विवळवेढे
?विवळवेढे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | १.०७९ चौ. किमी |
जवळचे शहर | डहाणू |
जिल्हा | पालघर जिल्हा |
लोकसंख्या • घनता |
१,७५४ (२०११) • १,६२६/किमी२ |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | वारली,आगरी, वाडवळी. |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४०१६०२ • +०२५२८ • एमएच/४८ /०४ |
विवळवेढे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ ने हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ३० किमी अंतरावर आहे.
हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
[संपादन]हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३०८ कुटुंबे राहतात. एकूण १७५४ लोकसंख्येपैकी ८८० पुरुष तर ८७४ महिला आहेत. गावाची साक्षरता ६५.२२ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७७.०६ आहे तर स्त्री साक्षरता ५२.८९ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २३३ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १३.२८ टक्के आहे. वाडवळ, भंडारी, आगरी, आणि आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते.
येथे महालक्ष्मी मातेचे मंदिर आहे.येथे परंपरागत पंधरा दिवस यात्रा भरते. प्रतिवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला श्री देवीच्या डोंगरावरील मूळ स्थानावर चढून पूजन करण्याचा व चौदाशे फूट उंचावर ध्वज लावण्याचा कार्यक्रम होतो.महालक्ष्मी यात्रा हनुमान जयंतीपासून पंधरा दिवस चालते.येथे गुजरात, दमण, सिल्वासा,दादरा नगेरहवेली तसेच महाराष्ट्रातून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, पुणे, धुळे, नंदुरबार येथून लाखो भाविक येतात.यात्रेच्या ठिकाणी जिल्हा प्रशासन तसेच पोलीस यंत्रणा भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देतात. यात्रेत छोटे मोठे पाळणे, विविध प्रकारचे खेळ, खाद्यपदार्थ दुकाने, घरगुती वापरासाठी वस्तूंची दुकाने, तसेच सुरत वरून आणलेल्या मिठाईची दुकाने थाटली जातात. महालक्ष्मी यात्रेत मटण चिकन यांचे भुजिंग प्रसिद्ध आहे आणि ते खाण्यासाठी खवय्यांची गर्दी होते.[१]
पर्यटनस्थळ
[संपादन]हे गाव येथील श्री महालक्ष्मी माता मंदिरासाठी धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. येथे चैत्र पौर्णिमेपासून पंधरा दिवसांची यात्रा भरते. तसेच दसरा, दिवाळी, व नवरात्रात भरपूर भाविक जमतात.[२]
नागरी सुविधा
[संपादन]गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा डहाणूपासून उपलब्ध असतात.
जवळपासची गावे
[संपादन]ओसरविरा, कांदरवाडी, दहीआळे,खाणीव, सोनाळे, आवधणी, नवनाथ, गंजाड,चांदवड, रायतळी, शेलटी ही जवळपासची गावे आहेत.विवळवेढे समूह ग्रामपंचायतीमध्ये आवधणी, खाणीव,सोनाळे, आणि विवळवेढे ही गावे येतात.
संदर्भ
[संपादन]१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036