१. हे पान प्रचालकांना निवेदन अशा स्वरुपाचे आहे. यात सदस्य <--> प्रचालक असा संवाद अभिप्रेत आहे. विनंत्या विकिपीडिया:प्रचालक/कामे ला अनुसरून असाव्यात.
२. येथे व्यक्तिगत आरोप किंवा शिविगाळ केल्यास असा मजकूर ताबडतोब काढावा व अशा सदस्यास इशारा द्यावा. व्यक्तिगत हाणामारी इतरत्र केल्यास त्या पानांबद्दलचे धोरण लागू करावे. ते येथे irrelevant आहे.
२.१ दुसऱ्या सदस्यावर कारवाइची मागणी असते तेव्हा संबधीत व्यक्तिगत आरोप किंवा शिविगाळ इत्यादीचा केवळ दुवा केवळ संदर्भाकरिता देता येईल.
- सदस्यावर कारवाइची मागणी /प्रचालकावर सुयोग्य आक्षेप हे व्यक्तिगत आरोप या संज्ञेस अगदीच ताठर ठेवून चालत नाही, 'व्यक्तिगत आरोप ' संज्ञेच्या अर्थव्याप्ती सब्जेक्टीव्ह न राहता अधिकाधीक ऑब्जेक्टीव्ह होण्यासाठी उत्पात अभ्यास मध्ये अधीक निरीक्षणे नोंदवून सदस्यांनी तटस्थपणे चर्चा करून ग्राह्य आणि अग्राह्य भाषेची उदाहरणे नमुद करून सहकार्य करावे.
३. मांडलेल्या मुद्द्याबद्दल इतर सदस्यांनी येथे प्रतिक्रिया देणे अपेक्षित नसले तरी त्यात गैर नाही. यात मांडलेल्या मुद्द्याचे सकारण समर्थन किंवा विरोध असेल तर चर्चेस मदतच होईल.
३.१ असा मजकूर काढू नये.
४ सदस्य <--> सदस्य असा (सु/वि)संवाद साधण्यासाठी सदस्य चर्चा पाने उपलब्ध आहेत. चावडी, चावडी/इतर चर्चा ही पानेही उपलब्ध आहेत.
४.१ विकिपीडिया:प्रचालक/कामे करिता आवश्यक नसलेला मजकुर मुद्दास सोडून असेल. येथील मजकूरातील मुद्द्यास सोडून असलेला भाग काढून टाकावा/विषयांतर साचात टाकावा . सदस्याला याबद्दल योग्य सूचना/विनंती शक्यतर करावी.
४.२. मुद्द्याला सोडून लिहिलेला सगळा मजकूर काढावा. मुद्दा सोडलेला मजकूर काय हे ठरवण्यासाठी प्रचालकांना मुभा असावी.
४.३ मुद्दास सोडून समजून काढलेले लेखन दुसऱ्या प्रचालकास योग्य वाटले तर तो ते वापस आणू शकेल अर्थात अशा कृतीचे कारण त्या प्रचालकाने स्पष्ट करणे आवश्यक असेल.
४.४ ही पाने प्रचालकांच्या सोयी साठी आहेत याची पुन्हा एकदा पुनरुक्ती. सदस्याची इच्छा असल्यास असा वगळलेला मजकूर इतरत्र पुन्हा लिहीण्यास वरील नियमांतद्वारे मज्जाव नाही.
४.५ पण एक सदस्य दुसऱ्या सदस्यावर कारवाइची मागणी घेऊन येतो तेव्हा मुद्दा क्र. २,२.१ लागू करावेत.
४.६ प्रचालकावर आक्षेप केवळ विकिपीडिया:चावडी/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन येथे जावेत.