Jump to content

आरती अंकलीकर-टिकेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आरती अंकलीकर टिकेकर

आरती अंकलीकर-टिकेकर ( २७ जानेवारी १९६३,विजापूर,कर्नाटक) या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका आहेत.

संगीत शिक्षण

[संपादन]

त्यांना आग्रा, ग्वाल्हेर आणि जयपूर-अत्रौली घराण्याची तालीम मिळालेली आहे. त्यांचे संगीताचे सुरुवातीचे शिक्षण पं.वसंतराव कुलकर्णी आणि नंतरचे शिक्षण किशोरी आमोणकर यांच्याकडे झाले.

पुरस्कार

[संपादन]

त्यांना अंतर्नाद या कोकणी चित्रपटातील गाण्यासाठी २००६ साली सर्वोत्तम पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांना महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार (सर्वोत्तम पार्श्वगायिका), मराठी चित्रपट 'दे धक्का'साठी महाराष्ट्र टाईम्स पुरस्कार (२००८) मिळाला. २०१३ साली, त्यांना मराठी चित्रपट संहिता साठी पुन्हा एकदा सर्वोत्तम पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

संगीत क्षेत्रातील कामगिरी

[संपादन]

त्यांच्या गायनाच्या अनेक ध्वनिमुद्रिका आणि सी.डी. उपलब्ध आहेत. श्याम बेनेगल यांच्या सरदारी बेगम या चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे. तेजोमय नादब्रह्म आणि राग-रंग हे त्यांचे काही अल्बम आहेत. अंतर्नाद, दे धक्का, सरदारी बेगम, एक हजाराची नोट, इत्यादी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे.

कार्यक्रम

[संपादन]

कौटुंबिक माहिती

[संपादन]

अभिनेते उदय टिकेकर हे त्यांचे पती आहेत. त्यांची कन्या स्वानंदी टिकेकर सुद्धा अभिनेत्री आहे.