मराठी ब्लॉगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मराठी ब्लॉग म्हणजे इंटरनेटवर लिहिलेली मराठी भाषेतील अनुदिनी होय. इंटरनेटवर मराठी भाषेत लिखाण करणे शक्य झाल्यानंतर मराठी ब्लॉग दिसू लागले. आता मराठीत शेकडो ब्लॉग लिहिले जातात. २१ व्या शतकात माध्यमांचे स्वरूप पूर्णत: बदलले. माध्यमे विशेषत: वृत्तपत्रे व्यवसायिक झाली. जी वृत्तपत्रे व्यवसायिकतेपासून दूर राहिली ती बंद पडली. दै. मराठवाडा हे याचे सर्वाधिक उत्तम उदाहरण होय. व्यावसायिक माध्यमांत वैचारिक आणि संशोधनात्मक लेखनाला कोणतेही स्थान राहिले नाही. त्यामुळे, एक मोठी पोकळी त्यातून निर्माण झाली. ही पोकळी ब्लॉग या नव्या माध्यमाने भरून काढली. २०१० सालापर्यंत मराठीतील वृत्तपत्रे आणि नियतकालिके यांना समांतर असा स्वतंत्र मीडिया ब्लॉगच्या रूपाने उभा राहिला. मराठीत शेकडो ब्लॉग लिहिले जातात. मेन स्ट्रिम मीडियापेक्षाही जास्त वाचकवर्ग ब्लॉगला आहे. मराठीतील अनेक नामांकित साहित्यिक संशोधक ब्लॉग लिहितात. पुरोगामी विचारांच्या ब्लॉगला वाचकांचा सर्वाधिक पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येते.

मराठी भाषेतील गाजलेले ब्लॉग लेखक[संपादन]

मराठी भाषेत अनेक दिग्गज लेखक, साहित्यिक, संशोधक मंडळी आता ब्लॉग लेखन करू लागली आहे. अनेक पत्रकारही ब्लॉग लिहितात. सचिन परब, सूर्यकांत पळसकर ही काही पत्रकार मंडळी ब्लॉग लिहितात. बहुतांश मराठी ब्लॉगर स्वतःच्या नावानेच ब्लॉग लिहितात. काहींनी आपल्या ब्लॉगला स्वतंत्र नावे दिली आहेत.

परंतु ब्लॉग म्हणजे काय ? या बाबत जाणून घेण्यासाठी google search मध्ये blog Mhanje Kay किंवा ब्लॉग म्हणजे काय टाईप करा. दुसऱ्या किंवा तिसऱ्या नंबरवर kickstartonline.in या ववेबसाईट वर तुम्हाला संपूर्ण Step-By-Step माहिती मिळेल. धन्यवाद :)

मराठीतील काही गाजलेले ब्लॉगर पुढीलप्रमाणे आहेत :

अरुंधती कुलकर्णी

जयंत कुलकर्णी

तात्या अभ्यंकर

नचिकेत जोशी

नरेंद्र गोळे

प्रकाश पोळ [[ http://www.sahyadribana.com सह्याद्री बाणा]]

महेंद्र कुलकर्णी [महेंद्र कुलकर्णी]

सचिन परब

सूर्यकांत पळसकरWiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.