Jump to content

"सम्यक साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३१: ओळ ३१:
त्याचप्रमाणे नागपूरच्या सम्यक थिएटरतर्फे इ.स.२००० पासून दरवर्षी भरणारे ’सम्यक थिएटर पारिवारिक संमेलन’ही वेगळे आहे.
त्याचप्रमाणे नागपूरच्या सम्यक थिएटरतर्फे इ.स.२००० पासून दरवर्षी भरणारे ’सम्यक थिएटर पारिवारिक संमेलन’ही वेगळे आहे.


दिल्लीत तालकटोरा स्टेडियममध्ये होतात ती सम्यक बौद्ध संमेलने वेगळी आहेत.
दिल्लीत तालकटोरा स्टेडियममध्ये होतात ती सम्यक बौद्ध संमेलने वेगळी आहेत. या संमेलनात दरवर्षी 'गीतोंभरी शाम बाबासाहेब के नाम' नावाचा भीमगीतांचा कार्यक्रम असतो.





२०:१४, २० डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

सम्यक साहित्य संमेलन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे आयोजित केले जाते.

पहिल्या सम्यक साहित्य संमेलनाचे आयोजन इ.स. २०१० साली करण्यात आले होते. दीनानाथ मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनाचे उद्घाटन कांचा आयलया यांच्या हस्ते झाले होते. परशुराम आठवले हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समिती व पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, पुणे विद्यापीठाच्या एका सभागृहात, १४-१६ डिसेंबर २०१२ या काळात ३रे सम्यक साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष संजय पवार, स्वागताध्यक्ष परशुराम वाडेकर आणि कार्याध्यक्ष डॉ. विजय खरे आणि अविनाश महातेकर होते. संमेलनाचा समारोप गंगाधर पानतावणे यांच्या भाषणाने झाला.

संमेलनात पास झालेले ठराव : १. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा.
२. महात्मा फुले आणि सावित्री फुले यांना भारतरत्‍न पुरस्कार द्यावा.
३. शाहू-आंबेडकर-फुले यांच्यावरील धड्यांचा पाठपुस्तकात समावेश करावा, आदी.

संजय पवार यांच्या भाषणातून

"या तिसर्‍या सम्यक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण फुले-शाहू-आंबेडकरांचा गजर, ब्राह्मणी व्यवस्थेवर टीका, बहुजनवाद, राजकीय नेतृत्वावर टीका, हा नेहमीचा सिलॅबस बाजूला ठेवून अंतर्मुख होऊ या."

आतापर्यंतची सम्यक साहित्य संमेलने

  • १ले सम्यक साहित्य संमेलन पुण्यात ११ ते १३ एप्रिल २०१० या कालावधीत भरले होते. दीनानाथ मनोहर हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते.
  • २रे संमेलन पुण्यात १ ते ३ एप्रिल २०११ या काळात झाले होते; संमेलनाध्यक्ष नामदेव ढसाळ होते.
  • ३रे सम्यक साहित्य संमेलन १४-१६ डिसेंबर २०१२ या काळात पुणे शहरात झाले. संमेलनाध्यक्ष संजय पवार होते
  • ४थे संमेलन पुणे शहरात १३-१५ डिसेंबर २०१३ या काळात झाले. अध्यक्षस्थानी कवयित्री नीरजा होत्या. या संमेलनात साहित्यिक रा.ग. जाधव यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.
  • ५वे संमेलन पुणे शहरात १७-१८-१९-२० डिसेंबर २०१५ या काळात झाले. रावसाहेब कसबे हे अध्यक्ष आहेत. या संमेलनात डॉ. आ.ह. साळुंखे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. ब्राह्मणांनी सर्व संतांचे ब्राह्मणीकरण केले अशी टिप्पणी कसबे यांनी केली.

साहित्य क्षेत्रात पुरस्कार देताना परस्पर मैत्रभाव, आत्मीयता, हितसंबंधांना प्राध्यान्य दिले जाते. साहित्यकृतीचा दर्जा, गुणवत्ता, लेखनक्षमता यांचा विचारच केला जात नाही. अनेकदा त्याला जातीय संदर्भही असतो असा सूर या सम्यक साहित्य संमेलनात व्यक्त झाला.

  • ६वे सम्यक साहित्य संमेलन २०१७ सालच्या एप्रिल महिन्यात होणार आहे.
  • एक सम्यक साहित्य संमेलन १२-१३-१४ जानेवारी २०१८ या काळात पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे. प्रा. यशवंत मनोहर संमेलनाध्यक्ष असतील. हे संमेलन विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या वतीने आयोजित करण्यात येईल. संमेलनात भीमशाहिरी गीतांचे कार्यक्रम होतील.

अन्य माहिती

ही सम्यक साहित्य संमेलने दरवर्षी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आयोजित करते.

हे संमेलन आणि, सम्यक साहित्य संसद भरवते तो ’सम्यक साहित्य मेळावा’ भिन्न आहे.

त्याचप्रमाणे नागपूरच्या सम्यक थिएटरतर्फे इ.स.२००० पासून दरवर्षी भरणारे ’सम्यक थिएटर पारिवारिक संमेलन’ही वेगळे आहे.

दिल्लीत तालकटोरा स्टेडियममध्ये होतात ती सम्यक बौद्ध संमेलने वेगळी आहेत. या संमेलनात दरवर्षी 'गीतोंभरी शाम बाबासाहेब के नाम' नावाचा भीमगीतांचा कार्यक्रम असतो.




पहा : मराठी साहित्य संमेलने; दलित संस्था