लढाऊ विमान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पहिल्या पीढीतले जुने विमान उतरताना.

एक लढाऊ हे प्रामुख्याने इतर विमानाचा विरोधात हवेतल्या हवेत लढण्यासाठी रचना केलेले लष्करी विमान आहे. या लढाऊ विमानांचा मुख्य उद्देश रणांगणात हवाई प्राबल्य प्रस्थापित करण्यासाठी आहे. हे बाँबफेकी विमाने (bombers) आणि इतर विमाने ज्यांचे मुख्य ध्येय जमीनीवर हल्ला आहे अशा हल्ला विमानांपेक्षा निराळे असते. तरी अनेक विमानांना जमिनीवर हल्ला करता येईल अशी दुय्यम क्षमता असते. काही विमाने अनेक हेतू सैनिक हाताळणी आणि बाँबफेकी विमाने म्हणूनही रचना केलेली आहेत. यामुळे अनेकदा लढाऊ विमान अशी मानक व्याख्या पूर्ण अशी नाही. पहिल्या महायुद्धा पासून हवाई प्राबल्य हे परंपरागत युद्धामध्ये विजयासाठी आवश्यक मानले गेले आहे. हवाई सर्वाधिकार प्राप्त करण्यासाठी यशस्वी किंवा अयशस्वी प्रयत्न हे त्या वैमानिकाच्या कौशल्यावर, विमानाच्या वापरावर, रणनीती विमानांची संख्या आणि कार्यक्षमता या अनेक घटकांवर अवलंबून असते. लढाऊ विमाने हे आधुनिक सशस्त्र दलांच्या संरक्षण खर्चाच्या अंदाजपत्रकात एक मोठा भाग व्यापतात.

इतिहास[संपादन]

पहिल्या महायुद्धात या विमानांची सुरुवात झाली. आधी ही विमाने खूप लहान आणि हलकी होती. परंतू ती सशस्त्र होती. विमान एका लाकडी सांगाड्यावर बांधले जात असे. त्यास कापडाने झाकले जात असे. यामुळे कमी वजमाचे विमान तयार होत असे. दुसऱ्या महायुद्धापर्यंत यात सुधारणा होऊन धातूची विमाने बांधली जाऊ लागली यात मशिन गन बसवल्या जात असत. यांना पंख्याची इंजिने असत. काही विमाने ताशी ४00 मैल वेग गाठत होते. यांना एकच इंजिन असत असे. दोन इंजिनांची विमानेही बांधली गेली पण ती तेव्हढी कार्यक्षम नव्हती. इ.स. १९५० नंतर या विमानांना रडार लावण्यात आले त्यामुळे वैमानिक दूरवर पाहू शकत होते. १९६० नंतर मशिन गन्स जाऊन त्यात हवेतल्या हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे बसवली जाऊ लागली.

मिग१७ - क्षेपणास्त्रे दिसत आहे.