स्वयंपाक
स्वयंपाक ही अग्नीचे/उष्णतेचे सहाय्याने खाण्यासाठी अन्नपदार्थ व खाद्यपदार्थ तयार करण्याची एक कला, तंत्रज्ञानव कारागिरी आहे. जगभर स्वयंपाकाचे घटक व पद्धतींमध्ये अनेकानेक बदल असतात.खुल्या अग्नीचा वापर करुन जाळीवर भाजणे,वेगवेगळ्या भट्ट्यांचा वापर,वाफेचा वापर,विद्युतचलित उष्णता निर्माणकांचा तसेच सौर ऊर्जेचा वापर इत्यादी प्रकार यात वेगवेगळे पर्यावरणिय, आर्थिक, सांस्कृतिक परंपरा व पद्धती दृक्गोचर होतात. स्वयंपाक हा तो करणाऱ्याचे कुशलतेवर व प्रकारावर अवलंबुन असतो तसेच,त्या व्यक्तिला मिळालेल्या त्याचे शिक्षणानुसार. व्यक्तिनुसार व प्रांतानुसार त्यात बदल घडतात.
अग्नी किंवा उष्णतेचा वापर करून अन्न हे एकतर घरी शिजविल्या जाते अथवा, हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये. स्वयंपाक करणे ही क्रिया मानवात अन्योन्य आहे. असे अनुमान आहे कि ही क्रिया सुमारे दोन दशलक्ष वर्षांपूर्वी सुरू झाली असावी, पण पुरातत्त्वीय शोधांनुसार तो काळ सुमारे एक दशलक्ष वर्षे इतका येतो.
शेतीचा व्यापक प्रसार, वाणिज्य व व्यापार तसेच विभिन्न प्रांतात असलेल्या संस्कृतींमधील दळणवळण याद्वारे स्वयंपाक करणाऱ्यांना अनेकविध पदार्थ मिळत गेलेत. नविन शोध तसेच तंत्रज्ञानाचा विस्तार,धारक म्हणून व उकळविण्याचे क्रियेसाठी विविध प्रकारची भांडी, स्वयंपाकाची नवनविन साधने इत्यादी गोष्टींनी यात भर पडत गेली. खाद्यपदार्थ तयार करण्याचा कालावधी कमी होत गेला. काही स्वयंपाकी तर,प्रगत वैज्ञानिक तंत्रज्ञानाद्वारे, खाण्यासाठी देण्यात आलेल्या थाळीची लज्जत अनेकपट वाढवितात.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |