"विश्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ९: | ओळ ९: | ||
=ऐतिहासिक पार्श्वभूमी= |
=ऐतिहासिक पार्श्वभूमी= |
||
आतापर्यंत नोंद केलेल्या [[इतिहास]] |
आतापर्यंत नोंद केलेल्या [[इतिहास|इतिहासावरून]], विविध [[वैश्विक सिद्धान्त|वैश्विक सिद्धान्तांवरून]] व ग्रंथांवरून दिसते की अगदी पुरातन काळापासून विश्वाचे निरीक्षण केले जात आहे.. भूमापनासंबंधीच्या विविध रचनाकृती फार पूर्वीच प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञांनी आणि भारतीयांनी विकसित केल्या होत्या. अनेक शतकांनंतर अधिक तंतोतंत निरीक्षणे आणि [[गुरुत्वाकर्षण|गुरुत्वाकर्षणासंबंधी]] अनेक सिद्धान्तांनंतर [[कोपर्निकस]]ची [[सूर्यमध्यसापेक्ष रचना]] आणि [[न्यूटन|न्यूटनची]] सूर्यमालेची रचना वगैरेंच्या [[खगोलशास्त्र|खगोलशास्त्रीय]] संशोधनांनाद्वारे असे सिद्ध झाले की आपली [[सूर्यमाला]] ही कोट्यवधी वर्षांपासून असंख्य विश्वांपैकी एक विश्वात असलेल्या असंख्य आकाशगंगांपैकी एका आकाशगंगेत आहे. जेव्हा अंतराळ तंत्रज्ञान अवकाशात पोहोचले तेव्हा अनेक [[दीर्घिका]], त्यात असलेल्या असंख्य [[आकाशगंगा]] आणि त्या आकाशगंगांतील असंख्य [[तारे]] दृष्टिक्षेपास आले.. |
||
[[चित्र:Universe_expansion2.png|thumb|[[महास्फोट (भौतिकशास्त्र)|महास्फोट]] व सतत प्रसरण पावणारे विश्व]] |
[[चित्र:Universe_expansion2.png|thumb|[[महास्फोट (भौतिकशास्त्र)|महास्फोट]] व सतत प्रसरण पावणारे विश्व]] |
१५:३९, ११ मे २०१४ ची आवृत्ती
"काल-अवकाशातील सर्व कण, ऊर्जा आणि पदार्थ यांची गोळाबेरीज" अशी विश्वाची व्याख्या करता येते. आपण पाहू शकत असलेले (दृश्य) विश्व हे संपूर्ण विश्वाचा एक अत्यंत छोटा भाग आहे असे अनेक खगोलशास्त्रज्ञ मानतात.
विश्वाचा पसारा अनंत असून त्याची उत्पत्ती एका महास्फ़ोटातून (Big bang) झाली असे मानले जाते. विश्व हे सतत प्रसरण पावत आहे. (Expanding universe)
नुकत्याच झालेल्या खगोलशास्त्रीय निरीक्षणात असे दर्शवले गेले आहे की विश्वाचे वय सुमारे १३.७३( ± ०.१२ ) अब्ज वर्ष आहे आणि अवलोकनक्षम विश्वाचा जास्तीत जास्त व्यास हा सुमारे ९३ अब्ज प्रकाशवर्ष आहे.मात्र १३ अब्ज वर्षानंतर दोन ताराविश्व एकमेकांपासून ९३ अब्ज प्रकाश वर्ष दूर गेलेले आहेत ही गोष्ट केवळ विरोधाभास वाटू शकते. .कारण कि विशिष्ट सापेक्षता अनुसार अवकाश वेळेच्या प्रादेशिक विस्तारात द्रव्य प्रकाशाच्या वेगाने प्रवास करू शकत नाही. सापेक्षता सिद्धान्तानुसार आंतरिक मर्यादेविना अवकाश सर्वत्र पसरू शकते. विश्वाची व्याप्ती सीमित आहे की असीमित हे सांगणे शक्य नाही.
विश्वाचा अंत या विषयावर अनेक उलटसुलट सिद्धान्त आहेत. भौतिकशास्त्र वैज्ञानिकांना प्रश्न पडलाय की काय होऊ शकते? काय बिग बँग ज्या महाविस्फोटातून विश्वाची निर्मिती झाली? त्याच विस्फोटाच्या पुनरावृत्तीने विश्वाचा विनाश होणार आहे? अनेक तर्क अमान्य झाले. पूर्वीचे सिद्धान्य योग्य होते का, हा प्रश्न देखील उद्भवतो.काही विविध बहुवैश्विक सिद्धान्तदेखील आहेत. काही भौतिक विद्वानाच्या मते अपरिमित ब्रम्हांडात अनेक विश्वे आहेत आणि त्या असंख्य विश्वंपैकी ज्यात असंख्य सूर्यमाला आहेत असे आपले एक विश्व आहे. [11][12]
ऐतिहासिक पार्श्वभूमी
आतापर्यंत नोंद केलेल्या इतिहासावरून, विविध वैश्विक सिद्धान्तांवरून व ग्रंथांवरून दिसते की अगदी पुरातन काळापासून विश्वाचे निरीक्षण केले जात आहे.. भूमापनासंबंधीच्या विविध रचनाकृती फार पूर्वीच प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञांनी आणि भारतीयांनी विकसित केल्या होत्या. अनेक शतकांनंतर अधिक तंतोतंत निरीक्षणे आणि गुरुत्वाकर्षणासंबंधी अनेक सिद्धान्तांनंतर कोपर्निकसची सूर्यमध्यसापेक्ष रचना आणि न्यूटनची सूर्यमालेची रचना वगैरेंच्या खगोलशास्त्रीय संशोधनांनाद्वारे असे सिद्ध झाले की आपली सूर्यमाला ही कोट्यवधी वर्षांपासून असंख्य विश्वांपैकी एक विश्वात असलेल्या असंख्य आकाशगंगांपैकी एका आकाशगंगेत आहे. जेव्हा अंतराळ तंत्रज्ञान अवकाशात पोहोचले तेव्हा अनेक दीर्घिका, त्यात असलेल्या असंख्य आकाशगंगा आणि त्या आकाशगंगांतील असंख्य तारे दृष्टिक्षेपास आले..