"हरी नरके" च्या विविध आवृत्यांमधील फरक
विशेषणे काढली |
|||
ओळ ८: | ओळ ८: | ||
प्रा. हरी नरके यांनी विपुल लेखन केले आहे. '''महात्मा फुले-शोधाच्या नव्या वाटा''' हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. फेब्रुवारी २०११ पासून ते ब्लॉग लिहितात. फेसबुकवही ते लिखाण करतात. |
प्रा. हरी नरके यांनी विपुल लेखन केले आहे. '''महात्मा फुले-शोधाच्या नव्या वाटा''' हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. फेब्रुवारी २०११ पासून ते ब्लॉग लिहितात. फेसबुकवही ते लिखाण करतात. |
||
प्रा. हरी नरके यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गटाला आपल्या ब्लॉगमधून आधार दिला. हे लेख काही वर्तमानपत्रांतही प्रसिद्ध झाले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर प्रा. हरी नरके यांचा [[अनिता पाटील]] यांच्याशी ब्लॉगवरून वादविवाद झाले. [[मराठा]] आणि [[कुणबी]] एकच आहेत की दोन या मुद्यावर प्रामुख्याने हा वाद होता. |
प्रा. हरी नरके यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गटाला आपल्या ब्लॉगमधून आधार दिला. हे लेख काही वर्तमानपत्रांतही प्रसिद्ध झाले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर प्रा. हरी नरके यांचा [[अनिता पाटील]] यांच्याशी ब्लॉगवरून वादविवाद झाले. [[मराठा]] आणि [[कुणबी]] एकच आहेत की दोन या मुद्यावर प्रामुख्याने हा वाद होता. |
||
हरी नरके यांनी फुले-आंबेडकर कोश लिहायला सुरुवात केली आहे. या कोशात |
|||
१. या कोशात फुले-आंबेडकर यांच्या साहित्य ग्रंथांचा व अन्य लेखनाचा चिकित्सक परिचय दिलेला असेल. |
|||
२. त्यांच्या जीवनकार्यावर आणि साहित्यावर लिहिले गेलेले सर्व ग्रंथ, प्रामुख्यानं (मराठी, हिंदी, इंग्रजी) यांचा परिचय दिलेला असेल. केवळ ग्रंथसूची नव्हे तर त्या त्या पुस्तकात नेमके काय आहे, तो किती दर्जेदार ऐवज आहे याचा शोधपर धांडोळा या कोशात असेल. |
|||
३. फुले-आंबेडकर चळवळीच्या इतिहास साधनांची, दस्तावेजांची विस्तृत माहिती या कोशात असेल. हे दस्तावेज कुठल्या व्यक्ती, संस्था, वाचनालये, ग्रंथालये यांच्याकडे उपलब्ध आहेत आणि तिथवर कसे पोहोचायचे याबाबत संपर्क-साधन व्यक्ती, संस्था यांचीही माहिती या कोशात असेल. |
|||
४. एम. फिल., पीएच.डी., किंवा पोस्ट डॉक्टरल रिसर्चसाठी देशात आणि देशाबाहेर फुले-आंबेडकर यांच्याविषयक झालेले सर्व काम कोशात नमूद असेल. या कामांचा नेमका धांडोळा या कोशात एकत्र मिळेल. |
|||
५. या विषयाच्या संदर्भात नवे कोणते काम करता येणे शक्य आहे, कोणते काम अजून बाकी आहे याचीही माहिती या कोशात असेल. |
|||
६. आणखी कितीतरी नवीन अन्य बाबी या कोशात समाविष्ट असतील. |
|||
==लेखांचे विषय== |
==लेखांचे विषय== |
१९:५२, १० डिसेंबर २०१७ ची आवृत्ती
हरी रामचंद्र नरके (१ जून, १९६३) हे एक मराठी लेखक, अभ्यासू संशोधक आणि मराठी ब्लॉगर आहेत. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक आहेत.[१] ते महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य आहेत. हा आयोग महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग या गटात एखाद्या जातीचा समावेश करण्यासाठी किंवा त्या वर्ग-प्रवर्गातून एखादी जात वगळण्यासाठी आलेल्या मागण्या व तक्रारीची तपासणी, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून उरलेल्या अन्य मागासवर्गीयांच्या यादीमध्ये, सामाजिक, आर्थिक निकषानुसार प्रगत व उन्नत गट किंवा व्यक्ती निर्धारित करून संबंधित जात वगळण्याकरिता किंवा जातीचा समावेश करण्यासाठी राज्य शासनास अभ्यासपूर्ण शिफारस आदी गोष्टी करतो.
हरी नरके उत्तम वक्ते आहेत. त्यांची पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रा. हरी नरके प्रयत्नशील आहेत.
लेखन
प्रा. हरी नरके यांनी विपुल लेखन केले आहे. महात्मा फुले-शोधाच्या नव्या वाटा हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. फेब्रुवारी २०११ पासून ते ब्लॉग लिहितात. फेसबुकवही ते लिखाण करतात. प्रा. हरी नरके यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गटाला आपल्या ब्लॉगमधून आधार दिला. हे लेख काही वर्तमानपत्रांतही प्रसिद्ध झाले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर प्रा. हरी नरके यांचा अनिता पाटील यांच्याशी ब्लॉगवरून वादविवाद झाले. मराठा आणि कुणबी एकच आहेत की दोन या मुद्यावर प्रामुख्याने हा वाद होता.
हरी नरके यांनी फुले-आंबेडकर कोश लिहायला सुरुवात केली आहे. या कोशात
१. या कोशात फुले-आंबेडकर यांच्या साहित्य ग्रंथांचा व अन्य लेखनाचा चिकित्सक परिचय दिलेला असेल.
२. त्यांच्या जीवनकार्यावर आणि साहित्यावर लिहिले गेलेले सर्व ग्रंथ, प्रामुख्यानं (मराठी, हिंदी, इंग्रजी) यांचा परिचय दिलेला असेल. केवळ ग्रंथसूची नव्हे तर त्या त्या पुस्तकात नेमके काय आहे, तो किती दर्जेदार ऐवज आहे याचा शोधपर धांडोळा या कोशात असेल.
३. फुले-आंबेडकर चळवळीच्या इतिहास साधनांची, दस्तावेजांची विस्तृत माहिती या कोशात असेल. हे दस्तावेज कुठल्या व्यक्ती, संस्था, वाचनालये, ग्रंथालये यांच्याकडे उपलब्ध आहेत आणि तिथवर कसे पोहोचायचे याबाबत संपर्क-साधन व्यक्ती, संस्था यांचीही माहिती या कोशात असेल.
४. एम. फिल., पीएच.डी., किंवा पोस्ट डॉक्टरल रिसर्चसाठी देशात आणि देशाबाहेर फुले-आंबेडकर यांच्याविषयक झालेले सर्व काम कोशात नमूद असेल. या कामांचा नेमका धांडोळा या कोशात एकत्र मिळेल.
५. या विषयाच्या संदर्भात नवे कोणते काम करता येणे शक्य आहे, कोणते काम अजून बाकी आहे याचीही माहिती या कोशात असेल.
६. आणखी कितीतरी नवीन अन्य बाबी या कोशात समाविष्ट असतील.
लेखांचे विषय
- ओबीसी जनगणना
- अण्णा हजारे आणि आपण
- अभिजात मराठी
- आरक्षण चित्रपट
- आरक्षणविषयक
- ओबीसी जनगणना
- ओबीसींमध्ये पेरली दुहीची बीजे
- घरेलू कामगारांना न्यायासाठी प्रयत्न: छगन भुजबळ
- चळवळीतल्या सर्वांची लाडकी लेक
- फॅसिस्ट शक्तीमुळे बहुजनांचे विभाजन
- मराठा आरक्षण
- मराठी अभिजात कशी?
- महात्मा फुले
- महाराजा यशवंतराव होळकर चरित्राचे प्रकाशन
- माझे विश्व
- शिक्षण
- संभाजी ब्रिगेड
- समाजशोध
संदर्भ आणि नोंदी
- ^ देवीदास देशपांडे. (हिंदी भाषेत) http://www.bbc.co.uk/hindi/india/2014/01/140115_namdeo_death_reaction_tk.shtml. २३ मार्च २०१४ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)
बाह्य दुवे
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |