वरुण गांधी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फेरोझ वरुण गांधी (मार्च १३, इ.स. १९८० - )हे दिवंगत काँग्रेसचे नेते संजय गांधीमनेका गांधी यांचे चिरंजीव आहेत. इ.स. २००९ च्या भारतीय लोकसभा निवडणूकीत वरूण गांधी हे उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथून निवडणूक लढवत आहेत.

उत्तर प्रदेशातील पिलिभितमध्ये झालेल्या प्रचारसभेत केलेल्या वादग्रस्त भाषणाबद्दल केंदीय निवडणूक आयोगाने तसेच वरुण यांच्या उमेदवारीलाही निवडणूक आयोगाने नकार दिला आहे. त्या विरोधात हा विरोधकांना माझी राजकीय कारकी‍र्द खराब करायची आहे हा व वरुण यांनी त्यांच्या भाषणाची बनावट सीडी तयार करून आरोप करत आपल्यावरील आरोप मागे घ्यावेत असा अर्ज दाखल केला परंतु कोर्टाने त्यांना या प्रकरणी दोषी ठरवले. आक्षेपार्ह विधाने करून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात रंगत आणणाऱ्या तसेच आचारसंहिता भंगाबद्दल कारवाई ओढवून घेणारे भाजपचे तरुण नेते वरुण गांधी यांच्या प्रचार सभांना महाराष्ट्र भाजपमधून सर्वाधिक मागणी आहे. तसेच उत्तर प्रदेशातही त्यांना आपल्या प्रचारसभांमध्ये बोलण्यास अनेक कार्यकर्ते उत्सुक आहेत.

मार्च २९ इ.स. २००९ रोजी वरुण गांधी यांच्यावर दंगा पसरवण्यास कारणी भूत ठरवल्याचा आरोप ठेवत त्यांना अट्क करण्यात आली.