Jump to content

"वांगे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ४: ओळ ४:
==जाती==
==जाती==
वांगी प्रामुख्याने ३ प्रकारात आढळतात. गोल, लांब व सडपातळ, व ठेंगण्या झाडाची.
वांगी प्रामुख्याने ३ प्रकारात आढळतात. गोल, लांब व सडपातळ, व ठेंगण्या झाडाची.
* वांग्याच्या पारंपरिक जाती -गुलाबी, हिरवी, पांढरी आणि काळ्या रंगाची वांगी, ‘रवय’ आणि ‘कल्यामी’ अश्या दोन जातींची वांगी, आणि घुडी, वेली, बाणवांगे, भोंगाफाईट अशा आकारांमधली वांगी वसई भागात पिकतात.
* जाती - पुसा पर्पल क्लस्टर, पुसा क्रांती, पुसा अनमोल, पुसा पर्पल राउंड, अर्का शील, अर्का शिरीष, अर्का कुसुमाकर, अर्का नवनीत, आझाद क्रांती, विजय हायब्रीड.
* जाती - पुसा पर्पल क्लस्टर, पुसा क्रांती, पुसा अनमोल, पुसा पर्पल राउंड, अर्का शील, अर्का शिरीष, अर्का कुसुमाकर, अर्का नवनीत, आझाद क्रांती, विजय हायब्रीड.
* महाराष्ट्रात लागवडीस शिफारस केलेल्या वांग्याचे प्रकार - मांजरी गोटा, वैशाली, पुसा क्रांती, पुसा जांभळी गोल, पुसा जांभळी लांब
* महाराष्ट्रात लागवडीस शिफारस केलेल्या वांग्याचे प्रकार - मांजरी गोटा, वैशाली, पुसा क्रांती, पुसा जांभळी गोल, पुसा जांभळी लांब
* सुधारित जाती - मांजरी गोटा, कृष्णा, फुले हरित, फुले अर्जुन, को-१, को-२ व पी. के. एम. १.
* सुधारित जाती - मांजरी गोटा, कृष्णा, फुले हरित, फुले अर्जुन, को-१, को-२ व पी. के. एम. १.

==लागवड==
==लागवड==
रोप तयार करुन पुर्नलागवड पद्धतीने लावली जातात. निचरा होणाऱ्या जमीनीत याची लागवड केली जाते.
रोप तयार करुन पुर्नलागवड पद्धतीने लावली जातात. निचरा होणाऱ्या जमीनीत याची लागवड केली जाते.

१३:१५, २५ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

वांग्याची पाने व फळ

वांगे (शास्त्रीय नाव: Solanum melongena, सोलानम मेलाँजेना ;) ही सोलानम प्रजातीतील एक वनस्पती आहे. त्याची फळे स्वयंपाकात खाद्यपदार्थ म्हणून वापरली जातात. मुळातील दक्षिण आशियातून उगम पावलेल्या या वनस्पतीची लागवड आता उष्णकटिबंधातसमशीतोष्णकटिबंधात अन्य भूप्रदेशांमध्येही केली जाते. चीन मध्ये सर्वप्रथम वांगी वापरात आल्याचा उल्लेख आढळतो. महाराष्ट्रात पीक आल्यावर खंडोबाला वांग्याचे भरीत अर्पण करण्याची प्राचीन परंपरा आढळते. निघण्टु रत्नाकर या ग्रंथात वांगे वृन्ताकं स्वादु तीक्ष्णोष्णं पाके कटु च असा वांग्याचा आयुर्वेदीय उल्लेख आढळतो.

टोपलीत ठेवलेली जांभळ्या सालीची वांगी

वांग्यांची भाजी केली जाते.मोठ्या आकारमानाच्या वांग्यांचे भरीत केले जाते. वांगी घालून भातही केला जातो. वाळवलेल्या वांग्याचे लोणचेही केले जाते.

जाती

वांगी प्रामुख्याने ३ प्रकारात आढळतात. गोल, लांब व सडपातळ, व ठेंगण्या झाडाची.

  • वांग्याच्या पारंपरिक जाती -गुलाबी, हिरवी, पांढरी आणि काळ्या रंगाची वांगी, ‘रवय’ आणि ‘कल्यामी’ अश्या दोन जातींची वांगी, आणि घुडी, वेली, बाणवांगे, भोंगाफाईट अशा आकारांमधली वांगी वसई भागात पिकतात.
  • जाती - पुसा पर्पल क्लस्टर, पुसा क्रांती, पुसा अनमोल, पुसा पर्पल राउंड, अर्का शील, अर्का शिरीष, अर्का कुसुमाकर, अर्का नवनीत, आझाद क्रांती, विजय हायब्रीड.
  • महाराष्ट्रात लागवडीस शिफारस केलेल्या वांग्याचे प्रकार - मांजरी गोटा, वैशाली, पुसा क्रांती, पुसा जांभळी गोल, पुसा जांभळी लांब
  • सुधारित जाती - मांजरी गोटा, कृष्णा, फुले हरित, फुले अर्जुन, को-१, को-२ व पी. के. एम. १.

लागवड

रोप तयार करुन पुर्नलागवड पद्धतीने लावली जातात. निचरा होणाऱ्या जमीनीत याची लागवड केली जाते.

रोग

वांगे, टोमॅटो आणि मिरची या तिन्हीचे जुनकीय गुणधर्म सारखे असतात. परंतु ही पिके एकाच वाफ्यात घेतली जात नाहीत. कारण सूत्रकृमींचा प्रादुर्भाव होतो. याच्या रोपट्यांवर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाल्यास,ते या पिकावरील रस शोषून घेतात. यामुळे ते पिक पिवळे पडते,वांग्यांची वाढ होत नाही..[]

संदर्भ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: