"अंकुर साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ३१: | ओळ ३१: | ||
* ५० वे : अकोला,२४-२५ मार्च २०१२, संमेलनाध्यक्ष [[डॉ. सदानंद मोरे]] |
* ५० वे : अकोला,२४-२५ मार्च २०१२, संमेलनाध्यक्ष [[डॉ. सदानंद मोरे]] |
||
* ५१ वे : कर्हाड, २४-२५ नोव्हेंबर २०१२, संमेलनाध्यक्षा [[शुभांगी भडभडे]] |
* ५१ वे : कर्हाड, २४-२५ नोव्हेंबर २०१२, संमेलनाध्यक्षा [[शुभांगी भडभडे]] |
||
* ५५वे : अकोला, २७-२८ ऑगस्ट २०१६, संमेलनाध्यक्षा प्रा. डॉ. फुला मारोतीराव बागुल. |
|||
==हे सुद्धा पहा== |
==हे सुद्धा पहा== |
००:२४, ८ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती
अंकुर साहित्य संघ, नागपूर(स्थापना ९ ऑगस्ट १९८६) ही संस्था हे संमेलन भरवते. या संस्थेच्या अनेक शाखा आहेत. उदा. अकोला, अमरावती, कुऱ्हा (काकोडा), जळगाव, जालना वगैरे. अंकुर साहित्य संघाचे अकोला जिल्ह्यातील चांदूर येथे एक वाचनालय आहे. या वाचनालयातर्फे १९९८सालापासून दरवर्षी साहित्य पुरस्कार दिले जातात. शाल, श्रीफळ देऊन अंकुर साहित्य संमेलनात सत्कार, मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे
अंकुर साहित्य संघाचे ’शब्दांकुर’ नावाचे त्रैमासिक आहे,.
ही संस्था ’अंकुर साहित्य पुरस्कार’,‘अक्षरतपस्वी’ पुरस्कार, ‘अक्षरवेल’ पुरस्कार, ’बालकवी’ पुरस्कार, आणि महाराष्ट्राबाहेरील कवीसाठी ’बी’ पुरस्कार देते.
- इ.स. २००९ चा बालकवी पुरस्कार ज्योती कपिले यांना ’गंमतकोडी’ या पुस्तकासाठी, तर २०१० सालचा ’बी’ पुरस्कार गोमंतकीय कवी पांडुरंग गावकर यांना ’नंतर’ या कवितासंग्रहासाठी मिळाला होता.
- जालना येथील जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी, तसेच लेखिका व कवयित्री बेबीसरोज अंबिलवादे यांच्या ’मीच मला शोधते’ या कथासंग्रहाला २००९-१० शब्दांकुरतर्फे बाजीराव पाटील कथासंग्रह पुरस्कार दिला होता.
- कवयित्री प्रा.सौ.विद्या दीपक दिवटे यांना २०११ साली ’आम्ही अश्वत्थामे’ या पुस्तकासाठी अंकुर साहित्य पुरस्कार देण्यात आला.
- अंकुर साहित्य संघाचा २००८ सालचा राज्यस्तरीय शोधपत्रकारिता (उत्तेजनार्थ) पुरस्कार पत्रकार विकास विनायकराव देशमुख यांना प्रदान करण्यात आला होता.
चांदूरच्या अंकुर वाचनालयाचे पुरस्कार
- इसवी सन २००८ चे अंकुर साहित्य पुरस्कार
- कुसुमाग्रज काव्य पुरस्कार : बाप झाला कासावीस (शिवाजी हुसे, कन्नड जिल्हा औरंगाबाद), हुंदका (दत्तात्रेय बैरागी, मुजळगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक), प्रश्न भाकरीचा (श्रीकांत हणमंते, वणी जिल्हा यवतमाळ), नीलपंख (प्रा. संजय घरडे, अमरावती), बेट बंद भावनेचे (शशिकांत हिंगोणेकर, मुक्ताईनगर)
- बहिणाबाई चौधरी काव्य पुरस्कार : अंधाराला डोळे फुटता (संजय घाडगे लातूर), आसवांचे देणं घेणं (जगदीश देवपूरकर), घे भरारी (कु. सुमित्रा अनंत भोसले, पोखवणी, तालुका मोहाळ, जिल्हा सोलापूर), अनंताची अभंगवाणी (प्रा. अनंत राऊत, नांदेड), अखेरचं आवर्तन (विलास गावडे, मुंबई)
- कै. भाऊसाहेब पाटणकर गझल पुरस्कार : तुझ्यासाठी (सुजीत देशपांडे, कोल्हापूर)
- बालकवी पुरस्कार : पक्ष्यांची शाळा (प्रा. पुराणिक धुळे), सारीपाट (सौ. निर्मला भयवाळ औरंगाबाद)
- राम गणेश गडकरी नाट्य पुरस्कार : हुंडा बोलतोय (रा.ना. कापुरे, जळगाव)
- कै. उद्धव ज. शेळके कादंबरी पुरस्कार : झावळ (बाबा कोटंबे, परभणी)
- कै.भाऊ भालेराव ललित लेखन पुरस्कार : सावी (सतीश सोळांकुरकर, कळवा-जिल्हा ठाणे)
- कै. दया पवार आत्मकथन पुरस्कार : सर्जननामा (डॉ. जे.जी.वाडेकर, नांदेड)
- कै.बाबा आमटे व्यक्तिचरित्र पुरस्कार : महाराष्ट्र कन्या राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील (आतीश सोसे अकोला)
आतापर्यंत झालेली अंकुर साहित्य संमेलने
- ४० वे : चाळीसगाव (धुळे जिल्हा), १०-११ मे २००८, संमेलनाध्यक्ष प्रा. जवाहर मुथा
- ४३ वे : अकोला, २५-१२-२००९, संमेलनाध्यक्ष नरेंद्र इंगळे
- ४६ वे : कुर्हा (काकोडा), तालुका मुक्ताईनगर (जळगाव जिल्हा), ७-५-२०१०, संमेलनाध्यक्ष बी. जी. वाघ
- ४७ वे : अकोट (अकोला जिल्हा), २३-१-२०११, संमेलनाध्यक्ष डॉ. शंकर राऊत
- ४८ वे : मूर्तिजापूर (अमरावती जिल्हा), २०-११-२०११, संमेलनाध्यक्ष ?
- ५० वे : अकोला,२४-२५ मार्च २०१२, संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे
- ५१ वे : कर्हाड, २४-२५ नोव्हेंबर २०१२, संमेलनाध्यक्षा शुभांगी भडभडे
- ५५वे : अकोला, २७-२८ ऑगस्ट २०१६, संमेलनाध्यक्षा प्रा. डॉ. फुला मारोतीराव बागुल.