नांदरे
| ?नांदरे महाराष्ट्र • भारत | |
| — गाव — | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| क्षेत्रफळ | ०.१०२ चौ. किमी |
| जवळचे शहर | डहाणू |
| जिल्हा | पालघर जिल्हा |
| लोकसंख्या • घनता |
४४४ (२०११) • ४,३५३/किमी२ |
| भाषा | मराठी |
| सरपंच | |
| बोलीभाषा | वाडवळी,वारली. |
| कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४०१६०२ • +०२५२८ • एमएच/४८ /०४ |
नांदरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[स्रोत संपादित करा]डहाणू बस स्थानकापासून ईराणी मार्गाने गेल्यावर पुढे 'श्रद्धा' किराणा दुकानानंतर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ५.१ किमी अंतरावर आहे.
हवामान
[स्रोत संपादित करा]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
[स्रोत संपादित करा]हे लहान आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ९१ कुटुंबे राहतात. एकूण ४४४ लोकसंख्येपैकी २३९ पुरुष तर २०५ महिला आहेत. गावाची साक्षरता ४२.५८ टक्के आहे.पुरुष साक्षरता ५३.०१ आहे तर स्त्री साक्षरता ३१.६१ आहे. गावातील शून्य ते सहा वर्षे वयाच्या लहान मुलांची संख्या ८७ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १९.५९ टक्के आहे. वाडवळ, भंडारी, आगरी, आणि आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते.
नागरी सुविधा
[स्रोत संपादित करा]गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात.
जवळपासची गावे
[स्रोत संपादित करा]सोगवे, कोसबाड, कंकराडी, कासारा, लष्करी, रायपाडा, जुनाडपाडा, पाटीलपाडा, आंबेसरी, कैनाड, झारळी ही जवळपासची गावे आहेत.कंकराडी ग्रामपंचायतीमध्ये कंकराडी, लष्करी आणि नांदरे ही गावे येतात.
संदर्भ
[स्रोत संपादित करा]१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036