Jump to content

"नथुराम गोडसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ८२: ओळ ८२:
* गांधी-वध क्यों?, (नथुराम गोडसे)
* गांधी-वध क्यों?, (नथुराम गोडसे)
* The Men Who Killed Gandhi (मनोहर माळगांवकर)
* The Men Who Killed Gandhi (मनोहर माळगांवकर)
* Nathuraam GoDse - A Story of an Assassin (अनुप अशोक सरदेसाई) पुस्तकाचे प्रकाशन ३० जानेवारी, २०१६.



==संदर्भ==
==संदर्भ==

१५:५४, ५ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

नथुराम विनायक गोडसे
जन्म १९ मे, १९१० (1910-05-19)
बारामती, पुणे, ब्रिटिश भारत
मृत्यू १५ नोव्हेंबर, १९४९ (वय ३९)
अंबाला, पंजाब, भारत
मृत्यूचे कारण फाशी
राष्ट्रीयत्व भारतीय
ख्याती गांधी-हत्या
गांधीहत्येच्या खटल्यातील सुनावणीदरम्यान टिपलेले नथुराम गोडसे याचे प्रकाशचित्र (इ.स. १९४८)

नथुराम विनायक गोडसे (मे १९, इ.स. १९१०; बारामती, पुणे जिल्हा, महाराष्ट्र - नोव्हेंबर १५, इ.स. १९४९) हे मोहनदास करमचंद गांधी यांची जानेवारी ३०, इ.स. १९४८ रोजी हत्या करणारे हल्लेखोर व हत्येच्या कटातील मुख्य आरोपी होते. गोपाळ गोडसे व अन्य सहा जणांसोबत त्यांनी हत्याकटाची आखणी व अंमलबजावणी केली. हत्येनंतर झालेल्या खटल्याच्या सुनावणीनंतर त्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली.

प्रारंभिक जीवन

नथुराम विनायक गोडसे यांचा जन्म १९ मे १९१० ला भारताच्या महाराष्ट्र राज्यात पुण्याजवळ बारामती येथे झाला होता. त्यांचे वडील विनायक वामनराव गोडसे हे पोस्ट ऑफिसात होते. आणि आई लक्ष्मी गृहिणी होती. त्यांची आधीची ३ अपत्ये अल्पवयात मृत्यू पावल्याने फक्त एक मुलगीच जिवंत राहिली होती. आता मुलगा व्हावा म्हणून आईवडिलांनी ईश्वराकडे प्रार्थना केली होती, की मुलगा झाल्यास त्याचे नाक टोचू.. त्यामुळे जरी जन्म नाव रामचंद्र असले तरी पुढे लोक मुलाला नथुराम म्हणू लागले. तेच नाव पुढे प्रसिद्ध झाले. नथुरामला गोपाळ नावाचा एक भाऊही होता.

धार्मिक आणि अलौकिक आवडी

नथुराम गोडसे लहानपणी ध्यानावस्थेत जाऊन जे श्लोक म्हणत ते त्यांनी कधीच वाचले नव्हते, असे म्हणतात. या अवस्थेमध्ये ते आपले कुटुंब आणि कुलदेवता यांच्या दरम्यान माध्यमाचे काम करीत असेही सांगितले जाते. पण हे सगळे वयाच्या १६ व्या वर्षापासून संपून गेले .

शिक्षण

यांचे प्राथमिक शिक्षण पुण्यात झाले. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेण्यासाठी त्यांनी यांनी हायस्कूलचे शिक्षण मध्येच सोडले. यानंतर कुठलेही औपचारिक शिक्षण न घेता धार्मिक पुस्तकांत मन रमवले. त्यांनी रामायण, महाभारत, गीता, पुराण, स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, बाळ गंगाधर टिळक, मोहनदास गांधी यांच्या साहित्याचा खोलवर अभ्यास केला होता .

राजनैतिक जीवन

आधी सुरुवातीला नथुराम गोडसे अखिल भारतीय काँग्रेस या पक्षामध्ये होते, नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शेवटी सन १९३०मध्ये ते अखिल भारतीय हिंदू महासभेत गेले. ते "अग्रणी " आणि "हिंदू राष्ट्र " या वर्तमानपत्रांचे संपादक होते. ते आपल्या वर्तमानपत्रांतून मोहंमद अली जिना यांच्या फुटीरतेच्या विचारांचा प्रखर विरोध करीत. सुरुवातीला यांनी मोहनदास करमचंद गांधी यांच्या कार्यक्रमांना पाठिंबा दिला, पण पुढे गांधीची हिंदूंबरोबरची कथित भेदभावपूर्ण नीती आणि त्यांचे तथाकथित मुस्लीम तुष्टीकरण यांमुळे ते गांधीविरोधी झाले. त्याआधी त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांच्या विरुद्ध संघर्षही केला होता.

हैदराबाद आंदोलन

१९४० मध्ये हैदराबादच्या शासक निझामाने राज्यात राहण्यार्‍या हिंदूंवर जिझिया कर लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा हिंदू महासभेने निषेध केला. त्या वेळेस, हिंदुमहासभेचे अध्यक्ष विनायक दामोदर सावरकर यांच्या आदेशावरून हिंदू महासभेचा पहिला गट नथुराम गोडसे यांचा नेतृत्वाखाली हैदराबादला निझामाला विरोध करण्यासाठी गेला. निझामाने या सर्वांना बंदिस्त करून कठोर दंड दिला, मात्र त्यानंतर, निझामाला जिझिया कर लावण्याचा त्याचा निश्चय मागे घ्यावा लागला .

भारताची फाळणी

१९४७ मध्ये भारताची फाळणी झाली आणि त्या वेळेस झालेल्या धार्मिक दंगलींमुळे गोडसे अत्याधिक दु:खी झाले. या परिस्थितीसाठी त्यांना मोहनदास गांधी सर्वस्वी जवाबदार वाटले .

मोहनदास करमचंद गांधी यांच्या हत्येचा निर्णय

फाळणीचा वेळेस झालेल्या निर्णयानुसार भारताने पाकिस्तानला ७५ कोटी रुपये द्यायचे होते. त्यातले २० कोटी रुपये दिले गेले होते, आणि त्याच वेळेस पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केले. त्यामुळे भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरल नेहरू आणि गृह मंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी उरलेले ५५ कोटी रुपये पाकिस्तानला न देण्याचा निर्णय घेतला. पण भारत सरकारचा या निर्णयाच्या विरोधात महात्मा गांधी उपोषणाला बसले. गांधींचा या निर्णयामुळे कष्टी होऊन आणि चिडून नथुराम गोडसे आणि त्यांच्या काही साथीदारांनी गांधी हत्येचा कट रचला.

गांधी हत्येचा पहिला असफल प्रयत्न

गांधींच्या उपोषणामुळे क्षुब्ध झालेले नथुराम गोडसे आणि त्यांच्या साथीदारांपैकी मदनलाल पाहवा याने गांधींच्या प्रार्थना सभेत जानेवारी १९४८ मधे बॉम्ब टाकला. त्या वेळेस झालेल्या गोंधळामध्ये गांधींवर पिस्तूल झाडण्याची योजना होती. पण पिस्तूल चालले नाही आणि अंती नथुराम गोडसे आणि बाकी मित्र पळून पुण्यास आले. मदनलाल पाहवाला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर नथुराम गोडसे गांधींना मारण्यासाठी परत दिल्लीत आले. तेथे पाकिस्तानातून आलेल्या हिंदू आणि शीख निर्वासितांमध्ये फिरताना त्यांनी एकाकडून एक पिस्तूल विकत घेतले.

गांधी खून खटल्यातील आरोपींचे छायाचित्र।
उभे असलेले : शंकर किस्तैया, गोपाळ गोडसे, मदनलाल पाहवा, दिगंबर बडगे
बसलेले: नारायण आपटे, वीर सावरकर, नथुराम विनायक गोडसे, विष्णू रामकृष्ण करकरे

३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे दिल्ली येथील बिर्ला भवनात गांधींच्या प्रार्थना सभेत गांधींच्या ४० मिनिटे आधी पोहचले. गांधी सभेसाठी जात असताना नथुराम यांनी पिस्तुलातून तीन गोळ्या झाडून मोहनदास करमचंद गांधी यांचा खून केला. खुनानंतर पळून जाण्याचा गोडसे यांनी अजिबात प्रयत्न केला नाही.

गांधींच्या खुनाचा खटला

नथुराम गोडसेंवर मोहनदास गांधी यांचा हत्येचा खटला पंजाब उच्च न्यायालयात चालविण्यात आला. याव्यतिरिक्त त्यांच्यावर अवैध शस्त्र बाळगणे यांसारखे अजून १७ आरोप ठेवून खटले चालविण्यात आले होते .

गांधीहत्येचे कारण

खून खटल्याच्यावेळी न्यायमूर्ती खोसला यांनी नथुराम गोडसे यांना त्यांचे निवेदन स्वतःच वाचावे यासाठी परवानगी दिली होती. मात्र नथुराम गोडसेंचे ते निवेदन भारत सरकारने प्रतिबंध घालून प्रसिद्ध करण्यास मनाई केली होती. या प्रतिबंधाच्या विरोधात नथुरामांचे भाऊ आणि गांधी हत्येचे सहअपराधी गोपाळ गोडसे यांनी ६० वर्षे न्यायालयीन लढाई केली. परिणामस्वरूप सर्वोच्च न्यायालयाने हा प्रतिबंध काढायला लावला आणि निवेदनाच्या प्रकाशनाला परवानगी दिली .

न्यायालयात नथुराम गोडसे यांनी गांधीहत्येची जी १५० कारणे सांगितली होती. त्यांतली प्रमुख अशी --

  1. अमृतसरच्या सन १९१९च्या जालियनवाला बाग हत्याकांडात झालेल्या नरसंहाराबद्दल जनरल डायर यांना जबाबदार धरून त्यांच्यावर खटला चालवण्यात यावा अशी मागणी संतप्त जनतेकडून झाली होती. मोहनदास गांधी यांनी या मागणीला समर्थन देण्यास नकार दिला .
  2. भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना दिलेल्या फाशी मुळे संतापलेली जनता गांधींकडे आशेनी बघत होती, की गांधीने यात हस्तक्षेप करून या तरुण देशभक्तांचे प्राण वाचवावे. पण गांधीनी भगतसिंहाच्या कृतीला अनुचित हिंसक कार्यवाही म्हणून हस्तक्षेपास नकार दिला .
  3. ६ मे १९४६ ला समाजवादी कार्यकर्त्यांच्या संमेलनात संबोधित करताना गांधीने मुस्लीम लीगच्या हिंसेसमोर जनतेला आहुती देण्याचे आवाहन केले होते.
  4. महंमद अली जिना आणि इतर राष्ट्रवादी मुस्लीम यांच्या विरोधाला न जुमानता १९२१ मध्ये गांधीनी खिलाफत आंदोलनाला आपले समर्थन जाहीर केले. तरी पण केरळमध्ये मुसलमानांनी तिथल्या हिंदूंना मारहाण केली, आणि जवळ जवळ १५०० हिंदू ठार मारले गेले आणि २००० हिंदूना बाटवून मुसलमान केले. गांधीनी याचा निषेध न करता याचे वर्णन खुदा के बहादूर बंदो की बहादुरी असे केले.
  5. सन १९२६ मध्ये आर्यसमाजाच्या शुद्धीकरण आंदोलनाचे स्वामी श्रद्धानंद यांची हत्या अब्दुल रशीद नावाच्याएका मुसलमान युवकाने केली. यावर प्रतिक्रिया देताना गांधीनी, या अब्दुल रशीदला आपला भाऊ म्हटले, त्याचे कृत्य बरोबर आणि आर्य समाजाची शुद्धीकरण चळवळ ही राष्ट्रविरोधी आणि हिंदू मुसलमान एकतेसाठी घातक आहे असे जाहीर केले.
  6. गांधींनी अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंग यांना पथभ्रष्ट राष्ट्रभक्त म्हटले होते.
  7. गांधीनी काश्मीरचे राजा हरिसिंग यांना काश्मीर मुस्लिमबहुल आहे म्हणून शासन सोडून काशीला जाऊन प्रायश्चित करण्यास सांगितले, आणि या उलट हैदराबादच्या निझामाला हैदराबाद हिंदुबहुल असूनही समर्थन दिले होते.
  8. जिना यांना कायदे आझम ही उपाधी गांधींनीच दिली होती.
  9. काँग्रेसच्या ध्वज निर्धारण समितीने १९३१ मध्ये चरखा अंकित असलेल्या भगवा रंगाच्या ध्वजाचा निर्णय घेतला होता, पण गांधींच्या हट्टामुळे ध्वज तिरंगी केला गेला.
  10. काँग्रेसच्या त्रिपुरा अधिवेशनात नेताजी सुभाषचंद्र बोस यांना बहुमताने अध्यक्ष निर्वाचित केले गेले होते. पण गांधींचे समर्थन पट्टाभिसीतारामय्या यांना असल्यामुळे आणि सुभाष बाबूंनी त्यांना नेहमीनेहमी होणाऱ्या विरोधामुळे आणि गांधींच्या असहयोगामुळे राजीनामा दिला.
  11. लाहोर काँग्रेसमध्ये पण सरदार वल्लभभाई पटेल हे बहुमताने निवडून आले असूनही केवळ गांधींच्या हट्टामुळे हे पद जवाहरलाल नेहरू यांना दिले गेले.
  12. १४-१५ जून १९४७ ला दिल्लीमध्ये आझालेल्या अखिल भारतीय काँग्रेस समितीमध्ये भारताच्या फाळणीचा निर्णय अस्वीकृत होणार होता, पण गांधींनी तिकडे जाऊन ऐन वेळेस विभाजनाला आपले समर्थन जाहीर केले. या आधी त्यांनीच म्हंटले होते की विभाजन हे माझ्या प्रेतावरच होईल.
  13. जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने सोमनाथ मंदिर पुनर्निर्माण सरकारी खर्चाने होणार हा प्रस्ताव पारित केला होता. पण गांधी हे मंत्रिमंडळाचे सदस्य नसतानादेखील त्यांनी हा प्रस्ताव फेटाळण्यास भाग पाडले, आणि त्याच वेळेस दिल्लीमधील मशिदीची दुरुस्ती सरकारी खर्चाने व्हावी यासाठी १३ जानेवारी १९४८ ला उपोषण करून सरकारवर दबाव आणला.
  14. पाकिस्तानातून आलेले हिंदू निर्वासितांनी जेव्हा मशिदीत तात्पुरता आसरा घेतला तेव्हा गांधीने लहान पोरे, महिला, वृद्ध अशा सर्वांना बाहेर काढून भर थंडीत रस्त्यावर राहण्यास भाग पाडले.
  15. ऑक्टोबर १९४७ ला जेव्हा पाकिस्तानने काश्मीरवर अचानक हल्ला केला तेव्हा पाकिस्तानला ५५ कोटी रुपये न देण्याचा मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाला आपला विरोध आहे हे दाखवण्यासाठी गांधींनी परत उपोषण करून ही राशी भारताच्या हिताविरुद्ध पाकिस्तानला देण्यास सरकारला बाध्य केले.

मृत्युदंड

नथुराम गोडसे आणि सहआरोपी नारायण आपटे यांना १५ नोव्हेंबर १९४९ ला पंजाबमधील अंबाला जेलमध्ये फाशी देण्यात आले. त्यांचे अंतिम शब्द असे होते, " जर आपल्या मातृभूमीसाठी भक्तिभाव ठेवणे पाप असेल तर मी ते पाप केले आहे, आणि जर मी हे पुण्य केले असेल तर या पुण्यावर मी माझा नम्र अधिकार आहे असे जाहीर करतो.

पुस्तके

नथुराम गोडसे यांच्यावर मराठी-इंग्रजीत अनेक पुस्तके लिहिली गेली. हिंदी-गुजराथी भाषांत या पुस्तकांची भाषांतरे झाली आहेत. पुस्तकांची नावे :-

  • गांधी हत्या आणि मी (गोपाळ गोडसे)
  • नथुरामायण (य.दि. फडके)
  • मी नथुराम गोडसे बोलतोय (दोन-अंकी नाटक, १९९७, लेखक प्रदीप दळवी). नाटकाचे दिग्दर्शन विनय आपटे यांचे असून गोडसेची भूमिका अनेकांनी केली, सतत १७ वर्षे या नाटकात काम करणारे शरद पोंक्षे हे त्यांपैकी एक होत. या नाटकाचे हजाराच्या आसपास प्रयोग झाले आहेत.
  • May It Please You Honour (गोपाळ गोडसे).
  • ५५ कोटींचे बळी (गोपाळ गोडसे)
  • Why I Assassinated Gandhi (गोपाळ गोडसे)
  • अखण्ड भारत के स्वप्नद्रष्ट - वीर नाथूराम गोडसे : भाग - एक, दो, तीन (लेखक विश्वजीतसिंह)
  • गांधी-वध क्यों?, (नथुराम गोडसे)
  • The Men Who Killed Gandhi (मनोहर माळगांवकर)
  • Nathuraam GoDse - A Story of an Assassin (अनुप अशोक सरदेसाई) पुस्तकाचे प्रकाशन ३० जानेवारी, २०१६.

संदर्भ

बाह्य दुवे