विकिपीडिया:धूळपाटी/मराठा जातिधारकांच्या संस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search • नमस्कार,संबधीत सदस्यांनी चर्चापानावर सहभागी व्हावे म्हणून हे लेखपान तूर्तास अर्धसुरक्षिषीत करण्याचा प्रशासकीय निर्णय घेण्यात आला आहे . या लेखातील काही लेखन/वगळणन/ योगदानांच्या संदर्भाने काही सदस्यांनी इतर लेखपांनाच्या उल्लेखनीयतेबद्दलच्या चर्चेत हे लेख पान आणि त्यातील मजकुराबद्दल साशंकता व्यक्त केली होती. अशाच प्रकारच्या दुसर्‍या लेखपानातील वाक्यवार आणि घटकवार उल्लेखनीयता चर्चा होईपर्यत ही लेखपाने सारखेपणाने धूळपाटीवर स्थानांतरित केली आहेत. मराठी विकिपीडियामधील याच नव्हे तर इतर विविध यादी पानांच्या उल्लेखनीयतेबद्दल मराठी विकिपीडिया समुदाय सहमत होणे अद्याप बाकी आहे, ते कदाचित काळाच्या ओघात होईल.


या लेखपानाची आणि त्यातील मजकुराची वाक्यवार आणि घटकवार विश्वकोशीय उल्लेखनीयता प्रमाणित होऊन सदर लेख मजकूर उलल्लेखनीयतेच्या किमान स्तरास प्राप्त होईपर्यंत हे पान विकिपीडिया धूळपाटी येथे काही काळाकरता स्थानांतरित केले जात आहे. संबंधित चर्चा पानावर सदस्यांनी परिच्छेदातील वाक्यवार आणि यादीतील घटकांबद्दल घटकवार विश्वकोशीय उल्लेखनीयतेबद्दल चर्चा करावी आणि नंतर विश्वकोशीय निकषांस अनुसरून असलेला मजकूर तेवढाच लेखात घ्यावा अशी सहकार्याची विनंती समस्त सदस्यांना केली जात आहे. पुरेशा विश्वकोशीय उल्लेखनीयतेच्या चर्चेशिवाय मजकूर जोडणे अथवा वगळणे दोन्हीही टाळले जाणे अभिप्रेत आहे.

सध्या लेख आहे त्या स्वरूपात कोणत्याही वाचनाशिवाय अर्धसुरक्षिषीत केला जात आहे. या लेखातील कोणत्याही मजकुराशी सदर प्रचालकांनी अद्याप कोणतेही मत (समर्थन/विरोध दुजोरा इत्यादी) बनवलेले नाही. इतर सदस्यांच्या सौहार्द आणि तर्कसुसंगत चर्चेनंतरच प्रचालक योग्य वेळी योग्य कारवाई करतील. सहकार्याकरिता सर्व सदस्यांना धन्यवाद.

उपरोक्त मथळा साचे आणि प्रशासकीय निवेदन प्रशासकीय पूर्व मान्यतेशिवाय वगळण्यास परवानगी नाही.

महाराष्ट्रातील मराठा जातिसमूह साहसी, उद्यमी आणि राजकारणनिपुण असा आहे. या समाजाच्या उद्यमीपणातून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर टोलेजंग संस्था उभ्या राहिल्या. महाराष्ट्रात सध्या कार्यरत असलेल्या शिक्षण संस्थांपैकी ९५ टक्के शिक्षण संस्था मराठा समाजातील लोकांनी उभ्या केल्या आहेत. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांपैकी ९९ टक्के साखर कारखाने मराठा समाजातील नेत्यांनी उभे केले आहेत. मराठा समाजात अनेक औद्योगिक घराणी आहेत. या घराण्यांनी अब्जावधी रुपयांची उलाढाल करणार्‍या उद्योग संस्था उभ्या केल्या. दूध संस्था, सूतगिरण्या उभ्या करण्याचे मोठे कार्य मराठा समाजातील नेत्यांनी केले. सध्याच्या (इ.स.२०१२) मंत्रिमंडळात मराठा समाजाचे ५० टक्के मंत्री जातीने मराठा आहेत. [१]

मतदारसंघ संस्थांसारखे जपले

मराठा समाजातील नेत्यांनी आपले मतदार संघ एखाद्या संस्थेसारखेच जतन केले. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत निम्म्यापेक्षा अधिक जागांवर मराठा जातीचे अलिखित आरक्षण असल्याचे दिसून येते. महाराष्ट्राच्या राज्यनिर्मितीपासून ५४ विधानसभा मतदार संघात मराठेतर आमदार निवडून आलेला नाही[ संदर्भ हवा ]. महाराष्ट्रात १९६२ ते २००४ या कालावधीत २४३० आमदारांपैकी १३६६ आमदार जातीचे मराठा आहेत[ संदर्भ हवा ]. ती टक्केवारी ५५ टक्के होते. महाराष्ट्रातील मराठा समाजाची लोकसंख्या ही एकूण लोकसंख्येच्या ६० टक्के असावी, असे अनुमान आहे. लोकसंख्येचा फायदाही मराठा समाजाला मिळाला.

साखर कारखाने

१०५ साखर कारखान्यापैकी ८६ कारखान्याचे अध्यक्ष[ संदर्भ हवा ], २३ जिल्हा मध्यवर्ती बँकाचे अध्यक्ष मराठा आहेत[ संदर्भ हवा ]. ग्रामीण भागातील ६६.८० टक्के तर शहरांतील ८८.३९ टक्के श्रेष्ठिजन या समाजाचे आहेत[ संदर्भ हवा ]. राज्यातील ७५ टक्के जमिनीची मालकी मराठा समाजाकडे आहे[ संदर्भ हवा ], तर राज्यातील बहुतांश सहकारी दूध संस्था[ संदर्भ हवा ], सूतगिरण्या या समाजाच्या ताब्यात आहेत[ संदर्भ हवा ].

औद्योगिक संस्था

बी.जी. शिर्के, यादवराव बेडसे, मधुकरअण्णा मुळे, अविनाश भोसले अशा अनेक मराठा समाजातील व्यक्तींनी उद्योगांची स्थापना केली. त्यातून मराठा औद्योगिक घराण्यांचा उदय झाला. बी. जी. शिर्के यांनी शिर्के ग्रुप ऑफ कंपनीज या उद्योग समूहाची स्थापना केली. बी जी शिर्के अॅन्ड कंपनी ही या उद्योग समूहाची पहिली कंपनी होय. ती १९४४ साली स्थापन झाली. ही कंपनी आता बी.जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड (बीजीएससीटीपीएल) या नावाने ओळखली जाते. ती भारतातील स्थापत्य क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. [२].

बँका, पतसंस्था

सहकारी क्षेत्राचा आधार घेऊन मराठा समाजातील धुरिणांनी महाराष्ट्रातील बँकिंग क्षेत्राचा पाया घातला. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा बँका मराठ्यांनी स्थापन केलेल्या आहेत. सहकारी बँकांची नियामक संस्था असलेल्या शिखर बँकेवर त्यामुळेच मराठा समाजातील नेत्यांचे वर्चस्व वर्षानुवर्षे राहत आले आहे[ संदर्भ हवा ].

शिक्षण संस्था

भारताच्या मागासलेपणाची कारणे अशिक्षितपणात आहेत, हे ओळखून मराठा समाजातील धुरीणांनी मोठ्या प्रमाणात शिक्षण संस्था उभ्या केल्या. स्वातंत्र्यानंतर मराठा समाजातील अनेक महापुरुषांनी शिक्षण प्रसार हेच आपले जीवनाचे ध्येय ठरविले. डॉ. पंजाबराव देशमुख,[३]. विनायकराव पाटील, पंढरीनाथ पाटील उपाख्य भाऊ, डॉ. कमलकिशोर कदम आदींचा त्यात समावेश होतो. या लोकांनी मोठमोठ्या शिक्षण संस्था उभ्या केल्या. आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात काम करणार्‍या बहुतांश शिक्षण संस्था मराठ्यांनीच उभ्या केलेल्या आहेत. प्राथमिक शिक्षणावर या संस्थांचा जास्त भर आहे. उच्च शिक्षण देणार्‍या शिक्षण संस्थाही मराठ्यांनी उभ्या केल्या. सर्व विद्यापीठांमधील ७१.४० टक्के संस्था मराठा समाजाच्या आहेत[ संदर्भ हवा ].

मराठा समाजातील लोकांनी उभ्या केलेल्या काही शिक्षण संस्था अशा :

धर्म संस्था

मराठ्यांनी उभ्या केलेल्या काही संस्था

 • कोकण मराठा संघ
 • छत्रपति प्रतिष्ठान
 • अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटन
 • अखिल भारतीय छावा युवा संघटन चित्रपट आघाडी
 • छावा मराठा संघटन
 • जिजाऊ ब्रिगेड
 • देवगिरी शिक्षण संस्था (औरंगाबाद)
 • बहुजन महासंघ
 • अखिल भारतीय मराठा आरक्षण कृती समिती
 • भारतीय मराठा महासंघ
 • अखिल भारतीय मराठा विद्याप्रसारक संस्था : ही संस्था, २००७ सालापासून आंतरविद्यापीठ वक्तृत्व स्पर्धा घेऊन विजेत्याला करंडक आणि उपविजेत्यांना अन्य पुरस्कार देत आली आहे.
 • अखिल भारतीय युवक मराठा महासंघ
 • छावा मराठा युवा महासंघ
 • मराठा आरक्षण परिषद
 • मराठा आरक्षण मेळावा
 • मराठा आरक्षण यात्रा
 • मराठा आरक्षण व शेतकरी संघर्ष महामेळावा
 • मराठा आरक्षण हक्क परिषद
 • मराठा आरक्षण संघटना
 • मराठा आरक्षण संघर्ष समिती
 • मराठा गणेश उत्सव मंडळ
 • मराठा मंडळ मावळ (तळेगाव दाभाडे)
 • मराठा महासभा (महाराष्ट्र) - अध्यक्ष : जगजीवन काळे
 • मराठा युवा फाउंडेशन : ही संस्था दर वर्षी मराठा समाजभूषण पुरस्कार देते.
 • मराठा शिक्षण प्रसारक संस्था (अहमदनगर)
 • मराठा विद्या प्रसारक समाज संस्था (नाशिक)
 • सत्यशोधक छत्रपती विचार व जागृती मंच
 • सत्यशोधक जीवनगौरव पुरस्कार
 • मराठा सत्यशोधक समाज
 • मराठा समाज, सांगली
 • मराठा सेवा संघ (संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर)
 • रयत शिक्षण संस्था
 • विठ्ठल मंदिर मराठा मंडळ ट्रस्ट, नवी पेठ (पुणे)
 • विदर्भ मराठा संघ
 • वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद
 • वीर मराठा सेवाभावी संस्था
 • शिवराज्य (राजकीय) पक्ष
 • शिवसंग्राम (राजकीय) पक्ष (अध्यक्ष विनायक मेटे)
 • शिवाजी मराठा हायस्कूल आणि महाविद्यालय, पुणे
 • श्री शिवाजी शिक्षण संस्था (विदर्भ)
 • सत्यशोधक छत्रपती विचार व जागृती मंच
 • सत्यशोधक जीवनगौरव पुरस्कार
 • मराठा सत्यशोधक समाज
 • संभाजी ब्रिगेड
 • सह्याद्री यूथ फाउंडेशन : या संस्थेच्या नऊ सभासदांनी, पुण्यातील नाशिक फाटा पूल व त्याच्या दोन उपपुलांना अनुक्रमे छत्रपती संभाजी महाराज, सेनापती संताजी घोरपडे व धनाजी जाधव अशी नावे द्यावीत अशी मागणी केली आहे.
 • क्षत्रिय मराठा वारकरी संप्रदाय संस्था, वगैरे.

मराठा संस्था आणि मराठा आरक्षण

मराठा समाजाच्या ताब्यात अशा अनेक टोलेजंग संस्था असतानाही मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी मराठा समाजातील एका मोठ्या गटाकडून केली जात आहे. हा मोठा विरोधाभास महाराष्ट्रात दिसून येतो. या संस्थांच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण हा वादाचा विषय ठरला आहे. संस्थानिक असलेल्या मराठ्यांना आरक्षण कशाला हवे, असा युक्तिवाद विरोधकांकडून केला जातो. मराठा आरक्षणाचे विरोधक प्रा. हरी नरके यांनी हा विरोधाभास प्रथम निदर्शनास आणून दिला. नरके यांनी मराठा आरक्षण विरोधाला वैचारिक अधिष्ठान दिले आहे.

[४]. राजकारणात छगन भुजबळ हे मराठा आरक्षणाचे विरोधक आहेत. कै.गोपीनाथ मुंडे यांनाही मराठा आरक्षण मान्य नव्हते. [ संदर्भ हवा ].

मराठा आरक्षणासाठी मेळावा

मराठा आरक्षणासाठी १८ फेब्रुवारी २०१६ रोजी भोसरी (पुणे) येथे महामेळावा झाला. मेळाव्यात अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेर्फे केल्या गेलेल्या मागण्या :-

 • शेतकर्‍यांचे पूर्ण कर्ज व वीजदेयके माफ करावीत. त्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी.
 • अॅट्रॉसिटी अॅक्ट रद्द करावा.
 • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला पाच हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा.
 • कर्नाटक सीमा प्रश्न सोडवून तेथील मराठ्यांना न्याय द्यावा, वगैरे, वगैरे.

या मेळाव्यानंतर मराठ्यांचे अनेक मोर्चे निघाले आणि त्यांनीही याच प्रकारच्या मागण्या केल्या. या मोर्च्यांना प्रतिसाद म्हणून महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस सरकारने मराठ्यांच्या मागासलेपणाचे भरपूर दाखले आणि पुरावे देऊन मुंबई हायकोर्टात केस केली.

हेही पहा


संदर्भ आणि नोंदी

 1. ^ http://72.78.249.107/Sakal/5Nov2012/Enlarge/PuneCity/page8.htm
 2. ^ (English भाषेत) http://www.shirkegroup.com/home.aspx. ८ नोव्हें. २०१२ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
 3. ^ (English भाषेत) http://en.wikipedia.org/wiki/Panjabrao_Deshmukh. ८ नोव्हें. २०१२ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
 4. ^ http://harinarke.blogspot.in/2011/07/blog-post_02.html. ८ नोव्हें. २०१२ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)