Jump to content

लेमन ट्री हॉटेल्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लेमन ट्री हॉटेल या भारतीय साखळीच्या कंपनीचे मुख्यालय दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एअरोसिटी हॉस्पिटॅलिटीमध्ये आहे. या कंपनीची भारतामध्ये उच्चस्तराची , मध्यमदर्जाची आणि इकॉनॉमी दर्जाची हॉटेल्स उपलब्ध आहेत. लेमन ट्री प्रिमिअर, लेमन ट्री हॉटेल्स आणि रेड फॉक्स हॉटेल्स अशी तीन प्रकारच्या दर्जाची हॉटेल्स या समूहाने उपलब्ध करून दिलेली आहेत.

लेमन ट्रीची कहाणी

[संपादन]

२००२ मध्ये या कंपनीची स्थापना पटू केशवानी या पहिल्या पिढीतील भारतीय उदयोजकाने केलेली आहे. २००४ मध्ये गुरगांव मधील उदयोगविहार येथे पहिले लेमन ट्री हॉटेल उघडले गेले. २००६ मध्ये रेड फॉक्स हॉटेल बांधण्याचे ठरविले आणि २००९ मध्ये जयपूरमध्ये पहिले रेड फॉक्स हॉटेल चालू करण्यात आले आणि लेमन ट्री हॉटेलबरोबर एकत्रित करण्यात आले. लेमन ट्री प्रिमिअर दर्जाचे पहिले हॉटेल २०१० मध्ये बंगलोरमध्ये उघडण्यात आले. सध्या १५ शहरामध्ये या कंपनीची ३००० च्या जवळपास कामगार वर्ग व स्वतःच्या मालकीच्या ३००० खोल्या असलेली २५ हॉटेल्स आहेत. २०१७ पर्यंत १८ शहरांमधून ५००० खोल्या आणि ८००० कामगार वर्ग असलेली हॉटेल्स बांधण्याची या कंपनीची योजना आहे. अहमदाबाद, औरंगाबाद. बंगलोर, चंदीगढ, चेन्नई, देहरादून, दिल्ली, गोवा, गुरगांव , हैद्राबाद, इंदूर, जयपूर, केरळ, नोएडा आणि पुणे अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये या कंपनीची हॉटेल्स आहेत. मुंबई, पुणे, कलकत्ता, उदयपूर, हैद्राबाद आणि सिमला या ठिकाणी हॉटेल्सचे काम विकसित करण्याचे काम चालू आहे.

जपानच्या काही वित्तीय संस्था जसे शिनसिई बँक, भारतीय दर्जाचा रिअल इस्टेट फन्ड- कोटक रीअल्टी फन्ड, पीई फर्म – वॉरबर्ग पिंकस आणि डच पेन्शन फन्ड मॅनेजर – एपीजी यांचा या कंपनीच्या वित्तीय सहायतेमध्ये महत्त्वाचा सहभाग आहे.

व्यवस्थापन

[संपादन]

पतंजलि (पटू) केसवानी

[संपादन]

सचिव आणि मॅनेजिंग डायरेक्टर

[संपादन]

आय.आय.टी.दिल्लीमधून बी.टेक झालेला इलेक्ट्रिकल इंजिनियर व आय.आय.एम कलकत्तामधून झालेला एम.बी.ए पटू यांच्याकडे या कंपनीच्या सचिव आणि व्यवस्थापकपदाचा कार्यभार आहे. ते टाटा प्रशासकीय सेवेमध्ये गेली १५ वर्षे कार्यरत असून तेथील ताज हॉटेलमध्ये उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तसेच ए.टी.कअर्नि इन्क्ल्यूजिव्हमधील भारतीय शाखेमध्ये सचिव म्हणून काम करत होते. २०११ मध्ये आयआयटी दिल्लीकडून आणि २०१२ मध्ये आयआयएम कलकत्ता यांचेकडून त्यांचा गौरव करण्यात आला होता.

२००२ मध्ये लेमन ट्री हॉटेल्समध्ये त्यांची पदोन्नती झाली.

रतन केसवानी

[संपादन]

उपव्यवस्थापकीय निर्देशक

[संपादन]

१९८३ पासून मुंबईच्या ऑबेराय हॉटेलमध्ये ऑबेराय सेंटर फोर लर्निंग ॲण्‍ड डेव्हलपमेंटमधून रतन यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. ३१ वर्षापेक्षा जास्त कालावधी त्यांनी भारतामध्ये आणि भारताबाहेर या क्षेत्रामध्ये अनुभव घेतला आहे. ऑबेराय हॉटेल आणि जनरल मॅनेजर पदी तसेच मुंबई येथील ऑबेराय हॉटेलच्या कार्यकारी उपाध्यक्ष या पदाचा अनुभव त्यांचेकडे आहे. लेमन ट्री कंपनीमध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्यांचेकडे ट्रिडेन्ट हॉटेलच्या अध्यक्षाचे पद असून त्यांनी भारताबाहेरील १३ हॉटेलचे व्यवस्थापन सांभाळले आहे. लेमन ट्री हॉटेलच्या व्यवस्थापनाचे महत्त्वाचे पद असलेले कार्नेशन हॉटेल्स प्रा.लि.यांचे सचिव पदही त्यांचेकडे आहे.

राहुल पंडित

[संपादन]

अध्यक्ष आणि कार्यकारी निर्देशक

[संपादन]

यांनी नवी दिल्ली येथील पुसा येथे असलेल्या हॉटेल मॅनेजमेंट संस्थेमधून पदवी घेतलेली असून भारतीय कराटे टीममधील स्थापन सदस्य आहे. त्यांनी ब्रॅण्ड मॅनेजमेंट, एचआर मॅनेजमेंट आणि इनोवेशन केलेले आहे. आयआयएम अहमदाबाद, आयआयएम बंगलोर आणि कॉर्नेल ननयंग येथून शिक्षण पूर्ण केले असून यापूर्वी भारत, यू.एस.ए आणि सिंगापूर येथील चॉईस हॉटेल, ताज हॉटेल , स्पेक्ट्रामाइंड आणि इंटरकॉन्टिनेटील हॉटेल्समधून काम केलेले आहे.

ब्रॅण्डस

[संपादन]

या समूहाने तीन दर्जाची हॉटेल्स अभ्यागतांना उपलब्ध करून दिलेली आहे.

  • लेमन ट्री प्रिमिअर (उच्चवर्गीयांसाठी)
  • लेमनट्री हॉटेल्स (मध्यमवर्गासाठी)
  • रेड फॉक्स हॉटेल्स (इकॉनॉमी दर्जाची)

लेमन ट्रीचे हास्य

[संपादन]

भारतामध्ये लेमन ट्री तर्फे आयोजित असलेला मोफत एक रात्र राहण्याची सोय असलेला हा लोकप्रिय बक्षीस योजनेचा कार्यक्रम आहे आणि यामध्ये यशस्वी होणा-याला ३ हॉटेलपैकी कोणत्याही दर्जाच्या हॉटेलमध्ये राहण्याची मोफत व्यवस्था केली जाते.

सदस्य कंपनी

[संपादन]

कार्नेशन हॉटेल्स प्रा.लि. आणि ग्रेफॉक्स प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रा.लि. या हॉटलेच्या सदस्य कंपन्या आहेत.

सामाजिक जाणिव

[संपादन]

कर्मचा-यांना कामाचा योग्य मोबदला, त्यांना सर्वतोपरी प्रशिक्षण देउुन त्यांच्या कार्यक्षमतेचा पुरेपूर वापर करणारी कंपनी म्हणून नावलौकिक आहे. रस्तांवरील कुत्र्यांना दत्तक घेउुन त्यांची सर्वतोपरी काळजी घेण्याचे काम करणारी ही एकमेव कंपनी आहे. पर्यावरण रक्षण करण्याच्या उद्देशाने या कंपनीच्या ब-याचशा योजना आहेत.


संदर्भ

[संपादन]
  1. द लेमन ट्री हॉटेल कंपनी
  2. लेमनट्रीहॉटेल्स.कॉम.मेडिआ.एएसपीएक्स
  3. लेमन ट्री हॉटेल्स
  4. लेमन ट्री हॉटेल्स
  5. लेमन ट्री हॉटेल्स ऑससिअस-प्लॅन Archived 2014-05-22 at the Wayback Machine.
  6. लेमन ट्री हॉटेल्स