Jump to content

अग्निबाण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रॉकेट या पानावरून पुनर्निर्देशित)

रॉकेट (इटालियन रोशेट्टो "बॉबिन" वरून) एक रॉकेट इंजिनमधून जोर मिळवणारे एक क्षेपणास्त्र, अवकाशयान, विमान किंवा अन्य वाहन आहे. ज्वलनातून उत्पन्न झालेल्या ऊष्ण वायूंच्या झोताने पुढे जाणाऱ्या वाहनास अग्निबाण असे म्हणतात. यात खास प्रकारचे इंधन वापरले जाते. रॉकेट इंजिन कृती आणि प्रतिक्रियाद्वारे कार्य करतात. खरं तर, रॉकेट्स वातावरणापेक्षा अवकाशात अधिक कार्यक्षमतेने कार्य करतात.

सोयु।अ अग्निबाण बैकानुर येथे
चीन मधील पुरातन अग्निबाणाचे चित्र

इतिहास

[संपादन]

अग्नीबाणाचा शोध प्राचीन चीनमध्ये लागल्याचे कळते. परंतु कालौघात ही कला लुप्त पावली. मध्ययुगीन इस्लामी राज्ये व युरोपीय लोकांनी दारुगोळा वापरायचे तंत्र मोठ्या प्रमाणावर अवगत केले व आपापली साम्राज्ये पसरली. अग्निबाणाचा चीननंतर पहिला वापर भारतात झाल्याचे ब्रिटिश मान्य करतात.[ संदर्भ हवा ] टिपू सुलतानला आजच्या आधुनिक अग्निबाणाचा जनक मानले जाते. १७९३ च्या ॲंग्लो-म्हैसूर युद्धात टिपूच्या सैन्याला कमी लेखणाऱ्या ब्रिटिश सैन्याला टिपूच्या आश्चर्यकारक अग्निबाणाच्या हल्याला तोंड द्यावे लागले. टिपूचे हे अग्नीबाण तांत्रिक दृष्ट्या कमकूवत असल्याने त्या व नंतरच्या युद्धात फारसा फरक पाडू शकले नाहीत. परंतु शस्त्रतंत्रज्ञांनी हे नवीन शस्त्र तोफांपेक्षाही लांबवर याची संहारक्षमता असल्याने भविष्यात प्रभावी ठरेल हे ओळखले व त्यात शास्त्रीय सुधारणा करून पुढील युद्धांमध्ये वापर केला.

रचना

[संपादन]

अग्निबाणाची वात पेटवल्या नंतर वातीमधून ती आग इंधनाच्या मिश्रणापर्यंत जाते आणि त्याचे अत्यंत वेगाने ज्वलन होऊन त्यातून खूप मोठे आकारमान असलेला वायु तयार होतो. हा वायू अग्निबाणाच्या भक्कम नळकांडीमध्ये असल्याने त्याचा दाब वाढत जातो. हा वायू बाहेर पडण्यासाठी खालील बाजूला मार्गिका असते. या वाटेने वायूचा झोत वेगाने बाहेर पडतो. या दाबाची प्रतिक्रिया अग्निबाणाला विरुद्ध दिशेने फेकते. ज्वलनातून उत्पन्न झालेल्या ऊष्ण वायूंच्या झोतानेच अग्निबाण पुढे जातो. अग्निबाणाला असलेल्या खास पंखांमुळे त्याची दिशा नियंत्रित केली जाते.

प्रकार

[संपादन]

अग्निबाणांवर स्फोटके बसवून क्षेपणास्त्रांच्या रूपाने युद्धात उपयोग करण्यात येतो. मोठ्या शक्तीचे इंधन भरून उपग्रह अवकाशात सोडण्यासही यांचा उपयोग होतो. हवामान शास्त्राचा अभ्यास करण्यास यांचा वापर केला जातो.

वाहन संरचनेनुसार रॉकेट वाहने बऱ्याचदा आर्केटीपल उंच पातळ "रॉकेट" आकारात तयार केली जातात जे अनुलंबपणे बंद घेतात, परंतु प्रत्यक्षात बऱ्याच प्रकारचे रॉकेट्स समाविष्ट आहेत.

  • बलून रॉकेट्स, वॉटर रॉकेट्स, स्कायरोकेट्स किंवा लहान घन रॉकेट्स यासारखी छोटी मॉडेल्स ते छंद दुकानात खरेदी केले जाऊ शकते.
  • क्षेपणास्त्र
  • अपोलो प्रोग्रामसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रचंड शनी व्ही सारख्या अंतराळ रॉकेट
  • रॉकेट मोटारी
  • रॉकेट दुचाकी
  • रॉकेट-चालित विमान (पारंपारिक विमानांच्या रॉकेट सहाय्यक टेकऑफसह - आरएटीओ)
  • रॉकेट स्लेज
  • रॉकेट चालित जेट पॅक

अनेक स्तरीय अग्निबाण

[संपादन]

उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी प्रचंड शक्तीची गरज असते. ही गोष्ट साध्य करण्यासाठी अनेक स्तरीय अग्निबाण तयार केले जातात. त्यात अनेक अग्निबाण जोडून त्यांचा समूह केलेला असतो. अग्निबाणातल्या सर्वात मोठ्या त्याच्या पहिल्या टप्प्यावर ठिणगी पडून त्याचा भडका उठतो आणि धडाक्याने अग्निबाण उड्डाण होते. आकाशात झेपावल्यानंतर ठराविक कालावधीने आणि ठराविक क्रमाने त्या अग्निबाणाचे पुढील टप्पे एका पाठोपाठ एक पेटत जातात. या अग्निबाणांची रचना अशी केलेली असते की प्रत्येक टप्प्याच्या वेळी त्याच्या विशिष्ट टप्प्याचा भाग सुटा होतो आणि त्या निरुपयोगी झालेल्या भागाला मागे टाकून उरलेला अग्निबाण पुढे जात राहतो. कोणताही अग्निबाण एकदा उडवल्यानंतर जळून नष्ट होतो. त्याचे अवशेष अवकाशात सोडून दिले जातात. किंवा पृथ्वीच्या वातावरणात खाली येताना जळून जातात. अग्निबाणात पुन्हा पुन्हा वापरता येत नाही. मात्र स्पेस शटल एंडेव्हर सारखी याने परत परत वापरता येतात. पण त्याला अवकाशात नेणारे अग्निबाण मात्र एकदाच वापरले जातात. त्यामुळे त्याची रचना आणि निर्मिती अत्यंत बिनचूक रीतीने केलेली असणे आवश्यक ठरते. उपग्रहाच्या आकारानुसार निरनिराळ्या प्रकारचे अग्निबाण तयार केले जातात.

इंधने

[संपादन]

अग्निबाण यात खास प्रकारचे इंधन वापरतात. त्याच्या ज्वलनासाठी लागणारा प्राणवायू आणि प्राणवायू पुरवणारी रासायनिक द्रव्ये यांचा साठा काही वेळा अग्निबाणातच बसवलेला असतो.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
नियामक मंडळे
माहितीपूर्ण स्थळे