"भालचंद्र वनाजी नेमाडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ३४: | ओळ ३४: | ||
==शिक्षण== |
==शिक्षण== |
||
भालचंद्र नेमाडे हे खानदेशातून मॅट्रिक (१९५५), पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून बी.ए. (१९५९), डेक्कन कॉलेजातून भाषाशास्त्र या विषयात एम.ए.(१९६१) झाले. शिवाय त्यांनी इंग्रजी साहित्यात मुंबई विद्यापीठातून एम.ए. केले आहे. (१९६४) नेमाडे यांना जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट. ही सन्माननीय पदवी मिळाली आहे. |
|||
==व्यवसाय== |
|||
इंग्रजीचे प्राध्यापक : अहमदनगर (१९६५), धुळे (१९६६), औरंगाबाद. (१९६७-७१), School of ऒriental and African studies, London (१९७१-?), आणि १९७४ पासून औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठात व शेवटी ते मुबई विद्यापीठात तुलनात्मक साहित्याच्या अभ्यासाठी स्थापन झालेल्या गुरुदेव टागोर आसनावरून निवृत्त झाले. नेमाडे हे [[गोवा]] विद्यापीठातही इंग्रजी विषयाचे विभागप्रमुख होते.यांनी |
|||
==कोसला: पहिली कादंबरी (१९६३)== |
==कोसला: पहिली कादंबरी (१९६३)== |
||
ओळ ४२: | ओळ ४३: | ||
==कोसलानंतर== |
==कोसलानंतर== |
||
कोसलाच्या यशानंतर नेमाडेंनी [[बिढार]](१९६७), [[जरीला]](१९७७) व [[झूल]](१९७९) या "चांगदेव पाटील" या काल्पनिक नायकाच्या जीवनावरील कादंबर्या लिहिल्या. हिंदू नावाची कादंबरी नेमाडे लिहिली असून ती [[जुलै १५]], [[इ.स. २०१०]] ला पॉप्युलर प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाली आहे. कादंबर्यांसोबतच त्यांचे 'देखणी'आणि 'मेलडी’(१९७०) हे काव्यसंग्रहही प्रसिद्ध आहेत. या कवितासंग्रहातील कवितांची हिंदी आणि इंग्रजी |
कोसलाच्या यशानंतर नेमाडेंनी [[बिढार]](१९६७), [[जरीला]](१९७७) व [[झूल]](१९७९) या "चांगदेव पाटील" या काल्पनिक नायकाच्या जीवनावरील कादंबर्या लिहिल्या. हिंदू नावाची कादंबरी नेमाडे लिहिली असून ती [[जुलै १५]], [[इ.स. २०१०]] ला पॉप्युलर प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाली आहे. कादंबर्यांसोबतच त्यांचे 'देखणी'आणि 'मेलडी’(१९७०) हे काव्यसंग्रहही प्रसिद्ध आहेत. या कवितासंग्रहातील कवितांची हिंदी आणि इंग्रजी भाषांतरे प्रकाशित झाली आहेत.१९६० नंतरचे मराठीतील श्रेष्ठ लेखक अशी भालचंद्र नेमाडे यांची प्रतिमा आहे. |
||
==पुस्तके== |
==पुस्तके== |
११:११, १ जुलै २०१५ ची आवृत्ती
भालचंद्र वनाजी नेमाडे | |
---|---|
जन्म नाव | भालचंद्र वनाजी नेमाडे |
जन्म |
२७ मे १९३८ सांगवी, खानदेश, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कादंबरी,कविता,समीक्षा |
प्रसिद्ध साहित्यकृती | कोसला |
वडील | वनाजी |
पुरस्कार |
साहित्य अकादमी पुरस्कार -१९९१ ज्ञानपीठ पुरस्कार-२०१४ |
भालचंद्र वनाजी नेमाडे (जन्म: २७ मे १९३८, सांगवी, खानदेश) हे मराठी लेखक व टीकाकार आहेत.
शिक्षण
भालचंद्र नेमाडे हे खानदेशातून मॅट्रिक (१९५५), पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून बी.ए. (१९५९), डेक्कन कॉलेजातून भाषाशास्त्र या विषयात एम.ए.(१९६१) झाले. शिवाय त्यांनी इंग्रजी साहित्यात मुंबई विद्यापीठातून एम.ए. केले आहे. (१९६४) नेमाडे यांना जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट. ही सन्माननीय पदवी मिळाली आहे.
व्यवसाय
इंग्रजीचे प्राध्यापक : अहमदनगर (१९६५), धुळे (१९६६), औरंगाबाद. (१९६७-७१), School of ऒriental and African studies, London (१९७१-?), आणि १९७४ पासून औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठात व शेवटी ते मुबई विद्यापीठात तुलनात्मक साहित्याच्या अभ्यासाठी स्थापन झालेल्या गुरुदेव टागोर आसनावरून निवृत्त झाले. नेमाडे हे गोवा विद्यापीठातही इंग्रजी विषयाचे विभागप्रमुख होते.यांनी
कोसला: पहिली कादंबरी (१९६३)
कोसला हे पुस्तक त्यांच्या वयाच्या २५व्या वर्षी प्रकाशित झाले. कोसला ही पांडुरंग सांगवीकर या खेड्यातून आलेल्या व पुण्यात शिकणार्या तरुणाची आत्मकथा आहे. ही कादंबरी सर्वसाधारण मराठी वाङ्मयप्रवाहाच्या बाहेरील कलाकृती मानली जाते.
कोसलानंतर
कोसलाच्या यशानंतर नेमाडेंनी बिढार(१९६७), जरीला(१९७७) व झूल(१९७९) या "चांगदेव पाटील" या काल्पनिक नायकाच्या जीवनावरील कादंबर्या लिहिल्या. हिंदू नावाची कादंबरी नेमाडे लिहिली असून ती जुलै १५, इ.स. २०१० ला पॉप्युलर प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाली आहे. कादंबर्यांसोबतच त्यांचे 'देखणी'आणि 'मेलडी’(१९७०) हे काव्यसंग्रहही प्रसिद्ध आहेत. या कवितासंग्रहातील कवितांची हिंदी आणि इंग्रजी भाषांतरे प्रकाशित झाली आहेत.१९६० नंतरचे मराठीतील श्रेष्ठ लेखक अशी भालचंद्र नेमाडे यांची प्रतिमा आहे.
पुस्तके
- कादंबर्या
- कोसला(१९६३)
- जरीला(१९७७)
- झूल (१९७९)
- बिढार (१९६७)
- हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ (२०११)
- हूल
- कविता संग्रह
- देखणी
- मेलडी (१९७०)
- समीक्षा
- टीकास्वयंवर
- तुकाराम
- मुलाखती
- साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण
- साहित्याची भाषा
- सोळा भाषणे
- इंग्रजी
- इंडो - अँग्लियन रायटिंग्ज - टू लेक्चर्स
- नेटिव्हिजम
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडी
- द इन्फ्ल्युएन्स ऑफ इंग्लिश ऑन मराठी - ए सोशिओलिंग्विश्टिक अॅन्ड स्टायलिस्टिक स्टडी
नेमाडे यांच्या विषयी आणि त्यांच्या साहित्याविषयीचे लेख
- एका असंबद्ध लिखाणाचा पंचनामा
- खंडेराव, अडगळ आवरत जा, राव!
- नेमाड्यांचा लेखकराव होतो तेव्हा
- मेलडी - भालचंद्र नेमाडे
- रसग्रहण स्पर्धाः ‘हिंदू’ – भालचंद्र नेमाडे
- भालचंद्र नेमाडे: साहित्याचे समृद्ध जाळे...
- ‘कोसला’कार ते ‘हिंदू’कार
- भालचंद्र नेमाडे यांची मुलाखत
- किशोर सानप : भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी
- किशोर सानप : भालचंद्र नेमाडे यांची समीक्षा
- देवानंद सोनटक्के : समीक्षेचा अंत:स्वर, पद्मगंधा प्रकाशन पुणे.
भालचंद्र नेमाडे यांना मिळालेले पुरस्कार
- ’साहित्याची भाषा’साठी कुरुंदकर पुरस्कार (१९८७)
- ’देखणी’साठी कुसुमाग्रज पुरस्कार (१९९१)
- ’देखणी’साठी ना.धों. महानोर पुरस्कार (१९९२)
- कुसुमाग्रज प्रतिष्ठान (नाशिक) यांच्यातर्फे देण्यात येणारा जनस्थान पुरस्कार, (इ.स. २०१३). एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असते.
- ’झूल’साठी कर्हाडचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार (१९८४)
- साहित्य अकादमी पुरस्कार, इ.स. १९९० - टीकास्वयंवर या टीकाशास्त्रावरील पुस्तकासाठी
- महाराष्ट्र फाउंडेशनचा गौरव पुरस्कार (२००१)
- ’बिढार’साठी ह.ना. आपटे पुरस्कार (१९७६)
- ’हिंदू एक समृद्ध अडगळ’साठी ज्ञानपीठ पुरस्कार-२०१५