"खुशवंत सिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ७१: ओळ ७१:


==खुशवंत सिग यांनी लिहिलेली इंग्रजी पुस्तके==
==खुशवंत सिग यांनी लिहिलेली इंग्रजी पुस्तके==
* आय शॅल नॉट हिअर द नाइटिंगेल (१९५९)
* ट्‍रुथ, लव्ह अ‍ॅन्ड अ लिटिल मॅलिस (आत्मचरित्र, २००२)
* ट्‍रुथ, लव्ह अ‍ॅन्ड अ लिटिल मॅलिस (आत्मचरित्र, २००२)
* ट्रेन टू पाकिस्तान (कादंबरी)
* ट्रेन टू पाकिस्तान (कादंबरी, १९५६)
* दि फॉल ऑफ दि किंग्डम ऑफ पंजाब (१९६२)
* शीख इतिहासाचे दोन खंड
* दि मार्क ऑफ विष्णू अ‍ॅन्ड अदर स्टोरीज (१९५०)
* रणजितसंग : दि महाराजा ऑफ पंजाब (१९६३)
* दि व्हॉईस ऑफ गॉड अ‍ॅन्ड अदर स्टोरीज (१९५७)
* शीख इतिहासाचे दोन खंड (१९५३ आणि १९६३)
* द सनसेट क्लब (२०१०)
* द सनसेट क्लब (२०१०)
* द सिख्‌ज टुडे (१९५९)


==खुशवंत सिंग यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार==
==खुशवंत सिंग यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार==

१८:१५, २१ मार्च २०१४ ची आवृत्ती

खुशवंत सिंह
जन्म खुशवंत सिंह
२ फेब्रुवारी, इ.स. १९१५
हदाली, ब्रिटिश भारत सध्या पाकिस्तान
मृत्यू २० मार्च, इ.स. २०१४
नवी दिल्ली
मृत्यूचे कारण वृद्धापकाळाने
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा लेखक, पत्रकारिता, इतिहासकार
कारकिर्दीचा काळ इ.स. १९३८ पासून इ.स. २०१४
मालक हिंदुस्थान टाइम्स
प्रसिद्ध कामे 'खुशवंतनामा- द लेसन्स ऑफ माय लाइफ'
जोडीदार कँवल मलिक (माहेरचे नाव)
अपत्ये पुत्र राहुल सिंग, मुलगी माला
वडील वास्तुरचनाकार सर शोभा सिंग
पुरस्कार पद्मभूषण(१९७४), पद्मविभूषण (२००७)
स्वाक्षरी

खुशवंत सिंह -लेखनभेद खुशवंत सिंग, (जन्म : हदाली, ब्रिटिश भारत, २ फेब्रुवारी, इ.स. १९१५; मृत्यू : नवी दिल्ली, भारत, २० मार्च, इ.स. २०१४) हे इंग्रजी भाषेत लेखन करणारे लेखक, पत्रकार होते.

शिक्षण व वकिली

खुशवंत सिंग यांचे शालेय शिक्षण दिल्लीतील मॉडर्न हायस्कूल येथे, महाविद्यालयीन शिक्षण लाहोर आणि दिल्लीत तर उच्चशिक्षण केम्ब्रिजमधील किंग्ज कॉलेज येथे झाले. त्यानंतर लाहोर उच्च न्यायालयात त्यांनी वकिली केली.

विवाह

खुशवंत सिंग यांचा १९३९ साली कँवल मलिक यांच्याशी विवाह झाला. पुत्र राहुल आणि मुलगी माला अशी त्यांची अपत्ये होत.

नोकरी

९४८ ते १९५० या कालावधीत भारत सरकारचे प्रसिद्धी अधिकारी म्हणून खुशवंत सिंग यांनी कॅनडामधील टोरोंटो येथे, ब्रिटनमधील उच्चायुक्तालयात आणि आर्यलडमधील दूतावासात काम केले.

१९८० ते १९८६ या कालावधीत ते राज्यसभेचे सदस्य होते.

पत्रकारिता

  • परदेशातून दिल्लीत आल्यावर खुशवंत सिंग यांनी नियोजन आयोगाच्या 'योजना' या मासिकाची स्थापना केली. त्या मासिकाचे संपादक तेच होते.
  • नॅशनल हेराल्डहिंदुस्तान टाइम्सचे संपादक
  • इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडियाचे संपादक (१९६९ पासून). या साप्ताहिकाचा खप त्यांनी ६५ हजारांवरून चार लाखांवर नेला. नऊ वर्षे या साप्ताहिकात काम केल्यावर २५ जुलै १९७८ रोजी त्यांना तडकाफडकी निवृत्त केले गेले.

खुशवंत सिग यांनी लिहिलेली इंग्रजी पुस्तके

  • आय शॅल नॉट हिअर द नाइटिंगेल (१९५९)
  • ट्‍रुथ, लव्ह अ‍ॅन्ड अ लिटिल मॅलिस (आत्मचरित्र, २००२)
  • ट्रेन टू पाकिस्तान (कादंबरी, १९५६)
  • दि फॉल ऑफ दि किंग्डम ऑफ पंजाब (१९६२)
  • दि मार्क ऑफ विष्णू अ‍ॅन्ड अदर स्टोरीज (१९५०)
  • रणजितसंग : दि महाराजा ऑफ पंजाब (१९६३)
  • दि व्हॉईस ऑफ गॉड अ‍ॅन्ड अदर स्टोरीज (१९५७)
  • शीख इतिहासाचे दोन खंड (१९५३ आणि १९६३)
  • द सनसेट क्लब (२०१०)
  • द सिख्‌ज टुडे (१९५९)

खुशवंत सिंग यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार

  • १९६६ : रॉकफेलर शिष्यवृत्ती
  • १९७४ : पद्मभूषण (सरकारने सुवर्ण मंदिरावर लष्कर घुसविल्याच्या निषेधार्थ हा पुरस्कार त्यांनी १९८४ साली परत केला.)
  • २००० : सुलभ इंटरनॅशनलचा ऑनेस्ट मॅन ऑफ द इअर पुरस्कार
  • २००६ : पंजाब रत्‍न ्पुरस्कार
  • २००७ : पद्मविभूषण
  • २०१० : साहित्य अकादमी फेलोशिप अ‍ॅवार्ड
  • २०१२ : ऑल इंडिया मायनॉरिटीज फोरम अ‍ॅन्युअल फेलोशिप अ‍ॅवार्ड
  • २०१३ : मुंबईच्या टाटा लिटरेचर लाइव्ह कडून जीवनगौरव पुरस्कार
  • अनेक विद्यापीठांच्या मानद डॉक्टरेट पदव्या