Jump to content

विकिपीडिया चर्चा:कौल/प्रचालक/जुने कौल

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@अभय नातू: या लेखाची फक्त प्रचालकांसाठी संरक्षित पातळी अनावश्यक आहे, येथे केवळ प्रचालक कौल आहेत तसेच या पानावर उत्पात झाल्याचेही उदाहरण नाही आहे, त्यामुळे ती संरक्षण पातळी काढून टाकावी ही विनंती. अशा अनावश्यक सरंक्षण कवचांमुळे प्रचालकांचे काम वाढते, कमी होत नाही. मला एक जुना कौल येथे जोडायचा आहे. --संदेश हिवाळेचर्चा १८:२७, ११ फेब्रुवारी २०२१ (IST)[reply]

@अभय नातू, Tiven2240, Usernamekiran, संतोष गोरे, Sandesh9822, Rahuldeshmukh101, Abhijitsathe, सुभाष राऊत, आणि V.narsikar: कृपया या लेखाची सुरक्षा पातळी कमी करावी. या पानावर नासाडी झालेली नाही. जूने कौल येथे जोडायचे आहे. कृपया प्रचालकांनी सहकार्य करावे. --संदेश हिवाळेचर्चा १२:५३, ५ मार्च २०२१ (IST)[reply]

@Sandesh9822:,
नेमके कौल येथे घालावयचे असल्यास तशी नोंद मूळ पानावर करावी. या पानावर नासाडी झालेली नाही कारण हे पान संरक्षित आहे. अनवधानाने देखील यात चुकीचे बदल झाल्यास त्याचे परिणाम दूरगामी असतील त्यामुळे याची संरक्षण पातळी तशीच ठेवीत आहे. -- अभय नातू (चर्चा) ०६:५६, ८ मार्च २०२१ (IST)[reply]
@अभय नातू:, माझा खूप साधा मुद्दा आहे. मी प्रचालकांचेच एक काम/मेहनत कमी करत आहे. मुख्य कौल पानावर असलेले जुने कौल या पानात सामान्य सदस्यास समाविष्ट करता यावे, कारण तितकेच प्रचालकांचे काम कमी होईल. आणि प्रचालकांना साद देऊनही जुने कौल या पानावर हलवले जात नाहीत, म्हणून ते सुचवले. या पानावर नासाडी झालेली नाही याचे कारण हे पान संरक्षित आहे हे नाही, पानाचा इतिहास पहावा त्यात संरक्षित पान होण्याआधी सुद्धा नासाडी झालेली नाही. टायवीन प्रचालक असताना त्यांनी हे पान संरक्षित केले, केवळ प्रचालकांशी संबंधित पान असल्यामुळे त्यांनी तसे केले असावे. यामुळेच सध्या मुख्य कौल पानावर असलेले जुने कौल या पानावर हलवण्याची जबाबदारी प्रचालकांवर येते, आणि प्रचालक ते करीत नाही. आर्या जोशी व इतरांचे कौल ना मुख्य कौल पानावर आहेत, ना या जुने कौल पानावर आहेत!!, ते तिसरीकडे मुख्य कौलाच्या चर्चापानावर आहेत. आणि तोच मजकूर उचलून तुम्ही या पानावर हलवायला हवा. येथे नासाडी रोखण्यासाठी काही सदस्य सक्रिय आहेत, शिवाय दोन द्रुतमाघारकारही आहेत, त्यामुळे या पानावर चुकीचे बदल होणार नाहीत व त्याचे दूरगामी परिणामही होणार नाही.
तरीही आपण लेखाची संरक्षण पातळी तशीच ठेवीत असाल तर माझी हरकत नाही, फक्त यामुळे प्रचालकांवर आलेली जबाबदारी [जुने कौल हलवणे] प्रचालकांनी पूर्ण करावी. आणि त्यामुळे मलाही संरक्षण पातळी कमी करण्याची मागणी करावी लागणार नाही. --संदेश हिवाळेचर्चा १६:२७, ८ मार्च २०२१ (IST)[reply]
@Sandesh9822:,
मी गेले अनेक व पुढील काही दिवस बिगर-विकिपीडिया कामात अतिव्यस्त असल्याने येथे अधिक वेळ देता येत नाही आहे. १-२ आठवड्यांत येथे व इतरत्र उत्तरे देतो व पुढील पावले उचलतो.
अभय नातू (चर्चा) १०:०९, १४ मार्च २०२१ (IST)[reply]
झाले. --Tiven2240 (चर्चा) ००:१०, २० मार्च २०२१ (IST)[reply]