • अनवे
  • अमरकंद
  • अळंबी (अळवे)
  • अाघाडा
  • आचकंद
  • आलिंग
  • उळशाचा मोहर
  • कडकिंदा
  • कडूकंद
  • करटोली/ कर्टोल / करटुली (Momerdica Dioica)
  • कवदर
  • कवळी
  • काटे-माठ (Amarantus Spinosus)
  • कुड्याची फुले
  • कुर्डू
  • कुसरा
  • कुळू (कोळू)
  • कोंबडा
  • कोरड
  • कोलासने (तालिमखाना)
  • कोवळे बांबू
  • कोळू
  • कौला
  • गेंठा
  • गोमाठी
  • घोळ/घोळू/चिवई/चिवळी (Porthulaca)
  • चवळीचे बोके - नवीनच उगवलेल्या चवळीच्या वेलाची टोकाकडची कोवळी पाने
  • चाई
  • चाईचा मोहर
  • चायवळ
  • चावा
  • चिचारडी
  • चिंचुरडा
  • चिवलाचे कोंब
  • टाकळा (Cassia tora)
  • टेंबरण
  • टेंभुर्णा
  • टेरा/टेहरा
  • तरोटा
  • तांदुळजा
  • तांबोळी
  • तेर अळू
  • तेल छत्र
  • तोंडे
  • दिघवडी
  • दिवा
  • देठा
  • धापा
  • नारळी
  • पंदा
  • पिपाना
  • फांग
  • फांदा
  • फोडशी (Celosia Argentea)
  • बडकी
  • बड़दा
  • बहावा
  • बांबूचे कोंब
  • बेरसिंग
  • बोखरीचा मोहर
  • बोंडारा
  • भारंगी (भारिंगा) (Clerodendrum Serratum)
  • भुईपालक
  • भुईफोड
  • भोकर
  • लाल भोपळा|लाल भोपळ्याच्या]] अगदी छोट्या वेलीला आलेली कोवळी पाने
  • भोपळ्याची फुले
  • भोपा
  • महाळुंग
  • माठ
  • माड
  • मेके
  • मोखा/रानकंद मोखा
  • मोहदोडे (मोहा)
  • रक्त कांचन
  • रताळ्याचे कोंब
  • रानकेळी
  • रानतोंडले
  • रानपुदाना
  • राक्षस
  • रुई
  • रुंखाळा
  • लोथी
  • लोधी
  • वांगोटी (वांघोटी) (वाघाटी) (वाघाटा)
  • वाथरटे
  • शेऊळ (शेवळा/शेवळे) (Amorthophylus Commutatis)
  • शेवग्याची पाने
  • शेवग्याची फुले
  • शेवळे (Amorthophylus Commutatis)
  • सतरा
  • सायर
  • सुरणाचा कोवळा पाला
  • हरबऱ्याची कोवळी पाने
  • हळंदा
  • हादगा

Collected from Adivasi people from Kalsubai harichandragad Sanctuary by ramdaslandge07@gmail.com

रानभाज्यांची माहिती देणारी पुस्तके

  • आरोग्यदायी रानभाज्या (मधुकर बाचुळकर) - सकाळ प्रकाशन
  • ओळख रानभाज्यांची (मधुकर बाचुळकर, डॉ. अशोक वाली, डॉ. हरीश नांगरे) - निसर्गमित्र प्रकाशन, कोल्हापूर
  • बखर रानभाज्यांची : प्रवास रानभाज्यांच्या शोधाचा (नीलिमा जोरवर) - लोकवाङ्मय प्रकाशन (२०१८)
  • रानभाज्या (भा.पं. जोशी) - काॅन्टिनेन्टल प्रकाशन
  1. ^ http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=9. १ ऑगस्ट, इ.स. २०१६ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)