Jump to content

"रुस्तुम अचलखांब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''डॉ. रुस्तुम अचलखांब ''' (जन्म : इ.स. १९४४; मृत्यू : २५ ऑक्टोबर २०१७) हे एक मराठी लेखक व नाटककार होते. [[जालना]] जिल्ह्यातले मानेगाव हे त्यांचे मूळ गाव. [[डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ|डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात]] [[नाट्यशास्त्र]] विभागाचे ते विभागप्रमुख होते. गावकी हे त्यांचे आत्मकथन प्रसिद्ध आहे.
'''प्रा. डॉ. रुस्तुम अचलखांब ''' (जन्म : इ.स. १९४४; मृत्यू : २५ ऑक्टोबर २०१७) हे एक मराठी लेखक व नाटककार होते. [[जालना]] जिल्ह्यातले मानेगाव हे त्यांचे मूळ गाव. मोठ्या कष्टात त्यांनी शिक्षण घेतले. त्यांचे बालपण आणि शिक्षणासाठी त्यांनी खाल्लेल्या खस्ता याचा ऊहापोह ‘गावकी’ या त्यांच्या आत्मकथनामध्ये ठसठशीतपणे दिसून येतो.

[[डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ|डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात]] [[नाट्यशास्त्र]] विभागाचे ते विभागप्रमुख होते. गावकी हे त्यांचे आत्मकथन प्रसिद्ध आहे.
डॉ. अचलखांब यांचा लोकनाट्य, तमाशा आणि लोककलांचा विशेष अभ्यास होता. याच विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली होती. त्यांनी ७० नाटकांचे दिग्दर्शन केले होते. त्यांत संगीत सौभद्र, संगीत एकच प्याला, गाढवाचं लग्न, राजाचा खेळ यांचा समावेश होता. [[महात्मा फुले]] यांनी लिहिलेल्या 'तृतीयरत्न' या नाटकाचे त्यांनी दिग्दर्शन आणि सादरीकरण केले होते. या नाटकाचा पहिला प्रयोग डॉ. अचलखांब यांनी २८ नोव्हेंबर १९८९ रोजी केला होता.

==संशोधन==
डॉ. अचलखांब यांचा लोकनाट्य, तमाशा आणि लोककलांचा विशेष अभ्यास होता. याच विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली होती.

प्रा. अचलखांब यांनी मराठी मुलखातील शाहिरीची परंपरा अभ्यासून त्यातील जवळजवळ विस्मृतीत गेलेल्या पण मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींचे संशोधन केले. तमाशातील माणसे आणि त्यांचे जगणे यावर अचलखांब यांनी संशोधनपूर्ण लेखन केले..

==मराठी नाट्यसृष्टीतील कामगिरी==
रुस्तम अचलखांब यांनी ७० नाटकांचे दिग्दर्शन केले होते. त्यांत संगीत सौभद्र, संगीत एकच प्याला, गाढवाचं लग्न, राजाचा खेळ यांचा समावेश होता. [[महात्मा फुले]] यांनी लिहिलेल्या 'तृतीयरत्न' या नाटकाचे त्यांनी दिग्दर्शन आणि सादरीकरण केले होते. या नाटकाचा पहिला प्रयोग डॉ. अचलखांब यांनी २८ नोव्हेंबर १९८९ रोजी केला होता.

रुस्तुम अचलखांब यांनी 'गाढवाचे लग्न' या लोकनाट्याचे १५० प्रयोग केले. त्यांनी साकारलेला सावळा कुंभार हा अनेकांच्या स्मरणात आहे. 'एकच प्याला'चेही त्यांनी अनेक प्रयोग केले होते.
रुस्तुम अचलखांब यांनी 'गाढवाचे लग्न' या लोकनाट्याचे १५० प्रयोग केले. त्यांनी साकारलेला सावळा कुंभार हा अनेकांच्या स्मरणात आहे. 'एकच प्याला'चेही त्यांनी अनेक प्रयोग केले होते.

२०:००, २६ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

प्रा. डॉ. रुस्तुम अचलखांब (जन्म : इ.स. १९४४; मृत्यू : २५ ऑक्टोबर २०१७) हे एक मराठी लेखक व नाटककार होते. जालना जिल्ह्यातले मानेगाव हे त्यांचे मूळ गाव. मोठ्या कष्टात त्यांनी शिक्षण घेतले. त्यांचे बालपण आणि शिक्षणासाठी त्यांनी खाल्लेल्या खस्ता याचा ऊहापोह ‘गावकी’ या त्यांच्या आत्मकथनामध्ये ठसठशीतपणे दिसून येतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नाट्यशास्त्र विभागाचे ते विभागप्रमुख होते. गावकी हे त्यांचे आत्मकथन प्रसिद्ध आहे.

संशोधन

डॉ. अचलखांब यांचा लोकनाट्य, तमाशा आणि लोककलांचा विशेष अभ्यास होता. याच विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली होती.

प्रा. अचलखांब यांनी मराठी मुलखातील शाहिरीची परंपरा अभ्यासून त्यातील जवळजवळ विस्मृतीत गेलेल्या पण मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींचे संशोधन केले. तमाशातील माणसे आणि त्यांचे जगणे यावर अचलखांब यांनी संशोधनपूर्ण लेखन केले..

मराठी नाट्यसृष्टीतील कामगिरी

रुस्तम अचलखांब यांनी ७० नाटकांचे दिग्दर्शन केले होते. त्यांत संगीत सौभद्र, संगीत एकच प्याला, गाढवाचं लग्न, राजाचा खेळ यांचा समावेश होता. महात्मा फुले यांनी लिहिलेल्या 'तृतीयरत्न' या नाटकाचे त्यांनी दिग्दर्शन आणि सादरीकरण केले होते. या नाटकाचा पहिला प्रयोग डॉ. अचलखांब यांनी २८ नोव्हेंबर १९८९ रोजी केला होता.

रुस्तुम अचलखांब यांनी 'गाढवाचे लग्न' या लोकनाट्याचे १५० प्रयोग केले. त्यांनी साकारलेला सावळा कुंभार हा अनेकांच्या स्मरणात आहे. 'एकच प्याला'चेही त्यांनी अनेक प्रयोग केले होते.

शिवरायांचा आठवावा प्रताप' या नाटकातून अचलखांब यांनी गोंधळ, भारूड या माध्यमातून शिवाजी महाराज समजावून सांगितले होते.

अचलखांब यांची पुस्तके

  • अभिनयशास्त्र
  • गावकी (प्रथम आवृत्ती १९८३)
  • तमाशा लोकरंगभूमी

पुरस्कार आणि सन्मान

  • २००९ मध्ये पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे झालेल्या अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.