रानकोळ
| ?रानकोळ महाराष्ट्र • भारत | |
| — गाव — | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| क्षेत्रफळ | १.२६१९६ चौ. किमी |
| जवळचे शहर | डहाणू |
| जिल्हा | पालघर जिल्हा |
| लोकसंख्या • घनता |
२,९१७ (२०११) • २,३११/किमी२ |
| भाषा | मराठी |
| सरपंच | |
| बोलीभाषा | वारली |
| कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४०१६०२ • +०२५२८ • एमएच/४८ /०४ |
रानकोळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यामधील डहाणू तालुक्यातले एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव २५ किमी अंतरावर आहे.
हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.डहाणू तालुक्यातील कासा वनपरिक्षेत्रांतर्गत वनविभागाने येथील सुतारपाडा भागात वीस हेक्टर जमिनीवर १२५०० झाडे लावली आहेत.काजू, जांभूळ, बांबू, वड, पिंपळ वगैरे जातीच्या रोपांची लागवड केली आहे.[१]ह्या गावाला सूर्या कालव्याचे सिंचनासाठी पाणी पुरविण्यात येते आणि त्या पाण्यावर उन्हाळ्यात भातशेती केली जाते.[२]
लोकजीवन
[संपादन]हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ५५९ कुटुंबे राहतात. एकूण २९१७ लोकसंख्येपैकी १४३६ पुरुष तर १४८१ महिला आहेत. गावाची साक्षरता ५३.५० टक्के आहे.पुरुष साक्षरता ६४.४५ आहे तर स्त्री साक्षरता ४२.८० आहे. गावातील शून्य ते सहा वर्षे वयाच्या लहान मुलांची संख्या ३९० आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १३.३७ टक्के आहे.आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालनसुद्धा केले जाते.
नागरी सुविधा
[संपादन]गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा डहाणूवरून मिळतात.
जवळपासची गावे
[संपादन]वारोटी, कासाखुर्द, भिसेनगर, सारणी, निकाणे, दाभोण, आंबिस्ते, साये, उर्से,म्हासड, आंबिवळी ही जवळपासची गावे आहेत. रानकोळ समूह ग्रामपंचायतीमध्ये ऐने आणि रानकोळ ही गावे येतात.
संदर्भ
[संपादन]१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036