गीता फोगट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गीता फोगट (१५ डिसेंबर, १९८८ - ) ही भारतीय महिला कुस्तीपटू आहे. हीने पहिल्यांदा भारतासाठी राष्ट्रकुल खेळांमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते . २०१० राष्ट्रकुल खेळामध्ये महिलांच्या कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्याचबरोबर ही ऑलिंपिक खेळांसाठी पात्र ठरणारी पहिली महिला खेळाडू आहे.

हिच्या दोन बहिणी बबिता कुमारी फोगट, विनेश फोगट आणि चुलतबहीण रितू फोगट सुद्धा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या कुस्तीगीर आहेत.

डिसेंबर २०१६ मधील दंगल हा हिंदी चित्रपट हिच्यावर आधारित आहे, ज्यामध्ये फातिमा साना शेख हिने गीता फोगटची भूमिका निभवली आहे तर आमिर खान यांनी गीताचे वडील आणि प्रशिक्षक महावीर सिंग फोगट यांची भूमिका निभावली आहे.