लुफ्तान्सा ६१५चे अपहरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
लुफ्तान्साचे बोईंग ७२७-१०० विमान जे अपहरण झालेल्या विमाना सारखे आहे.

२९ ऑक्टोबर १९७२ला लुफ्तान्सा ६१५चे अपहरण झाले. हे अपहरण पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनच्या दहशतवादी गट ब्लॅक सप्टेंबरशी सहानुभूती ठेवण्याऱ्या दहशतवादी गटाने घडवून आणले होते. म्युनिच हत्याकांडात पकडले गेलेले तीन ब्लॅक सप्टेंबरचे आतंकवादी सोडविण्यास ह्या विमानाचे अपहरण करण्यात आले होते. हे गुन्हेगार पश्चिम जर्मनीच्या म्युनिच मध्ये बंदीवान होते. हे विमान दमास्कस आंतरराष्ट्रीय विमानतळ, सीरिया वरून आपले गंतव्य फ्रांकफुर्ट विमानतळ, जर्मनी गाठण्यासाठी निघाले होते जेन्हा ही घटना घडली. ओलीस पकडलेल्या विमानातील प्रवासी व विमानावरील खलाश्यांच्या बदल्यात जर्मन सरकारने म्युनिच हत्याकांडातील गुन्हेगारांना सोडुन दिले ज्यांना पुढे लीबियाच्या हुकुमशहा व सर्वोच्च नेता मुअम्मर अल-गद्दाफीने शरण दिले.

इस्रायल आणि इतर पक्षांनी पश्चिम जर्मन सरकारावर टीका केली. पश्चिम जर्मन सरकारावर असा पण आरोप झाला होता की ब्लॅक सप्टेंबर संघटनेशी त्यांनी एक गुप्त करार केला होता की दहशतवाद्यांना सोडवील्यास ब्लॅक सप्टेंबर आश्वासन देइल की ते पश्चिम जर्मनीवर आणखी हल्ले करणार नाहीत.

पार्श्वभूमी[संपादन]

म्युनिच मध्ये आयोजित १९७६च्या उन्हाळी ऑलिंपिक मध्ये इस्रायलचे अकरा ऑलिंपिक चमू चे सदस्य बंधक बनवले होते व शेवटी त्यांची हत्या करण्यात आली. ह्या हत्याकांडातील तीन दहशतवादी (अदनान अल-गैथे, जमाल अल-गैसे, आणि मोहम्मद सफदी) ज्यांना पकडले होते ते म्युनिचमधील तुरुंगात बंद होते.[१] जर्मन सरकार एका विकट परिस्थितीत अडकले होते व त्यांना वाटले की त्यांना कोणत्याही कारणास्तव अरब-इस्रायली संघर्षांत सामील केले जाईल. इस्रायलने विचार केला की जर्मनी इथेही संतुष्टीकरणाची राजनीति लागू करेल.[२] १९६०च्या दशकात आणि सहा दिवसांच्या युद्धकाळात जर्मनीने इस्रायलचे समर्थन केले होते. याच कारणास्तव बर्याच अरब राज्यांनी पश्चिम जर्मनीशी असलेले राजकीय संबंध तोडले होते. इजिप्त आणि ट्युनिशिया यांच्याशी हे संबंध १९७२च्या ओलंपिकच्या आधी पुन्हा स्थापीत झाले होते.

पश्चिम जर्मन अधिकार्यांना कैद्यांच्या उच्च वर्गाबद्दल माहिती होती आणि वस्तुस्थिती अशी होती की अनेक गट त्या कैद्यांचे समर्थक होते. त्यांना माहीत होते की म्युनिच आक्रमणकर्त्यांच्या सुटकेसाठी जर्मनीला दहशतवादी कार्यांचा सामना करावा लागेल. ९ सप्टेंबर रोजी एका अज्ञात पत्राने दावा केला की विमान अपहरण केले जाऊ शकते. यामुळे, अरब राज्यातील नागरिकांनी लुफ्तान्सा मध्ये प्रवेश करू नये की काय ह्या विचारात अंतर्गत फेडरल मंत्री हांस-डीट्रिक गेन्सेचर पडले होते.[२]

अपहरण[संपादन]

टीप: सर्व वेळा सहजतेसाठी मध्य युरोपीय प्रमाणवेळेत आहेत.

लुफ्तान्साच्या बोईंग ७२७-१०० विमानाचे रविवारी २९ ऑक्टोबर १९७२ रोजी अपहरण करण्यात आले, जे दमास्कस-बैरूत-अंकारा-म्युनिच-फ्रांकफुर्ट या मार्गाने उड्डाण करणार होते. सकाळी दमास्कसवरुन सुटताना विमानात सात कर्मचारी होते आणि एकही प्रवासी नव्हता. बैरूतमध्ये तेरा जणांनी विमानात प्रवेश केला, ज्यात नऊ अरब, दोन अमेरिकन, एक जर्मन आणि एका फ्रेंच व्यक्तींचा समावेश होता. सकाळी ६:०१ वाजता बैरूतहून निघाल्यावर थोड्याच वेळात दोन अरबी लोकांनी आपण विमानाचे केल्याची घोषणा केली. निकोसिया विमानतळ वर इंधन भरुन विमान म्युनिच-राईम विमानतळाकडे वळविले. पण त्यांनी फेरबदल करून युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक मध्ये झाग्रेब विमानतळ गाठले व तेथेच आकाशात फिरत राहिले. विमान न उतरवता इंधन संपले तर अपघात होइल या दबावाखाली जर्मन अधिकार्यांना तत्काळ पावले उचलण्यास भाग पाडले. त्याच्या मुयूनिक हत्याकांडाच्या अयशस्वी बचाव प्रयत्नास लक्षात घेऊन जर्मन अधिकार्यांनी ताबडतोब कैद्यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला. कैद्यांना दुपारी २ वाजता म्युनिच विमानतळावर आणण्यात आले आणि साध्या वस्त्रातील दोन पोलीस अधिकारी व लुफ्तान्साचे अध्यक्ष हर्बर्ट कल्मन झाग्रेबला बोलणी करण्यासाठी निघाले. वैमानिकास पश्चिम जर्मन वाहतूक क्षेत्र सोडून न जाण्याचे आदेश देण्यात आले होते परंतु अधिकार नसताना कल्मन यांनी विमान झाग्रेबकडे नेण्याचा आदेश दिला, ज्यामुळे पुढे त्यांच्यावर कारवाई झाली परंतु लगेचच त्यांना सोडले. संध्याकाळी ६:०५ वाजता कैदी लुफ्तान्साच्या विमानात गेले पण बाकी बंधकांना सोडले नाही. युगोस्लावियाच्या अधिकाऱ्यांनी प्रथम याचा विरोध केला आणि इंधन भरून देण्यास मनाई केली. परंतु बंधकांना मारण्याच्या धमकी नंतर इंधन भरुन दिले गेले व संध्याकाळी ६:५०ला विमान लीबियाची राजधानी त्रिपोली कडे निघाले व रात्री ९:०३ वाजता तेथे बंधकांची सुटका झाली.[१][२]

या घटनेनंतर लिबिया आणि इतर काही देशांमध्ये उत्सवपुर्वक समारंभ आयोजित केले गेले होते. लुफ्तान्साचे अपहरणकर्ते आणि म्युनिचच्या कैद्यांचा लिबियामध्ये वीर नायकांचा आदर मिळाला. लिबिया सरकारचे प्रमुख मुअम्मर अल-गद्दाफी यांनी सर्वांना शरण दिले आणि लपवून ठेवण्यात मदत केली. पश्चिम जर्मन सरकारने त्यांच्यावर सुनावणी होण्याची मागणी केली होती.[१]

पश्चिम जर्मन सरकार वर आरोप[संपादन]

या घटनेनंतर लगेचच आणि नंतर पण पश्चिम जर्मन सरकारवर आरोप केले गेले की ही घटना अभिनीत होती. असा पण आरोप झाला होता की ब्लॅक सप्टेंबर संघटनेशी त्यांनी एक गुप्त करार केला होता की दहशतवाद्यांना सोडवील्यास ब्लॅक सप्टेंबर आश्वासन देइल की ते पश्चिम जर्मनीवर आणखी हल्ले करणार नाहीत. या आरोपांच्या समर्थनासाठी हा तर्क लावला की १३०-१५० क्षमतेच्या विमानेमध्ये फक्त तेरा पुरुष यात्री कसे होते. इस्रायली न्यायिक आणि राजकारणी हैंम योसेफ जादोकने क्नेसेटमध्ये म्हटले की जर्मनीने या संधीचा फायदा त्यांच्या अरब राष्ट्रांशी संबंध सुधारण्यासाठी केला आहे. ऑस्कर पुरस्कार विजेता माहितीपट वन डे इन सप्टेंबर मध्ये पण पश्चिम जर्मन सरकारचा ह्या घटनेत हात असल्याचे समर्थन झाले आहे.[३][४][५]

संदर्भ[संपादन]

  1. a b c Simon Reeve. One Day in September: The Full Story of the 1972 Munich Olympics Massacre and the Israeli Revenge Operation "Wrath of God" (इंग्रजी भाषेत).
  2. a b c "1972 Olympics Massacre: Germany's Secret Contacts to Palestinian Terrorists" (इंग्रजी भाषेत). १६ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ माहितीपट वन डे इन सप्टेंबर, निर्देशक केविन मैकडोनाल्ड
  4. ^ जेसन बर्क. "Bonn 'faked' hijack to free killers" (इंग्रजी भाषेत). १६ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले. Unknown parameter |trans_title= ignored (सहाय्य)
  5. ^ सायमन बर्नटोन. "50 stunning Olympic moments No 26: The terrorist outrage in Munich in 1972" (इंग्रजी भाषेत). १६ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले. Unknown parameter |trans_title= ignored (सहाय्य)