Jump to content

संजय पवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संजय पवार
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र लेखन
साहित्य प्रकार कादंबरी, काव्य


संजय पवार हे चित्रकार, जाहिरातकार आणि मराठी नाटककार, स्तंभलेखक, संवाद लेखक आणि पटकथा लेखक आहेत. त्यांनी ’सिंधूताई सपकाळ’ या चित्रपटासाठी दोन पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी जब्बार पटेलांच्या ‘मुक्ता’ या सिनेमासाठी संवाद लेखन केले. त्यानंतर डोंबिवली फास्ट (संवाद), सातच्या आत घरात (संवाद), सनई चौघडे (संवाद), मी सिंधूताई सपकाळ (पटकथा संवाद), मी शिवाजी राजे भोसले बोलतोय.. (पटकथा संवाद) आणि ‘लई भारी’ या चित्रपटाचे संवाद लेखनही पवार यांनी केले आहे. त्यांनी लिहिलेल्या ’कोण म्हणतो टक्का दिला’, ’गाईच्या शापाने’ आणि ’१९७४ आणि एके ४७’ या एकांकिकांनी रंगभूमीवर वादळ उठवले होते.

संजय पवार यांनी हिंदीतही त्यांनी ज्युली, बिरूद या चित्रपटाचे संवाद लेखन केले आहे.

संजय पवार यांना २०१२ सालचा दया पवार स्मृति पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पाच हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ’सिंधूताई सपकाळ’ या चित्रपटासाठी दोन पुरस्कार मिळाले आहेत. संजय पवार यांना ’ठष्ट’ या नाटकाच्या लेखनासाठी मॅजेस्टिक प्रकाशनाचा विसाव्या वर्षीचा जयवंत दळवी पुरस्कार देण्यात आला. (२४-९-२०१५)

संजय पवार हे तिसऱ्या सम्यक साहित्य संंमेलनाचे अध्यक्ष होते.

कणकवलीतील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे २७ ते ३० डिसेंबर २०१२ या काळात नाटककार संजय पवार यांच्या एकांकिकांचा महोत्सव भरवला होता.

संजय पवार यांनी लिहिलेल्या काही एकांकिका[संपादन]

 • एका बिळात होती
 • १९४७ ते एके ४७
 • कायदा आणि सुव्यवस्था
 • कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे
 • गाईच्या शापाने
 • चाळ कमेटी
 • डॉटर्स ऑफ महाराष्ट्रा
 • दुकान कुणी मांडू नये
 • पांडुरंग
 • पाषाणकर, तुमचं काय चाललंय?
 • फ्लाइंग क्वीन्स
 • भाई सांगे अण्णाला
 • मान्यतेच्या झग्याखाली
 • मुळचंद सफरचंद
 • शापित नात्यांच्या वाटेवर
 • सती
 • सातच्या आत घरात
 • ऐन आषाढात पंढरपुरात

संजय पवार यांनी लिहिलेली नाटके[संपादन]

 • आम्ही जातो आमुच्या गावा (या नाटकाचा पहिला प्रयोग जोधपूर येथे २२-११-१९९१ रोजी झाला)
 • कोण म्हणतं टक्का दिला?
 • चोख्याच्या पायरीवरून
 • ठष्ट (लेखन आणि दिग्दर्शन)
 • दोन अंकी नाटक (या नाटकाचा पहिला प्रयोग आराधना नाट्य संघाने राज्यनाट्यस्पर्धेत डिसेंबर १९८४ मध्ये केला.)

अन्य पुस्तके[संपादन]

 • एकलव्याच्या भात्यातून (कथासंग्रह)
 • पानीकम (वैचारिक)
 • वेळोवेळी (सदरलेखनसंग्रह)
 • सदर लेखन संजय पवार यांचे आहे! (ललित लेखसंग्रह)
 • समग्र पानीकम भाग एक व दोन (वैचारिक)