विल्यम जोन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सर विल्यम जोन्स हे एशियाटिक सोसायटीचा संस्थापक आणि अध्यक्ष होते. हे इ.स. १७९३मध्ये इंग्लंडहून भारतात आले व रामलोचन पंडितांच्या सर्व अपमानास्पद अटी मान्य करून ते पौर्वात्य पद्धतीने संस्कृत शिकले. डायजेस्ट ऑफ हिंदू ॲन्ड मोहमडन लॉज, एशियाटिक मिसलेनी, हिंदूंची कालगणना, हिंदूंचे राशिचक्र, पर्शियन भाषेचे व्याकरण, पौर्वात्य हस्तलिखित ग्रंथांची सूची इत्यादी अनेक विद्वन्मान्य ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. भगवद्‌गीता, गरुड पुराण, मनुस्मृती, शाकुंतल, ऋतुसंहार, गीतगोविंद, हितोपदेश इत्यादी साहित्यकृतींचे त्यांनी सर्वप्रथम भाषांतर केले व भारतीय संस्कृतीची माहिती जगाला करून दिली.