Jump to content

"सुमती टिकेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ १: ओळ १:
'''सुमती बाळासाहेब टिकेकर''' ([[जन्म]] : १९३५; [[मृत्यू]] : [[पुणे]], १२ [[ऑक्टोबर]], २०१४) या [[संस्कृत]] [[रंग]]भूमीवरील आणि [[मराठी]] [[संगीत]] रंगभूमीवर एक [[अभिनेत्री]] आणि [[गायिका]] होत्या. त्यांनी नाट्यसंगीताचे प्राथमिक शिक्षण [[अनंत दामले]] यांच्याकडे घेतले. विवाहानंतर [[जयपूर]] घराण्याच्या गायिका [[कमल तांबे]] यांच्याकडून त्यांनी शास्त्रोक्त संगीताचे शिक्षण घेतले. त्यांनी विविध संगीत नाटकांतून भूमिका केल्या होत्या. [[बालगंधर्व]]ांची नाट्यपदे गाण्यासाठी त्यांची ख्याती होती.
'''सुमती बाळासाहेब टिकेकर''' ([[जन्म]] : १९३५; [[मृत्यू]] : [[पुणे]], १२ [[ऑक्टोबर]], २०१४) या [[संस्कृत]] [[रंग]]भूमीवरील आणि [[मराठी]] [[संगीत]] रंगभूमीवर एक [[अभिनेत्री]] आणि [[गायिका]] होत्या.

सुमतीबाईंचे मूळ गाव कोकणातील आरवली. आरवलीच्या लघाटेंची ही कन्या. कोकणातून बहुसंख्य मंडळी मुंबईत आली ती प्रथम गिरगावात स्थिरावली. त्यांचे वास्तव्य गिरगावात खत्रे चाळीत होते. श्रीधर भालचंद्र कंपनी आणि हिंद विजय स्टोअर्स ही त्यांच्या वडिलांची दुकाने होती. विल्सन कॉलेजमधल्या अध्ययन काळात सुमतीबाई भावगीते गात असत. या परिसरातच त्यांची बाळासाहेब टिकेकरांशी संगीत शिकण्याच्या निमित्ताने भेट झाली, आणि १९५५ साली दोघे विवाहबद्ध झाले. विवाहानंतर बाळासाहेबांकडून गाणे शिकणे झाले. त्याचबरोबर सुमतीबाईंनी गावदेवीच्या गोखले संगीत विद्यालयात एन.के. दातारांकडे शास्त्रीय गायनाचे धडेही घेतले आणि त्या संगीत विशारद झाल्या. १९६४-६५ या काळात गानतपस्विनी [[मोगूबाई कुर्डीकर]] यांच्या शिष्या [[कमल तांबे]] या दादर येथे राहत असत. त्यांच्याकडे जाऊन सुमतीबाईंनी [[जयपूर]] गायकीचे शिक्षण घेतले, तर. नाट्यसंगीताचे प्राथमिक शिक्षण [[अनंत दामले]] यांच्याकडे घेतले. सुमतीबाई टिकेकरांनी अनेक संगीत नाटकांतून भूमिका केल्या होत्या. कृष्णराव चोणकर आणि बाळासाहेब टिकेकर यांनी सुमतीबाईंना बालगंधर्वाची गायकी शिकवली. [[बालगंधर्व]]ांची नाट्यपदे गाण्यासाठी सुमतीबाईंची ख्याती होती.

बाळासाहेबांशी विवाह केल्यानंतरर दोघांनी एकत्र अनेक मंचीय संगीत कार्यक्रम सादर केले. सुमतीबाईंना त्याकाळी गणेशोत्सवात नऊ ते दहा कार्यक्रम असायचे. संपूर्ण महाराष्ट्र आणि बडोदा, इंदूर, अहमदाबाद येथेही त्यांनी मैफली सादर केल्या. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या घरची त्यांची गायन मैफल विशेष गाजली. स्वरराज छोटा गंधर्व यांनी त्यांच्या गावाकडील प्रयोगात सुमतीबाईंना सुभद्रेची भूमिका करण्याचे आमंत्रण दिले. ‘धाडिला राम तिने का वनी’ या नाटकाच्या गोवा दौर्‍यातील नऊ प्रयोगांत सुमतीबाईंनी ही भूमिका केली. या भूमिकेसाठी सुमतीबाईंना ‘रसरंग’ अ‍ॅवार्ड मिळाले.

मुंबईत गावदेवी परिसरात गोकुळदास देवजी वाडी येथे संगीतकार एम.जी. गोखले राहत होते. गायक- संगीतकार [[जी.एन. जोशी]] यांना सुमती टिकेकर यांचा आवाज आवडला. हिज मास्टर्स व्ह~ऒईस या ग्रामोफोन कंपनीसाठी त्यांच्या आवाजात भावगीते गाऊन घ्यायची असे त्यांनी ठरवले. त्यावेळी जी.एन. जोशी कंपनीत अधिकारी पदावर होते. गोखले मास्तरांकडे शोभा गुर्टू, निर्मला गोगटे या गायनशिक्षणासाठी येत असत. गोखले मास्तरांनी अनेक चाली केल्या. पैकी ‘आठवणी दाटतात’ आणि ‘श्रीरामाचे दर्शन घडले’ ही त्यांची दोन गीते अफाट लोकप्रिय झाली. १९६९ साली अखिल महाराष्ट्र बालगंधर्व नाट्यगीत स्पर्धेत गायिका सुमती टिकेकर या प्रथम पारितोषिकाच्या मानकरी ठरल्या. या स्पर्धेत हार्मोनियमची साथ बाळासाहेबांनी, तर तबल्याची साथ अण्णासाहेब थत्ते यांनी केली होती.

‘संगीत भर्तृहरीयम्‌’ या संस्कृत नाटकात सुमतीबाई व बाळासाहेब हे नटी-सूत्रधार होते. या नाटकातील आठही पदांच्या चाली बाळासाहेबांनी केल्या होत्या. या नाटकातील एक वेगळे असे पद विशेष गाजले..

‘सिद्धा शाखा लवण मरिच स्नेहयुक्ता प्रभुता

तेवा पूपा मधुमधुरिता शश्कुलिनाम्च राशी:’

संस्कृतपंडित, गणितज्ञ व तबलावादक एस.बी. ऊर्फ दादा वेलणकर यांनी लिहिलेल्या ‘मेघदूतोत्तरम्’ या नाटकात टिकेकर दाम्पत्याने यक्ष व यक्षपत्‍नी या भूमिका केल्या. विनायकराव सरस्वतेलिखित ‘संगीत वरदान’ या नाटकातील दोन पदे सुमतीबाईंच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाली. ‘अनामिक नाद उठे गगनी’ आणि ‘विमल सुर सरी’ ही ती दोन पदे. ही पदे गदिमांनी लिहिली आणि गायक [[वसंतराव देशपांडे]] यांनी स्वरबद्ध केली. सुमतीबाईंनी या नाटकात वसंतरावांसह भूमिकाही केली.


==कौटुंबिक माहिती==
==कौटुंबिक माहिती==
बाळासाहेब टिकेकर लहान असल्यापासूनच कीर्तनकार बुवांकडे तबलासाथ करीत असत. त्याकाळी त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी कराची येथून सात रुपयांत तबला खरेदी करून आणला होता. मुलाचा संगीत या विषयाकडे असलेला कल पाहून त्यांनी घरात व्हायोलिन, पेटी, सतार, दिलरुबा अशी सर्व वाद्ये आणली. बाळासाहेबांना वयाच्या नवव्या वर्षी सातारा येथील क्रांतिसिंह नानासाहेब पाटील यांच्याकडून पार्कर पेन बक्षीस मिळाले. या अशा संगीतातील व्यक्तीशीच सुमतीबाईंचा विवाह झाला.
नाट्यअभिनेता [[उदय टिकेकर]] हे सुमती टिकेकरांचे चिरंजीव, गायिका उषा देशपांडे या कन्या आणि गायिका [[आरती अंकलीकर-टिकेकर]] या स्नुषा होत.

नाट्यअभिनेता [[उदय टिकेकर]] हे सुमती टिकेकरांचे चिरंजीव, गायिका [[उषा देशपांडे]] या कन्या आणि गायिका [[आरती अंकलीकर-टिकेकर]] या स्नुषा होत. [[उषा देशपांडे]] यांनी पंचवीस वर्षे पं.[[फिरोज दस्तूर]] यांच्याकडे किराणा घराणा गायकीचे शिक्षण घेतले आहे.


==सुमती टिकेकरांची भूमिका असलेली नाटके==
==सुमती टिकेकरांची भूमिका असलेली मराठी नाटके==
* धाडिला राम तिने का वनी
* संगीत भर्तृहरीयम्‌ (संस्कृत नाटक)
* संगीत मानापमान
* संगीत मानापमान
* संगीत मेघदूतोत्तरम् (संस्कृत नाटक)
* संगीत वरदान
* संगीत वरदान
* संगीत शारदा
* संगीत शारदा
ओळ ११: ओळ ३०:


==सुमती टिकेकरांनी गायलेली प्रसिद्ध [http://www.aathavanitli-gani.com/Swar/Sumati_Tikekar गीते]==
==सुमती टिकेकरांनी गायलेली प्रसिद्ध [http://www.aathavanitli-gani.com/Swar/Sumati_Tikekar गीते]==
* अनामिक नाद उठे गगनी
* अनामिक नाद उठे गगनी (कवी - [[ग.दि. माडगूळकर]], संगीतकार - [[वसंतराव देशपांडे]])
* आठवणी दाटतात
* आठवणी दाटतात (कवी - [[योगेश्वर अभ्यंकर]], संगीतकार - एम.जी. गोखले)
* विमल सुर सरी (कवी - [[ग.दि. माडगूळकर]], संगीतकार - [[वसंतराव देशपांडे]])
* श्रीरामाचे दर्शन घडले
* श्रीरामाचे दर्शन घडले (कवी - [[योगेश्वर अभ्यंकर]], संगीतकार - एम.जी. गोखले)


==सन्मान==
==सन्मान==

२३:२५, १४ जून २०१७ ची आवृत्ती

सुमती बाळासाहेब टिकेकर (जन्म : १९३५; मृत्यू : पुणे, १२ ऑक्टोबर, २०१४) या संस्कृत रंगभूमीवरील आणि मराठी संगीत रंगभूमीवर एक अभिनेत्री आणि गायिका होत्या.

सुमतीबाईंचे मूळ गाव कोकणातील आरवली. आरवलीच्या लघाटेंची ही कन्या. कोकणातून बहुसंख्य मंडळी मुंबईत आली ती प्रथम गिरगावात स्थिरावली. त्यांचे वास्तव्य गिरगावात खत्रे चाळीत होते. श्रीधर भालचंद्र कंपनी आणि हिंद विजय स्टोअर्स ही त्यांच्या वडिलांची दुकाने होती. विल्सन कॉलेजमधल्या अध्ययन काळात सुमतीबाई भावगीते गात असत. या परिसरातच त्यांची बाळासाहेब टिकेकरांशी संगीत शिकण्याच्या निमित्ताने भेट झाली, आणि १९५५ साली दोघे विवाहबद्ध झाले. विवाहानंतर बाळासाहेबांकडून गाणे शिकणे झाले. त्याचबरोबर सुमतीबाईंनी गावदेवीच्या गोखले संगीत विद्यालयात एन.के. दातारांकडे शास्त्रीय गायनाचे धडेही घेतले आणि त्या संगीत विशारद झाल्या. १९६४-६५ या काळात गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांच्या शिष्या कमल तांबे या दादर येथे राहत असत. त्यांच्याकडे जाऊन सुमतीबाईंनी जयपूर गायकीचे शिक्षण घेतले, तर. नाट्यसंगीताचे प्राथमिक शिक्षण अनंत दामले यांच्याकडे घेतले. सुमतीबाई टिकेकरांनी अनेक संगीत नाटकांतून भूमिका केल्या होत्या. कृष्णराव चोणकर आणि बाळासाहेब टिकेकर यांनी सुमतीबाईंना बालगंधर्वाची गायकी शिकवली. बालगंधर्वांची नाट्यपदे गाण्यासाठी सुमतीबाईंची ख्याती होती.

बाळासाहेबांशी विवाह केल्यानंतरर दोघांनी एकत्र अनेक मंचीय संगीत कार्यक्रम सादर केले. सुमतीबाईंना त्याकाळी गणेशोत्सवात नऊ ते दहा कार्यक्रम असायचे. संपूर्ण महाराष्ट्र आणि बडोदा, इंदूर, अहमदाबाद येथेही त्यांनी मैफली सादर केल्या. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या घरची त्यांची गायन मैफल विशेष गाजली. स्वरराज छोटा गंधर्व यांनी त्यांच्या गावाकडील प्रयोगात सुमतीबाईंना सुभद्रेची भूमिका करण्याचे आमंत्रण दिले. ‘धाडिला राम तिने का वनी’ या नाटकाच्या गोवा दौर्‍यातील नऊ प्रयोगांत सुमतीबाईंनी ही भूमिका केली. या भूमिकेसाठी सुमतीबाईंना ‘रसरंग’ अ‍ॅवार्ड मिळाले.

मुंबईत गावदेवी परिसरात गोकुळदास देवजी वाडी येथे संगीतकार एम.जी. गोखले राहत होते. गायक- संगीतकार जी.एन. जोशी यांना सुमती टिकेकर यांचा आवाज आवडला. हिज मास्टर्स व्ह~ऒईस या ग्रामोफोन कंपनीसाठी त्यांच्या आवाजात भावगीते गाऊन घ्यायची असे त्यांनी ठरवले. त्यावेळी जी.एन. जोशी कंपनीत अधिकारी पदावर होते. गोखले मास्तरांकडे शोभा गुर्टू, निर्मला गोगटे या गायनशिक्षणासाठी येत असत. गोखले मास्तरांनी अनेक चाली केल्या. पैकी ‘आठवणी दाटतात’ आणि ‘श्रीरामाचे दर्शन घडले’ ही त्यांची दोन गीते अफाट लोकप्रिय झाली. १९६९ साली अखिल महाराष्ट्र बालगंधर्व नाट्यगीत स्पर्धेत गायिका सुमती टिकेकर या प्रथम पारितोषिकाच्या मानकरी ठरल्या. या स्पर्धेत हार्मोनियमची साथ बाळासाहेबांनी, तर तबल्याची साथ अण्णासाहेब थत्ते यांनी केली होती.

‘संगीत भर्तृहरीयम्‌’ या संस्कृत नाटकात सुमतीबाई व बाळासाहेब हे नटी-सूत्रधार होते. या नाटकातील आठही पदांच्या चाली बाळासाहेबांनी केल्या होत्या. या नाटकातील एक वेगळे असे पद विशेष गाजले..

‘सिद्धा शाखा लवण मरिच स्नेहयुक्ता प्रभुता

तेवा पूपा मधुमधुरिता शश्कुलिनाम्च राशी:’

संस्कृतपंडित, गणितज्ञ व तबलावादक एस.बी. ऊर्फ दादा वेलणकर यांनी लिहिलेल्या ‘मेघदूतोत्तरम्’ या नाटकात टिकेकर दाम्पत्याने यक्ष व यक्षपत्‍नी या भूमिका केल्या. विनायकराव सरस्वतेलिखित ‘संगीत वरदान’ या नाटकातील दोन पदे सुमतीबाईंच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाली. ‘अनामिक नाद उठे गगनी’ आणि ‘विमल सुर सरी’ ही ती दोन पदे. ही पदे गदिमांनी लिहिली आणि गायक वसंतराव देशपांडे यांनी स्वरबद्ध केली. सुमतीबाईंनी या नाटकात वसंतरावांसह भूमिकाही केली.

कौटुंबिक माहिती

बाळासाहेब टिकेकर लहान असल्यापासूनच कीर्तनकार बुवांकडे तबलासाथ करीत असत. त्याकाळी त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी कराची येथून सात रुपयांत तबला खरेदी करून आणला होता. मुलाचा संगीत या विषयाकडे असलेला कल पाहून त्यांनी घरात व्हायोलिन, पेटी, सतार, दिलरुबा अशी सर्व वाद्ये आणली. बाळासाहेबांना वयाच्या नवव्या वर्षी सातारा येथील क्रांतिसिंह नानासाहेब पाटील यांच्याकडून पार्कर पेन बक्षीस मिळाले. या अशा संगीतातील व्यक्तीशीच सुमतीबाईंचा विवाह झाला.

नाट्यअभिनेता उदय टिकेकर हे सुमती टिकेकरांचे चिरंजीव, गायिका उषा देशपांडे या कन्या आणि गायिका आरती अंकलीकर-टिकेकर या स्नुषा होत. उषा देशपांडे यांनी पंचवीस वर्षे पं.फिरोज दस्तूर यांच्याकडे किराणा घराणा गायकीचे शिक्षण घेतले आहे.

सुमती टिकेकरांची भूमिका असलेली मराठी नाटके

  • धाडिला राम तिने का वनी
  • संगीत भर्तृहरीयम्‌ (संस्कृत नाटक)
  • संगीत मानापमान
  • संगीत मेघदूतोत्तरम् (संस्कृत नाटक)
  • संगीत वरदान
  • संगीत शारदा
  • संगीत सौभद्र

सुमती टिकेकरांनी गायलेली प्रसिद्ध गीते

सन्मान

  • मुंबईतील डी विभागातील नाना चौक येथील जावजी दादाजी मार्ग व जगन्नाथ पथ येथील चौकास सुमती टिकेकर यांचे नाव देण्यात आले आहे.