"राजा रविवर्मा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Chaitnyags (चर्चा | योगदान) No edit summary |
|||
ओळ ८३: | ओळ ८३: | ||
[[इ.स. १९९३]] मध्ये,नवी दिल्ली येथे त्याच्या चित्रांचे प्रदर्शन भरले.त्याने भारतीय कलेस दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून केरळ सरकारने त्याच्या नावाने '''राजा रवि वर्मा पुरस्कार''' सुरू केला. हा कला व संस्कृतीच्या क्षेत्रात उत्कृष्ट प्रावीण्य दाखविणाऱ्याला प्रतिवर्षी दिला जातो. |
[[इ.स. १९९३]] मध्ये,नवी दिल्ली येथे त्याच्या चित्रांचे प्रदर्शन भरले.त्याने भारतीय कलेस दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून केरळ सरकारने त्याच्या नावाने '''राजा रवि वर्मा पुरस्कार''' सुरू केला. हा कला व संस्कृतीच्या क्षेत्रात उत्कृष्ट प्रावीण्य दाखविणाऱ्याला प्रतिवर्षी दिला जातो. |
||
[[मावेलिकरा]], केरळ येथे त्याच्या सन्मानाप्रीत्यर्थ फाइन आर्टचे एक महाविद्यालय उघडण्यात आले आहे. |
[[मावेलिकरा]], केरळ येथे त्याच्या सन्मानाप्रीत्यर्थ फाइन आर्टचे एक महाविद्यालय उघडण्यात आले आहे. पुण्यातही नवोदित चित्र-कलावंतांना व्यासपीठ मिळवून देणारे राजा रविवर्मा कलापीठ आहे. |
||
==मुख्य कामांची यादी== |
==मुख्य कामांची यादी== |
२२:३२, १३ जुलै २०१६ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
राजा रविवर्मा | |
---|---|
जन्म |
२९ एप्रिल १८४८ किलीमानूर |
मृत्यू |
५ ऑक्टोबर १९०६ अत्तीनगल |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
मूळ गाव | किलीमानुर |
धर्म | हिंदू |
राजा रवि वर्मा, (मल्याळम भाषा:രാജാ രവി വര്മ ; रोमन लिपी: Raja Ravi Varma ;) (एप्रिल २९, इ.स. १८४८- ऑक्टोबर २, इ.स. १९०६) हा भारताच्या त्रावणकोरच्या राजघराण्यातील एक चित्रकार होता. त्याने भारतीय साहित्य आणि संस्कृतीतील पात्रांची रंगीत चित्रे काढली. राज रविवर्म्याने काढलेल्या चित्रांनंतरच हिंदूंना आपले देव कसे दिसत असावॆत, ते समजले. भारतातील परंपरागत हिंदू महाकाव्ये आणि पुराणांतील कथा यांवर रविवर्म्यानॆ काढलेली चित्रे आजही प्रमाण मानली जातात.
रविवर्म्याचा जन्म एका राजघराण्यात २९ एप्रिल १८४८ रोजी केरळमधील कोईल तंपुरन येतील किलिमनूर राजवाड्यात झाला. त्याचे वडील मोठे विद्वान व आई ही कवयित्री होती. त्याच्या आईने लिहिलेले काव्य, 'पार्वती स्वयंवर' हे रविवर्म्याने तिच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध केले. राजा रवि वर्माला सी.गोडा वर्मा नावाचा भाऊ व मंगला नावाची बहीण होती.त्याच्या बालपणीच त्याला महाराज अलियम् तिरुनल या त्याच्या नातलग राजाचा आश्रय मिळाला. रविवर्म्याचे काका उत्तम चित्रकार होते. तो वारसा पुतण्यात उतरला. याशिवाय त्रिवेंद्रमच्या राजदरबारी असणारे इंग्रज चित्रकार थी ओडेर जेन्सन, रामस्वामी नायडू यांच्या चित्रकारितेचा प्रभाव त्यांच्यावर पडला. त्रावणकोर महाराजांच्य प्रोत्साहनामुळे त्याला अधिकच प्रेरणा मिळाली.
१८७३ मध्ये मद्रास येथील चित्रकलेच्या स्पर्धेत रविवर्म्याने सुवर्णपदक मिळवले. महाराजांच्या दरबारात असणाऱ्या इटालियन तैलचित्रांकडे पाहून त्याने तैलचित्रे काढण्याचे ठरवले.
राजा रविवर्म्याच्या चित्रांत एक सुंदर, प्रमाणबद्ध व सौंदर्यवती साडी नेसलेली स्त्री असते. त्याचा स्टुडिओ महाराष्ट्रात लोणावळ्याला होता. तेव्हा दिसलेल्या मराठी स्त्रियांकडे पाहून त्याने तशाच स्त्रिया चित्रांत रंगवल्या. सन इ.स. १८७३ मध्ये, व्हिएन्ना येथे झलेल्या कला प्रदर्शनात त्याला मिळालेल्या प्रथम पारितोषिकामुळे तो जागतिक क्षेत्रावर प्रकाशझोतात आला.
[१].
कला जीवन
राजा रविवर्म्याने चित्रांतील विविध विषयासाठी भारतभर प्रवास केला. त्याचे 'दुष्यंत व शकुन्तला','नल व दमयंती, या विषयावरील चित्रे प्रसिद्ध आहेत. त्याच्या चित्रांनी भारतीयांस त्यांच्या धर्मग्रंथांतील द्दष्ये डोळ्यासमोर साकार झाली. ही त्याची चित्रे सर्व भारतभर प्रसिद्ध झाली.
आधुनिक भारतीय वास्तववादी चित्रकलेचा जनक म्हणून राजा रविर्म्याचे नाव घेतले जाते.
युरोपियन चित्रकारांप्रमाणे ‘कमिशन पोट्र्रेट’ काढणारे ते पहिले भारतीय चित्रकार. त्यांच्या चित्रकलेवर पाश्चात्त्यांचा पगडा असला तरी त्यांची चित्रे मात्र अस्सल भारतीय होती. रामायण-महाभारतातील प्रसंग, विश्वामित्र-मेनका, दुष्यंत-शकुंतला, उर्वशी-पुरुरवा अशी एकापेक्षा एक सरस चित्रे आपल्या वास्तववादी शैलीच्या कलाकृतीतून चितारली आहेत. आपली चित्रे छापण्यासाठी त्यांनी लोणावळ्याजवळील मळवली येथे शिळा (प्रेस) छापखाना उभारला. या छापखान्यातून हजारो देवदेवतांची चित्रं साऱ्या भारतभर पूजली जाऊ लागली. देवतांना मानवी चेहरे देण्याचे काम रविवर्मा यांनी केले.
आपल्या चित्रांतून भारतीय संस्कृतीचा ठसा जगात पोहचविणाऱ्या रविवर्माना अनेक मानसन्मान मिळाले. शिकागोच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात स्थान मिळणारे ते एकमेव. सातव्या एडवर्डने कैसर-ए-हिंद’ हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविले होते. त्या काळात देशविदेशातील राजांचे राजवाडे राजा रविवर्माच्या चित्रांच्या दालनांनी सजले होते. त्यांच्या चित्रातून मानवी स्वभावाच्या भावना, छटा सहजसुंदरतेने दर्शविल्या. वयाच्या ५८ व्या वर्षी २ ऑक्टोबर १९०६ रोजी त्यांचे निधन झाले. भारतीय कलेच्या इतिहासात तो उत्कृष्ट चित्रकारांपैकी एक समजला जातो.
राजाची पदवी
इ.स. १९०४ मध्ये, भारताचे व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी केसर-इ-हिंद या सुवर्णपदकाने सन्मानित केले. त्यावेळेस त्याचे नांव 'राजा रवि वर्मा' असे नोंदविलॆ गेले. [१]. इ.स. १९९३ मध्ये,नवी दिल्ली येथे त्याच्या चित्रांचे प्रदर्शन भरले.त्याने भारतीय कलेस दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून केरळ सरकारने त्याच्या नावाने राजा रवि वर्मा पुरस्कार सुरू केला. हा कला व संस्कृतीच्या क्षेत्रात उत्कृष्ट प्रावीण्य दाखविणाऱ्याला प्रतिवर्षी दिला जातो.
मावेलिकरा, केरळ येथे त्याच्या सन्मानाप्रीत्यर्थ फाइन आर्टचे एक महाविद्यालय उघडण्यात आले आहे. पुण्यातही नवोदित चित्र-कलावंतांना व्यासपीठ मिळवून देणारे राजा रविवर्मा कलापीठ आहे.
मुख्य कामांची यादी
राजा रविवर्म्याच्या प्रमुख चित्रांची यादी -
|
|
-
अष्टसिद्धी
-
भीष्म प्रतिज्ञा
-
राधामाधव
-
अर्जुन व सुभद्रा
-
गंगावतरण
-
कण्वकन्या शकुंतला
-
शकुंतलेची विषण्णता
-
द्रौपदी दूध नेताना
-
द्रौपदी वस्त्रहरण
-
सैरंध्री
संदर्भ व नोंदी
बाह्य दुवे
- रवि वर्म्याची तैलचित्रे[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती
- राजा रवि वर्म्याची चित्रे
- राजा रवि वर्म्याची चित्रे
- थोड्क्यात आत्मचरित्र
- रवि वर्मा मुद्रणालयातिल संकलन
- कामत.कॉम वरील मोठे संकलन
- तैलचित्राद्वारे जिवन
- Indian Art Circles: राजा रवि वर्मा
- द हिन्दु:राजसी कलाकार
- चंदिगड वस्तुसंग्रहालय:नउ निपुण
- वर्णम्: रवि वर्म्याची शिळाचित्रे सापडली[मृत दुवा]
- २० व्या शतकाच्या पूर्वार्धातिल पोस्टकार्डस्