वसंत व्याख्यानमाला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी पुणे शहरात 'वक्तृत्वोत्तेजक सभेची' स्थापना केली. ही वक्तृत्वोत्तेजक सभा १८७५ सालापासून दरवर्षी वसंत ऋतूत टिळक स्मारक मंदिरात वसंत व्याख्यानमाला आयोजित करते. या व्याख्यानमालेला १४५हून अधिक वर्षांची प्रदीर्घ परंपरा[१] आणि प्रतिष्ठा आहे. या व्याख्यानमालेत आरोग्य, साहित्य, संस्कृती, अर्थ, राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा व इतर अनेक विषयांवर विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित, मान्यवर, तज्‍ज्ञ मंडळींची व्याख्याने होत असतात. वसंत व्याख्यानमाला ही पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा मानबिंदू मानली जाते. जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, अटलबिहारी वाजपेयी, शरद पवार, बाळ ठाकरे, नाथ पै, राजेंद्रसिंह, बलराज साहनी, श्रीराम लागू, जब्बार पटेल, कुमार केतकर, विद्याधर गोखले, भारतकुमार राऊत,रघुनाथ माशेलकर, डॉ. अरुण निगवेकर, नरेंद्र जाधव, अनिल अवचट, नरेंद्र दाभोळकर, अण्णा हजारे, पी.सी. अलेक्झांडर, डॉ. शंकरदयाळ शर्मा, सदानंद मोरे, अविनाश धर्माधिकारी, असीम सरोदे, हमीद दाभोळकर, पाशा पटेल, सुबोध भावे, सुहास पळशीकर इत्यादी अनेक मान्यवरांनी वसंत व्याख्यानमालेत व्याख्यानांचे पुष्प गोवले आहे./[२].वक्तृत्वोत्तेजक सभेचे अध्यक्ष श्री.दीपक जयंतराव टिळक हे आहेत.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]