विश्वामित्र ऋषि तपस्या करीत असताना, त्यांची तपस्या भंग करण्यासाठी इंद्रानेमेनका नावाच्या एका सुंदर अप्सरेला पाठविले. ऋषींची तपस्या भंग करण्यामधे मेनकेला यश आले आणि त्यानंतर तिला विश्वामित्र ऋषींकडून मुलगी झाली. नंतर ती मुलगी जंगलात सोडून मेनका निघून गेली. मुलीला शकुंत पक्ष्यांनी वाढवले म्हणून तिला शकुंतला म्हणू लागले..
शकुंतला ही भरताची आई आणि दुष्यंताची बायको आहे. महाभारतात तिच्याबद्दल बरीच माहिती दिली आहे.
शकुंतलेच्या जीवनावर महाकवी कालिदासाने शाकुंतल हे संस्कृत नाटक लिहिले आहे. ते अप्रतिम नाटक वाचून जर्मन कवी गटे इतका आनंदला, की तो या नाटकाचे पुस्तक डोक्यावर घेऊन नाचला.