Jump to content

"सुलभा कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २८: ओळ २८:
* [[अलाहाबाद]]च्या राष्ट्रीय विज्ञान अकादमीची, [[बंगलोर]]च्या भारत विज्ञान अकादमीची आणि दिल्लीच्या राष्ट्रीय विज्ञान अकादमीची फेलोशिप (२०११)
* [[अलाहाबाद]]च्या राष्ट्रीय विज्ञान अकादमीची, [[बंगलोर]]च्या भारत विज्ञान अकादमीची आणि दिल्लीच्या राष्ट्रीय विज्ञान अकादमीची फेलोशिप (२०११)
* [[मुंबईच्या महाराष्ट्र विज्ञान अकादमीची फेलोशिप (२००९)
* [[मुंबईच्या महाराष्ट्र विज्ञान अकादमीची फेलोशिप (२००९)
* [[पेकिंग]]च्या एशिया पॅसेफिक मतेरियल्स सोसायटीची फेलोशिप (२०१३)
* [[बीजिंग|पेकिंग]]च्या एशिया पॅसेफिक मतेरियल्स सोसायटीची फेलोशिप (२०१३)
* जर्नल ऑफ नॅनोफिजिक्सचे सहसंपादकत्व (इ.स. २०११ पासून..)
* जर्नल ऑफ नॅनोफिजिक्सचे सहसंपादकत्व (इ.स. २०११ पासून..)
* पुणे आकाशवाणीवरील कार्यक्रमांचे सल्लागारपद (२००८-२०१०)
* पुणे आकाशवाणीवरील कार्यक्रमांचे सल्लागारपद (२००८-२०१०)
ओळ ३५: ओळ ३५:
* [[पुणे|पुण्याच्या]] विद्या महामंडळाकडून लोकशिक्षण पुरस्कार (२००७) नॅ
* [[पुणे|पुण्याच्या]] विद्या महामंडळाकडून लोकशिक्षण पुरस्कार (२००७) नॅ
* [[दिल्ली]] येथील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या नॅनोमेडिसिनसाठीच्या टास्क-फोर्स कमिटीचे सदस्यत्व
* [[दिल्ली]] येथील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या नॅनोमेडिसिनसाठीच्या टास्क-फोर्स कमिटीचे सदस्यत्व
* भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे अंमलात असलेल्या ’महिला शास्त्रज्ञ स्कीम-ए चे अध्यक्षपद (२००७ पासून..)
* मुंबई येथील यूडीसीटीच्या (युनिवर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या) पाहुण्या प्राध्यापक





००:१४, ८ जुलै २०१५ ची आवृत्ती

सुलभा काशीनाथ कुलकर्णी (जन्म : १ जून १९४९) या पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (IISER--आयसर) येथे भौतिकशास्त्राच्या पाहुण्या प्राध्यापक आहेत. त्या नॅनोटेक्नॉलॉजी विषयाच्या तज्ज्ञ आहेत. त्यांची या विषयावर संस्थांसंस्थांमधून व्याख्याने होत असतात. त्यांचे असेच एक ‘‘नॅनोटेक्नोलाजीः पास्ट, प्रेझेंट अॅन्ड फ्यूचर या विषयावरील भाषण २२ मे २०१२ रोजी भोपाळच्या एनआईटीटीटीआर संस्थेत झाले होते.

शिक्षण

सुलभा कुलकर्णी यांचे शिक्षण पुण्यात झाले. पुणे विद्यापीठातून एम.एस्‌सी. पीएच.डी. झाल्यावर त्यांनी इ.स. १९७६ साली जर्मनीत जाऊन म्यूनिचच्या टेक्निकल विद्यापीठात पोस्ट-डॉक्टरल संशोधन केले.

अध्यापन

म्युनिचहून पुण्याला परतल्यावर सुलभा कुलकर्णी यांनी पुढील ३२ वर्षे पुणे विद्यापीठात अध्यापन आणि संशोधन केले. मार्ह २००९ मध्ये त्या आयसरमध्ये आल्या आणि युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट्स कमिशनतर्फे शास्त्रज्ञ म्हणून काम करू लागल्या.

कुलकर्णी नॅनोटेक्नॉलॉजी हा विषय शिकवतातच, पण त्या शिवाय कंडेस्ड मॅटर फिजिक्स, सरफस सायन्स, मटेरियल सायन्स आणि फिजिक्समधील प्रयोगपद्धती हेही विषय शिकवतात. प्रयोगशाळेतील एम.एस्‌सी.च्या विद्यार्थ्यांसाठी चालणार्‍या प्रयोगशाळा अभ्यासक्रमांवर त्यांची देखरेख असते.

संशोधन

सुलभा कुलकर्णी यांचे २७०हून अधिक शोधनिबंध जागतिक दर्जाच्या विज्ञान नियतकालिकांतून प्रकाशित झाले असून त्यांपैकी १२०हून अधिक शोधनिबंध नॅनोटेक्नॉलॉजीवरील आहेत. धातूविशेष, धातूंचा अनेक-स्तरी मुलामा, धातूंचे जाड मुलामे, वायुरूप पदार्थ आणि घनपदार्थ यांच्यामधील आंतरप्रक्रिया, काचेचे गुणधर्म असलेले धातू, अर्धसंवाहक या अन्य विषयांवरही सुलभा कुलकर्णी यांनी शोधनिबंध लिहिले आहेत.आहेत.

सुलभा कुलकर्णी यांच्या हाताखाली संशोधन करून ३४हून अधिक विद्यार्थ्यांनी पीएच.डी मिळवली आहे.

सुलभा कुलकर्णी या भारताबाहेर जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, जपानाणि दक्षिण कोरिया या देशांमधील संस्थाच्या आणि आणि विद्यापीठांच्या त्या पाहुण्या प्राध्यापक आहेत. नॅनोटेक्नॉलॉजी आणि तसम विषयावरील असंख्य चर्चासत्रांमध्ये व परिषदांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

सुलभा कुलकर्णी यांनी लिहिलेली मराठी/English पुस्तके

  • कार्बन एक विस्मयकारम मूलद्रव्य
  • नॅनो सायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी
  • निसर्गाची नॅनोटेक्नॉलॉजी (या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे.)
  • Carbon: the wonder element
  • Laboratory Manual in Solid State Physics (महाविद्यालयीन मुलांसाठी पाठ्यपुस्तक)
  • Nanotechnology: Principles and Practices (सामान्य वाचकांसाठी नॅनोटेक्नॉलॉजीचा परिचय)

सुलभा कुलकर्णी यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार

  • अलाहाबादच्या राष्ट्रीय विज्ञान अकादमीची, बंगलोरच्या भारत विज्ञान अकादमीची आणि दिल्लीच्या राष्ट्रीय विज्ञान अकादमीची फेलोशिप (२०११)
  • [[मुंबईच्या महाराष्ट्र विज्ञान अकादमीची फेलोशिप (२००९)
  • पेकिंगच्या एशिया पॅसेफिक मतेरियल्स सोसायटीची फेलोशिप (२०१३)
  • जर्नल ऑफ नॅनोफिजिक्सचे सहसंपादकत्व (इ.स. २०११ पासून..)
  • पुणे आकाशवाणीवरील कार्यक्रमांचे सल्लागारपद (२००८-२०१०)
  • वनस्थली विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्यत्व (२००८-२०१०)
  • ’भारतीय स्त्री-शक्ती’कडून स्त्रियांसाठी ठेवले्ला नवतंत्र-संशोधनाचा राष्ट्रीय पुरस्कार (२००७)
  • पुण्याच्या विद्या महामंडळाकडून लोकशिक्षण पुरस्कार (२००७) नॅ
  • दिल्ली येथील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या नॅनोमेडिसिनसाठीच्या टास्क-फोर्स कमिटीचे सदस्यत्व
  • भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे अंमलात असलेल्या ’महिला शास्त्रज्ञ स्कीम-ए चे अध्यक्षपद (२००७ पासून..)
  • मुंबई येथील यूडीसीटीच्या (युनिवर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या) पाहुण्या प्राध्यापक



(अपूर्ण)